Obc leader Laxman hake controversial viral video on mali community political news
पुणे : राज्यामध्ये आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेमध्ये आला आहे. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील हे मुंबईमध्ये येत आंदोलन करणार आहेत. मराठा समाजाला ओबीसी अंतर्गत आरक्षण देण्यात यावे अशी मागणी जरांगे पाटील यांची आहे. तर त्यांच्या विरोधात ओबीसी नेते लक्ष्मण हाके आक्रमक भूमिका घेत आहेत. मात्र लक्ष्मण हाके यांचा सोशल मीडियावर सध्या व्हिडिओ व्हायरल होत आहे.
ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांची व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. यामध्ये लक्ष्मण हाके हे ओबीसी समाजाबाबत वादग्रस्त वक्तव्य करत असल्याचे दिसून आले आहे. “काय आहे, माळ्यांचं दुखणं एक आहे, ओबीसींचं नेतृत्व माळ्यांकडून धनगरांकडे चाललं आहे. ही त्यांची पोटशूळ” असं वक्तव्य संबंधित व्हायरल व्हिडिओत लक्ष्मण हाके करत असल्याचे दिसते. या व्हिडिओबाबत नवराष्ट्र कोणतीही पुष्टी देत नाही. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आता लक्ष्मण हाके यांनी आपली बाजू स्पष्ट केली आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
माध्यमांशी संवाद साधताना लक्ष्मण हाके यांनी आपले मत मांडले आहे. तसेच सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. माळी समाजाबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा व्हिडिओ समोर आल्यानंतर त्यांनी त्यावर स्पष्टीकरण दिले आहे. लक्ष्मण हाके म्हणाले की, हा व्हिडिओ माझा आहे. पण त्यातील आवाज आपला नाही. ओबीसी जातींमध्ये फुट पाडण्यासाठी आणि त्यांच्यात भांडणं लावण्यासाठी हा प्रकार करण्यात येत आहे. असं वक्तव्य करायला मी काही वेडा नाही, असे म्हणत लक्ष्मण हाके यांनी सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.
त्याचबबरोबर ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंनी मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांच्याविरोधात मोर्चा उघडला असताना हा व्हिडिओ समोर आल्याने ते अडचणीत आल्याचे बोलले जात आहे. मनोज जरांगे पाटील यांचा मराठा आरक्षणासाठी मुंबईमध्ये मोर्चा होणार आहे. त्यापूर्वी लक्ष्मण हाके यांचा व्हिडिओ समोर आल्यामुळे वादाला तोंड फुटले आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
कथित व्हायरल व्हिडिओवर ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनी देखील मत मांडले. ते म्हणाले की सोशल मीडियावर आपण सुद्धा हा व्हिडिओ पाहिला आहे. माळी समाजाने नवनाथ वाघमारे यांच्या आधी लक्ष्मण हाके यांचा सत्कार केला. त्यांचा सन्मान केला. त्याच हाकेंच्या तोंडून असं वक्तव्य निघत असेल तर खरंच दुर्देव आहे. आता ते बोलले किंवा नाही बोलले हे माहिती नाही. ते व्हिडिओत तरी बोललेले दिसत आहेत. त्यावर आता हाके प्रतिक्रिया देतील, असे देखील नवनाथ वाघमारे म्हणाले.