Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 8 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Santosh Deshmukh Murder : अंजली दमानिया या रिचार्जवर चालणाऱ्या ताई…; सुरज चव्हाणची खोचक टीका

बीड सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड याच्यावर समाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी गंभीर आरोप केले आहेत. यानंतर अजित पवार गटाचे प्रवक्ते सूरज चव्हाण यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Dec 31, 2024 | 11:14 AM
अंजली दमानियांनी व्हायरल केले लक्ष्मण हाकेंचे 'ते' फोटो; हाकेंच्या आरोपांना दिलं उत्तर

अंजली दमानियांनी व्हायरल केले लक्ष्मण हाकेंचे 'ते' फोटो; हाकेंच्या आरोपांना दिलं उत्तर

Follow Us
Follow Us:

मुंबई : राज्यामध्ये बीड हत्या प्रकरणावरुन जोरदार राजकारण तापले आहे. बीडमध्ये मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करुन हत्या करण्यात आली आहे. या प्रकरणामध्ये वाल्किम कराड हा मास्टरमाईंड म्हणून समोर आला असून मात्र अद्याप त्याला अटक करण्यात आलेली नाही. तसेच वाल्मिक कराड याचे मंत्री धनंजय मुंडे सोबत संबंध असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला आहे. तसेच अनेक फोटो व व्हिडिओ देखील अंजली दमानिया यांनी शेअर केले आहेत. यानंतर आता अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते सूरज चव्हाण यांनी टीका केली आहे.

संतोष देशमुख यांची 9 डिसेंबर रोजी निर्घुणपणे हत्या करण्यात आली. या प्रकरणामध्ये घटनेला 20 दिवस उलटून देखील आरोपींना अटक करण्यात आलेली नाही. यामुळे विरोधकांनी सत्ताधारी महायुती व मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. तसेच आरोपी वाल्मिक कराड याचा अजित पवार गटाचे नेते व मंत्री धनंजय मुंडे यांच्यासोबत संबंध असल्याचे देखील आरोप केले जात आहेत. या विरोधात शनिवारी (दि.28) सर्वपक्षीय मूक मोर्चा काढण्यात आला. यानंतर आता राष्ट्रवादीचे प्रवक्ते सूरज चव्हाण यांनी सोशल मीडिया पोस्ट करुन खोचक टोला लगावला आहे.

महाराष्ट्र राजकारणासबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

सूरज चव्हाण यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, अंजली दमानिया स्व.संतोष देशमुख हत्त्या प्रकरणी अडथळे निर्माण करून पोलिसांची दिशाभूल करत आहेत.रिचार्ज वर चालणाऱ्या ताई नेमक्या कोणाला मदत करत आहेत.बीड पोलीस अधीक्षक यांना विनंती आहे अंजली दमानिया यांना या प्रकरणापासून दूर ठेवावे.रिचार्ज वाल्या ताईची लढाई स्व.संतोष देशमुख न्याय मिळवून देण्यापेक्षा प्रसिद्धीसाठी चालू आहे. अंजली दमानिया यांनी लक्षात ठेवाव सरकार गुन्हेगारांना सोडणार नाही, असा विश्वास अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते सूरज चव्हाण यांनी व्यक्त केला आहे.

अंजली दमानिया स्व.संतोष देशमुख हत्त्या प्रकरणी अडथळे निर्माण करून पोलिसांची दिशाभूल करत आहेत.रिचार्ज वर चालणाऱ्या ताई नेमक्या कोणाला मदत करत आहेत.बीड पोलीस अधीक्षक यांना विनंती आहे अंजली दमानिया यांना या प्रकरणापासून दूर ठेवावे.रिचार्ज वाल्या ताईची लढाई स्व.संतोष देशमुख न्याय… — Suraj Chavan (सूरज शेषाबाई व्यंकटराव चव्हाण) (@surajvchavan) December 30, 2024

राजकीय घडामोडी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

अंजली दमानिया यांचे गंभीर आरोप

बीड हत्या प्रकरणाबाबत सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. अंजली दमानिया यांनी अनेक सोशल मीडिया पोस्ट करुन धक्कादायक दावे केले आहेत. यापूर्वी अंजली दमानिया यांनी आरोपी वाल्मिक कराड आणि बीडचे माजी पालकमंत्री धनंजय मुंडे यांचे सोबत असलेले फोटो शेअर केले होते. त्याचबरोबर बीडमधील हजाराहून अधिक परवानाधारक पिस्तुलधारक असल्याची माहिती देखील त्यांनी समोर आणली. याचबरोबर धनंजय मुंडे यांचे वाल्मिक कराडसोबत अर्थिक संबंध असल्याचे देखील अंजली दमानिया यांनी म्हटले होते. त्याचबरोबर बीड हत्या प्रकरणातील तीन आरोपांची हत्या करण्यात आल्याचा गंभीर दावा अंजली दमानिया यांनी केला होता. त्याचबरोबर त्या तिघांचे मृतदेह कर्नाटक सीमेवर आढळल्याचा कॉल अज्ञातांनी आपल्याला केल्याचा दावा अंजली दमानिया यांनी केला होता. त्यानंतर गुन्हे शाखेने याची शहानिशा केली होती मात्र त्यात प्रथमदर्शनी काहीही तथ्य आढलेले नाही. त्यामुळे अंजली दमानिया बीड हत्या प्रकरणामध्ये दिशाभूल करत असल्याचा आरोप सूरज चव्हाण यांनी केला आहे.

Web Title: Ncp suraj chavan targets anjali damania in beed santosh deshmukh murder case walmik karad

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 31, 2024 | 11:14 AM

Topics:  

  • Santosh Deshmukh Murder
  • suraj chavan

संबंधित बातम्या

सूरज उतरला मनातून! एका पॉडकास्टमध्ये पुन्हा उकरून काढला फर्निचर वाद; DP दादांच्या मनात अजूनही राग?
1

सूरज उतरला मनातून! एका पॉडकास्टमध्ये पुन्हा उकरून काढला फर्निचर वाद; DP दादांच्या मनात अजूनही राग?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.