वाकड्यात काम करण्यासाठी तुम्हाला कृषीमंत्री पद दिलेलं नाही; दत्तात्रय भरणे यांच्या वक्तव्यावरुन रोहित पवारांची टीका
Rohit Pawar Marathi News : मुंबई : राज्याच्या राजकारणामध्ये अनेक मोठ्या घडामोडी घडत आहेत. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमुळे नवीन राजकीय समीकरणे तयार होण्याची शक्यता आहे. दरम्यान, भाजप नेत्यांनी शरद पवार गटाचे नेते व आमदार रोहित पवार यांच्याबाबत मोठा दावा केला आहे. आमदार रोहित पवार हेच भाजपमध्ये जाणार असल्याचा दावा भाजप नेते व मंत्री नितेश राणे यांनी केला आहे. भाजप नेते नितेश राणे हे नेहमी त्यांच्या वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत असतात. आता त्यांनी रोहित पवारांबाबत मोठा दावा केल्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आले आहे.
मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अनेक राजकीय विषयांवर भाष्य केले आहे. त्याचबरोबर आमदार रोहित पवार यांच्याबाबत दावा देखील केला आहे. नितेश राणे म्हणाले की, रोहित पवार हे 2019 सालीच भाजपात येणार होते. ते कुठल्या वेळी कोणत्या भाजपाच्या नेत्यांना भेटात हे आम्ही बोलायला लागलो तर रोहित पवार यांनात तोंड वाचवायला जागा राहणार नाही. रोहित पवार हे मनाने भाजपात आहेत. शरीराने शरद पवार यांच्या पक्षात आहेत, असा मोठा दावा नितेश राणे यांनी केला आहे. यामुळे चर्चांना उधाण आले आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
आमदार रोहित पवार हे युवा नेते असून राज्याच्या राजकारणातील एक तडफदार नेते म्हणून ओळखले जातात. पवार कुटुंबाचा राजकीय वारसा लाभलेले आमदार रोहित पवार यांचा विधीमंडळामध्ये आक्रमक पवित्रा दिसून येतो. त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्रामध्ये रोहित पवार यांची उत्तम पकड देखील दिसून येते. रोहित पवार हे अनेकदा भाजप आणि महायुतीवर जोरदार निशाणा साधताना दिसत असतात. मात्र आता भाजप नेते व मंत्री नितेश राणे यांनी त्यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यामुळे चर्चांना उधाण आले आहे. यावर आता रोहित पवार काय प्रतिक्रिया देणार याची सर्वांना उत्सुकता लागली आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
आमदार रोहित पवार यांनी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या भेटीवर प्रतिक्रिया दिली आहे. उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मनसे नेते राज ठाकरे हे मातोश्रीवर आले आहेत. तब्बल 20 वर्षानंतर राज ठाकरे हे मातोश्रीवर आल्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आले आहे. या भेटीवर रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, दोघा ठाकरे बंधूंच्या मागे असलेल्या फोटोतून स्व. बाळासाहेब ठाकरे साहेब हे एकप्रकारे त्यांना आशीर्वादच देतायेत की, भाऊ म्हणून तुम्ही दोघं असेच सोबत रहा…! अशा शब्दांत आमदार रोहित पवार यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
दोघा ठाकरे बंधूंच्या मागे असलेल्या फोटोतून स्व. बाळासाहेब ठाकरे साहेब हे एकप्रकारे त्यांना आशीर्वादच देतायेत की, भाऊ म्हणून तुम्ही दोघं असेच सोबत रहा…!@OfficeofUT @RajThackeray @ShivSenaUBT_ @mnsadhikrut #Thackeray pic.twitter.com/oDDk0IlO62
— Rohit Pawar (@RRPSpeaks) July 27, 2025