नरेंद्र मोदी अज्ञातवासात जाणार? फडणवीस ठरणार 'लंबी रेस का घोडा'...; ज्योतिषाच्या भाकिताने खळबळ
43rd All-India Astrology Conference: गेल्या काही दिवसांपासून पंतप्रदान नरेंद्र मोदी यांच्या निवृत्तीच्या चर्चा सुरू आहेत. पुढच्या महिन्यात नरेंद्र मोदी ७५ वर्षांचे होणार असून ते निवृत्त होणार असल्याचे बोलले जात आहे. अशातच एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी अज्ञातवासात जातील असं विधान एका ज्योतिष अभ्यासकाने केले आहे. त्यांच्या या विधानाने एकच खळबळ उडाली आहे. पुण्यात ४३ वे अखिल भारतीय ज्योतिष संमेलन आयोजित करण्यात आले आहे.
या संमेलनात देशभरातील ज्योतिष आणि ज्योतिष अभ्यासक सहभागी झाले आहेत. दोन दिवस चालणाऱ्या संमेलनात तरूणांसह वयोवृद्धांपर्यंत अनेक जण सहभागी झाले आहेत. या संमेलनात ज्योतिषाँनी राज्यातील राजकीय नेत्यांपासून पंतप्रधान नरेंद्र मोदींपर्यंत अनेकांच्या भविष्याबाबत भाकीते वर्तवली आहेत.
अशातच या संमेलनामध्ये सहभागी झालेल्या एका ज्योतिष अभ्यासकाने एक मोठे भाकित केलं आहे. त्याच्या भाकितामुळे एकच खळबळ उडाली आहे. ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पत्रिका खूपच मजबूत होती की त्यांनी संपूर्ण भारतावर आपले राज्य स्थापित केले. पंतप्रधान मोदींची पत्रिका खूपच मजबूत आहे. पण पुढील काही वर्षांत नरेंद्र मोदी राजकारण सोडून अध्यात्माकडे वळतील आणि अज्ञातवासात जातील.’ असे भाकित ज्योतिष अभ्यासकाने या भाकितामुळे राजकारणात चर्चांना उधाण आले आहे.
ज्योतिषांच्या मते, देवेंद्र फडणवीस हे ‘लंबी रेस का घोडा’ ठरतील आणि त्यांची राजकीय वाटचाल दिल्लीकडे होईल. दिल्लीत ते मोठ्या पदावर विराजमान होतील. अजित पवारांच्या पत्रिकेत संघर्ष दिसत असून, त्यांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद मिळेल; मात्र त्यासाठी त्यांना मोठा संघर्ष करावा लागेल, असे ज्योतिषांनी सांगितले.
उद्धव ठाकरे यांची सद्यस्थिती कठीण असली, तरी त्यांना हलक्यात घेणे धोकादायक ठरेल. राजकारणात त्यांचे अस्तित्व टिकून राहील, असा अंदाज वर्तवण्यात आला. तर, राज ठाकरे यांना भविष्यात कोणतेही राजकीय अस्तित्व नसेल, असा नकारात्मक अंदाज ज्योतिषाने व्यक्त केला.