Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 8 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Parliament Monsoon Session 2026: संसदेचा शेवटचा आठवडा वादळी ठरणार; काँग्रेस आक्रमक, दिल्लीत घडामोडींना वेग

Parliament, Monsoon Session: पावसाळी अधिवेशनाच्या सुरुवातीपासूनच विरोधी पक्ष अमित शाह यांनी २० जुलै रोजीच्या संसद मोर्चादरम्यान विद्यार्थी आंदोलनांवर झालेल्या लाठीचार्जच्या कारवाईवर सभागृहात चर्चा करावी, अशी मागणी करत आहेत. या अधिवेशनात या मुद्द्यावरून अनेकदा मतभेद निर्माण झाले आहेत.

  • By anuradha sagar
Updated On: Aug 08, 2026 | 12:38 PM
Parliament, Monsoon Session, Congress, Amit Shah, FCRA Bill,

Parliament, Monsoon Session, Congress, Amit Shah, FCRA Bill,

Follow Us
Follow Us:
  • संसदेत FCRA सुधारणा विधेयक १० ऑगस्ट रोजी लोकसभेत सादर केले जाण्याची शक्यता
  • FCRA विधेयक गृह मंत्रालयाशी संबंधित असल्याने गृहमंत्र्यांकडून चर्चेला उत्तर दिले जाण्याची शक्यता
  • काँग्रेसचा लोकसभा खासदारांना १० ते १२ ऑगस्टसाठी व्हीप जारी
Parliament Monsoon Session 2026: संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा शेवटचा आठवडा वादळी ठरण्याची शक्यता आहे. काँग्रेससह संपूर्ण विरोधी पक्ष, परकीय योगदान (नियमन) सुधारणा विधेयक (FCRA) च्या मुद्द्यावरून सरकारला कोंडीत पकडण्याची तयारी करत असल्याची माहिती आहे. शुक्रवारी दुपारी, काँग्रेसने आपल्या सर्व लोकसभा खासदारांना १०, ११ आणि १२ ऑगस्ट रोजी सभागृहात उपस्थित राहण्याचे निर्देश देणारा तीन ओळींचा व्हीप जारी केला. इतर विरोधी पक्षही लवकरच याच मार्गाचा अवलंब करतील अशी अपेक्षा आहे.

विरोधी पक्षांची रणनीती

गेल्या दोन आठवड्यांपासून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह संसदेत आले नव्हते. पण संसदेत FCRA सुधारणा विधेयक १० ऑगस्ट रोजी लोकसभेत सादर केले जाण्याची शक्यता आहे. हे विधेयक गृह मंत्रालयाशी संबंधित असल्याने, गृहमंत्री अमित शाह अधिवेशनादरम्यान सभागृहात उपस्थित राहू शकतात, असे सांगितले जात आहे.

Maharashtra Govt News: महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय; जिहाद आणि कट्टरतावादाला खतपाणी घालणाऱ्या ११४ साहित्यांवर बंदी

राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे यांच्या कार्यालयात शुक्रवारी सकाळी झालेल्या एका महत्त्वपूर्ण बैठकीत, काँग्रेससह इंडिया आघाडीतील इतर सर्व मित्रपक्षांच्या खासगारांनाही सोमवारपासून सभागृहात त्यांचे सर्व खासदार पूर्ण ताकदीनिशी उपस्थित राहण्याचा सल्ला दिला आहे.

पावसाळी अधिवेशनाच्या सुरुवातीपासूनच विरोधी पक्ष अमित शाह यांनी २० जुलै रोजीच्या संसद मोर्चादरम्यान विद्यार्थी आंदोलनांवर झालेल्या लाठीचार्जच्या कारवाईवर सभागृहात चर्चा करावी, अशी मागणी करत आहेत. या अधिवेशनात या मुद्द्यावरून अनेकदा मतभेद निर्माण झाले आहेत. पण गेल्या दोन आठवड्यांपासून अमित शाह सभागृहात न आल्याने विरोधक चांगलेच आक्रमक झाले आहेत.

काँग्रेसचे लोकसभा प्रतोद मणिकम टागोर म्हणाले, “आम्ही पुढील आठवड्यात होणाऱ्या मतदारसंघ पुनर्रचना आणि एफसीआरए विधेयकांसाठी तयार आहोत. अमित शाह १२ दिवसांपासून सभागृहात अनुपस्थित आहेत. आता ते देशभरात सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनांवरून लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न करतील.” असा आरोपही टागोर यांनी केला आहे.

Abhijeet Dipke vs Police: तो एक व्हिडीओ अन् अभिजीत दिपकेंचे पोलिस संरक्षण काढण्याची मागणी; नेमकं कारण काय?

एफसीआरए विधेयकावरून वाद का?

ख्रिश्चन संघटना आणि चर्च संस्थांनी, विशेषतः प्रस्तावित एफसीआरए दुरुस्ती विधेयकाबाबत चिंता व्यक्त केली आहे. त्यांचे म्हणणे आहे की, जर कायद्यात पूर्वलक्षी तरतूद समाविष्ट केली गेली, तर ज्या संघटनांचे एफसीआरए परवाने आधीच कालबाह्य झाले आहेत.  त्यांच्यावर त्यांच्या मालमत्ता आणि परदेशी देणग्यांशी संबंधित प्रकरणांसह नवीन कारवाई केली जाऊ शकते. तथापि, केंद्र सरकारने आधीच सूचित केले आहे की विधेयकात अशी कोणतीही दंडात्मक पूर्वलक्षी तरतूद समाविष्ट केली जाणार नाही.

विरोधी पक्षांची रणनीती

विरोधी पक्षांच्या सुत्रांच्या माहितीनुसार, विरोधी पक्षाचे नेते विधेयकावरील चर्चेत सहभागी होतील, परंतु अनेक तरतुदींना विरोध करतील. ते विद्यार्थ्यांची आंदोलने, पोलिसांची कारवाई आणि गृहमंत्री अमित शाह यांची संसदेतील अनुपस्थिती हे मुद्दे पुन्हा उपस्थित करण्याची तयारी करत आहेत.

तृणमूल काँग्रेसच्या एका वरिष्ठ खासदाराने दिलेल्य माहितीनुसार, पक्षाने आपल्या सर्व खासदारांना सोमवारपासून संसदेत उपस्थित राहण्याचे निर्देश दिले आहेत. काही पक्ष औपचारिक व्हीप जारी करतील, तर इतरांनी आपल्या खासदारांना अनौपचारिक सूचना दिल्या आहेत.

 

Web Title: Parliament monsoon session congress three line whip fcra amendment bill

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 08, 2026 | 12:38 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.