Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

PMC Election 2026: निवडणुकीआधी पोलिसांचा कडक वॉच; २० संशयित उमेदवारांच्या हालचालींवर करडी नजर

पुणे पोलिसांकडून उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी काही महत्त्वाची पडताळणी करण्यात आली होती. या पडताळणीवेळी पोलिसांसमोर एक धक्कादायक माहिती समोर आली.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Jan 07, 2026 | 03:50 PM
Police Surveillance 20 उमेदवारांकर पोलिसांची करडी नजर,

Police Surveillance 20 उमेदवारांकर पोलिसांची करडी नजर,

Follow Us
Close
Follow Us:
  •  निवडणुकीच्या तोंडांवर पुण्यातील गुन्हेगारीचा मुद्दा चर्चेत
  • भाजप राष्ट्रवादीला कोडींत पकडण्याची शक्यता
  • पुण्यातील सक्रीय गुन्हेगारी रेकॉर्ड असलेल्या २० उमेदवारांची यादी
PMC Election 2026: पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडांवर पुण्यातील गुन्हेगारीचा मुद्दा चर्चेत आला आहे. राज्यातील प्रमुख सत्ताधारी पक्षांकडून गुंडांना आणि त्यांच्या कुटुंबियांना तिकीटे दिल्याने पुण्यात उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे. त्यातच पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांची राष्ट्रवादी भाजपच्या विरोधात लढत असल्याने पुण्यातील गुन्हेगारीच्या मुद्द्यावरून भाजप राष्ट्रवादीला कोडींत पकडण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.

या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिस सक्रीय झाले आहेत. पुण्यातील सक्रीय गुन्हेगारी रेकॉर्ड असलेल्या २० उमेदवारांची यादी तयार केली आहे. ही यादी थेट मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठवण्यात आली आहे. राज्य सरकार आणि पोलिसांची या उमेदवारांकडे विशेष नजर ठेवली जाणार आहे. त्यामाध्यमातून निवडणूक प्रक्रिया शांततेत आणि पारदर्शपणे पार पाडण्यासाठी पुणे पोलिस अलर्ट झाले आहेत. (PMC Eletion 2026) 

Exclusive: मतदान की खेळ? नवी मुंबईत प्रभागानुसार चार मतदान, मतदार गोंधळात; सामन्यांचं मत नक्की कोणाला

पुणे पोलिसांकडून उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी काही महत्त्वाची पडताळणी करण्यात आली होती. या पडताळणीवेळी पोलिसांसमोर एक धक्कादायक माहिती समोर आली. पुण्यात अडीच हजार इच्छुकांपैकी 1545 जणांवर वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यात राजकीय गुन्ह्यांची नोंद असलेल्यांची संख्या सर्वाधिक आहेत. पण त्यापेक्षाही काही गंभीर गुन्ह्यांची नोंद असलेले अनेकजणांना उमेदवारी देण्यात आल्याचे दिसून आले आहे.

त्याहून गंभीर बाब म्हणजे, काही कुख्यात गुन्हेगारांचे नातेवाईकांना थेट प्रमुख राजकीय पक्षांकडून उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे पुण्यात प्रचारसभां चांगल्याच रंगणार असल्याचे दिसत आहे. पण त्याचवेळी या गुन्हेगार आणि त्यांच्या नातेवाईकांनाच उमेदवारी दिल्यामुळे पुण्यातील गुन्हेगारी कशी कमी होणार, असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे.

‘आरक्षणाचा लाभ घेतल्यानंतर पुन्हा सर्वसाधारण जागांवर प्रवेश नाही’; सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

महापालिका निवडणुकांच्या तोंडावर पोलिसांनी केलेल्या गुप्त माहिती आणि पडताळणीत पुण्यात सध्या २० सराईत गुन्हेगार निवडणुकीच्या रिंगणात सक्रीय आहेत. या सर्वांवर वेगवेगळ्या प्रकारच्या गुन्ह्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. निवडणूक प्रक्रियेदरम्यान कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पुणे पोलिसांनी २० जणांवर करडी नजर ठेवली आहे. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या उमेदवारांकूडन मतदारांवर दबाव टाकणे, दहशत निर्माण करणे, पैशांचा गैरवापर, समाज माध्यमांवरून अफवा पसरवणे किंवा विरोधकांना धमकावणे, असे कोणतेही प्रकार होऊ नयेत, यासाठी विशेष यंत्रणा तयार करण्यात आली आहे.

संशयित उमेदवारांच्या हालचालींची दररोज नोंद ठेवली जात असून त्यांच्या संपर्कातील व्यक्ती, बैठका, सोशल मीडिया पोस्ट्स आणि प्रचार पद्धतींवर पोलिसांचे बारकाईने लक्ष आहे. गरज भासल्यास कारवाई, प्रतिबंधात्मक तडीपारी, नोटिसा तसेच आचारसंहितेनुसार कठोर पावले उचलण्याचा इशारा देण्यात आला आहे.या यादीत सोनाली आंदेकर, लक्ष्मी आंदेकर, सूर्यकांत उर्फ बंडू आंदेकर, जयश्री मारणे, कल्याणी कोमकर आणि बापू नायर यांचा समावेश असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

 

Web Title: Pmc election 2026 police tighten vigil ahead of elections suspected candidates under daily surveillance

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 07, 2026 | 03:31 PM

Topics:  

  • Pune Police
  • Pune Politics

संबंधित बातम्या

भाजपच्या ‘मिशन 125’ ला अजितदादांचा ‘खो’; धास्तावलेल्या मुख्यमंत्र्यांकडून पुण्यातील बड्या नेत्यांची कानउघडणी !
1

भाजपच्या ‘मिशन 125’ ला अजितदादांचा ‘खो’; धास्तावलेल्या मुख्यमंत्र्यांकडून पुण्यातील बड्या नेत्यांची कानउघडणी !

PMC Election 2026: बाणेरमधील ‘विजयी संकल्प सभा’त भाजपला मोठा धक्का; सुस–म्हाळुंगेतील कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश
2

PMC Election 2026: बाणेरमधील ‘विजयी संकल्प सभा’त भाजपला मोठा धक्का; सुस–म्हाळुंगेतील कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

प्रभाग २६ मध्ये भाजपचा जयघोष; ‘काम करत आलोय, काम करत राहणार’ – ऐश्वर्या सम्राट थोरात यांचा विजयाचा निर्धार
3

प्रभाग २६ मध्ये भाजपचा जयघोष; ‘काम करत आलोय, काम करत राहणार’ – ऐश्वर्या सम्राट थोरात यांचा विजयाचा निर्धार

राघवेंद्र बाप्पू मानकर यांच्यासह भाजप उमेदवारांच्या प्रचाराला उदंड प्रतिसाद
4

राघवेंद्र बाप्पू मानकर यांच्यासह भाजप उमेदवारांच्या प्रचाराला उदंड प्रतिसाद

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.