प्रणिती शिंदे भाजपची बी टीम, त्यांच्यासोबत हातमिळवणी केली
सोलापूर : प्रणिती शिंदे या भाजपच्या बी टीम म्हणून काम करत असून, त्यांनी भाजपसोबत आतून हातमिळवणी केली असल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते शरद कोळी यांनी केला आहे. सोलापूर दक्षिण मतदारसंघात अपक्ष उमेदवार धर्मराज कडादी यांना मतदानाच्या दिवशी पाठिंबा जाहीर केला असल्याने शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते शरद कोली यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
हेदेखील वाचा : महाराष्ट्रासह झारखंडमध्ये पार पडले मतदान; राज्यात 60 टक्के तर एकट्या मुंबईत…
शरद कोळी म्हणाले, शिंदे कुटुंबाची ही शेवटची खासदारकी आहे, यापुढे तुम्हाला खासदारकी मिळणार नाही, असा इशारा शरद कोळी यांनी दिला आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा शिंदे कुटुंबाने केसाने गळा कापला आहे. भाजप उमेदवार सुभाष देशमुख यांना निवडून आणण्यासाठी प्रणिती शिंदे यांनी अपक्ष उमेदवाराला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे अपक्षाला मत म्हणजे भाजपला मत आहे. आपला उमेदवार हा अमर पाटील असून त्यालाच निवडून आणायचे आहे, असे आवाहन देखील शरद कोळी यांनी केले आहे.
पुढे बोलताना शरद कोळी म्हणाले, लोकसभेत भाजपच्या आमदारांनी मदत केल्यामुळे त्यांना निवडून आणण्यासाठी प्रणिती शिंदे यांनी अपक्ष उमेदवाराला पाठिंबा दिला आहे. सुशीलकुमार शिंदे आणि प्रणिती शिंदे यांनी सोलापूरचा विकास केलेला नाही. शिंदे कुटुंबाने आमचे आभार मानण्याऐवजी पाठीत खंजीर खुपसण्याचे काम केले आहे. ही माणसे धोकेबाज निघाली, गद्दारांकडून काय अपेक्षा करणार, असा सवालही शरद कोळी यांनी केला आहे.
दरम्यान, सुशीलकुमार शिंदे यांनी मतदानाच्या दिवशी सकाळीच मतदानानंतर सोलापूर दक्षिण गद्दारांकडून काय अपेक्षा करणार, असा सवालही शरद कोळी यांनी केला आहे.
दरम्यान, सुशीलकुमार शिंदे यांनी मतदानाच्या दिवशी सकाळीच मतदानानंतर सोलापूर दक्षिण मतदारसंघात अपक्ष उमेदवार धर्मराज कडादी यांना काँग्रेस पक्षाचा अधिकृत पाठिंबा जाहीर केला आहे. शिवसेनेने गडबड केली असून, त्यांनी घाईघाईने सोलापूर दक्षिण मतदारसंघात उमेदवार जाहीर केला असल्याचे शिंदे म्हणाले. हा पारंपारिक दृष्टीने काँग्रेसचा बालेकिल्ला आहे, फक्त एकदा शिवसेनेचा उमेदवार निवडून आला, त्यावर त्यांनी मतदारसंघावर दावा केला आहे, असेही सुशीलकुमार शिंदे म्हणाले होते.
संबंधित बातम्या : एक्झिट पोलनुसार महायुती, ‘मविआ’त कांटे की टक्कर; सत्तास्थापनेत राज ठाकरे किंगमेकर ठरणार? पहा आतली बातमी