Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sugarcane Workers : ऊसतोड कामगारांसाठी एक खिडकी योजना राबवा; उपसभापती नीलम गोऱ्हेंची मागणी

sugarcane workers : ऊसतोडणी सुरु झाली की ऊसतोड कामगारांचे प्रश्न ऐरणीवर येत असतात. यामधील मुलांची आणि महिलांसाठी खास सुविधा उपलब्ध करुन देण्याची मागणी केली जात आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Mar 18, 2025 | 03:56 PM
Neelam Gorhe's suggestions on providing special facilities for sugarcane workers and women

Neelam Gorhe's suggestions on providing special facilities for sugarcane workers and women

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यातील ऊस तोडणी कामगारांसाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली सर्व विभागातील अधिका-यांचा समावेश करून विकास व सहाय्य समिती स्थापन करा. ऊस तोडणी कामगारांसाठी शासनाच्या योजना एकाच प्लॅटफॉर्मवर देता येतील यासाठी एक ॲप तयार करावे, ट्रॅकींग सिस्टीम,रेशनची पोर्टिबीलीटी यासारख्या अत्याधुनिक यंत्रणेच्या सहाय्याने योजना राबवण्यावर भर द्यावा.बीड जिल्ह्याप्रमाणे इतर जिल्ह्यातही काम केले जावे.अपघात ग्रस्त ऊस तोडणी कामगारांना तात्काळ मदत देण्यात यावी अशा सूचना विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी केल्या.

विधान भवन येथे विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली बीड जिल्हयातील गर्भाशय काढून टाकण्याच्या शस्त्रक्रियांसंदर्भात गठीत समिती अहवाल सादर करण्यात आला.  मंत्रालयीन विभागाने केलेल्या कार्यवाहीबाबत बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी या बैठकीला दूरदृश्यप्रणालीव्दारे सार्वजनिक आरोग्य विभागाचे आयुक्त अमगोथु रंगानाईक,गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक रविंद्र गोरवे,साखर आयुक्तालय पुणे साखर आयुक्त दिपव तावरे असे उपस्थित होते.

राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

यावेळी उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे म्हणाल्या की, “बीड जिल्ह्यात गर्भाशय काढून टाकण्याच्या शस्त्रक्रिया मोठ्या प्रमाणावर झाल्याच्या घटना निदर्शनास आल्या होत्या. राज्य शासनाने २६ जून २०१९ रोजी समिती स्थापन केली होती.गेल्या तीन वर्षांत बीड जिल्ह्यातील खासगी रुग्णालयांमध्ये गर्भाशय काढून टाकण्याच्या शस्त्रक्रियांबाबत तपासणी समितीने केली.सामाजिक न्याय विभाग,महिला व बालविकास विभाग,शिक्षण विभाग,साखर आयुक्त,कामगार आयुक्त,आरोग्य विभागाचे अधिकारी,स्वयंसेवी संस्था यांनी प्रत्येक जिल्ह्याने काम करावे.तसेच या विभागांना येणा-या अडचणींचा अहवाल तात्काळ पाठवावा जेणेकरून यामध्ये असणा-या त्रुटीबाबत सुधारित शासनाच्या मार्गदर्शक सूचना धोरणात्मक निर्णय घेऊन कारता येतील.

महिलांना मासिक पाळीसाठी सॅनिटरी नॅपकिन उपलब्ध करावे

पुढे त्या म्हणाल्या की, “आरोग्य विभागाने ऊस तोडणीसाठी जाणाऱ्या प्रत्येक महिलेला आरोग्य कार्ड देणे. ऊस तोडणीला जाण्यापूर्वी आणि आल्यानंतर महिलांची आरोग्य तपासणी करणे.साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या माध्यमातून ऊस तोडणीच्या ठिकाणी महिलांची वैद्यकीय तपासणी करणे. तज्ज्ञांनी केलेल्या एसओपीचा सर्व खासगी रुग्णालयांनी वापर करूनच शस्त्रक्रिया करावी. खासगी स्त्रीरोगतज्ज्ञांनी त्यांच्याकडील गर्भपिशवी शस्त्रक्रियांचा अहवाल दरमहा जिल्हा शल्य चिकित्सकांना पाठवावा. आरोग्य विषयक योजनांची जनजागृती करणे यावर भर द्यावा. महिलांना मासिक पाळीसाठी सॅनिटरी नॅपकिन उपलब्ध करून देणे. ज्या परिसरात ऊस तोड कामगार आहेत तिथे स्वच्छतागृह उभारणे साठी ऊस तोड कामगार महामंडळाचे १० टक्के निधीची तरतुद करावी, अशी मागणी नीलम गोऱ्हे यांनी ऊसतोड महिला कामगारांसाठी केल्या आहेत.

महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

स्वतंत्र वसतिगृह व हंगामी शाळा

साखर आयुक्त, साखर कारखाने, कामगार आयुक्तांनी सर्व ऊसतोड मजूरांची नोंदणी सहाय्यक कामगार आयुक्तांकडे करावी. त्यांना ओळखपत्र देण्यात यावीत. प्रत्येक जिल्ह्यात यासाठी काम केले जावे. गाळप हंगामात कारखाना परिसरात उस तोडणीसाठी आलेल्या कामगारांना पिण्याचे पाणी,स्वच्छतागृह व अन्य मुलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात.तात्पुरत्या स्वरूपाची स्वच्छतागृहांची व्यवस्था करावी. ऊसतोडणी मजुरांसाठी कारखाना परिसरात घरकुल धर्तीवर घरे बांधण्यात यावीत.म हिला व बालकल्याण विभागाने कारखान्याच्या ठिकाणी उसतोड मजुरांच्या मुलांसाठी पाळणाघर तयार करावे. मजूरांच्या मुलांसाठी स्वतंत्र वसतिगृह व हंगामी शाळा कारखान्यांच्या ठिकाणी सुरू कराव्यात, अशी मागणी केली जात आहे.

मजूरांना रेशनकार्ड वितरीत करावे

तसेच बालविवाह प्रतिबंध कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करून राज्यात ५००० बालविवाह रोखले असून यामध्ये ४०० एफआयर नोंद करण्यात आले आहेत.आरोग्य विभाग, महिला व बालविकास विभागांनी त्याचबरोबर शासनाच्या सर्व विभागांनी ऊस तोड कामगारांसाठी योजनांची माहिती त्यांच्या मोबाईलवर द्यावी. अन्न नागरी पुरवठा विभागाने उस तोडणीला जाण्याआधी मजूरांना रेशनकार्ड वितरीत करावे, अशा अनेक मागण्या या ऊसतोड कामगारांसाठी करण्यात आल्या आहेत.

Web Title: Neelam gorhes suggestions on providing special facilities for sugarcane workers and women

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 18, 2025 | 03:55 PM

Topics:  

  • Neelam Gorhe
  • shivsena
  • sugarcane workers

संबंधित बातम्या

Eknath Shinde: निवडणुकीआधीच एकनाथ शिंदेंना मोठा धक्का; ‘या’ नेत्याने सोडली साथ?
1

Eknath Shinde: निवडणुकीआधीच एकनाथ शिंदेंना मोठा धक्का; ‘या’ नेत्याने सोडली साथ?

Mahrashtra Politics: ठाकरे बंधूंच्या एकत्रित येण्याने BMC चे समीकरणे बदलतील का? मनसेमुळे उबाठाला काय होईल फायदा?
2

Mahrashtra Politics: ठाकरे बंधूंच्या एकत्रित येण्याने BMC चे समीकरणे बदलतील का? मनसेमुळे उबाठाला काय होईल फायदा?

अजित पवारांच्या ‘लाडकी बहीण’ योजनेमुळे महायुतीला २३८ जागा मिळाल्या, राष्ट्रवादीने पूर्ण श्रेय घेतले, शिंदेंची शिवसेना काय करणार?
3

अजित पवारांच्या ‘लाडकी बहीण’ योजनेमुळे महायुतीला २३८ जागा मिळाल्या, राष्ट्रवादीने पूर्ण श्रेय घेतले, शिंदेंची शिवसेना काय करणार?

बेस्ट पतपेढी निवडणुकीच्या निमित्ताने शिवसेना ठाकरे गट आणि मनसेची एकत्रित बैठक
4

बेस्ट पतपेढी निवडणुकीच्या निमित्ताने शिवसेना ठाकरे गट आणि मनसेची एकत्रित बैठक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.