स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये आता 'हा' पक्ष करणार एंट्री; सांगलीच्या जतमध्ये... (Photo Credit- Social Media)
नवी दिल्ली : महाराष्ट्रात एकाच टप्प्यात तर झारखंडमध्ये दोन टप्प्यात विधानसभा निवडणुकीसाठी मतदान घेण्यात आले. आता या निवडणुकीचे निकाल 23 नोव्हेंबरला जाहीर केले जाणार आहेत. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत राज्यात 65 टक्के मतदान झाले असून, त्यात सत्ताधारी भाजपच्या नेतृत्वाखालील महायुती आघाडीने सत्ता राखण्यासाठी जोरदार प्रयत्न केल्याचे दिसून आले.
संबंधित बातम्या : एक्झिट पोलनुसार महायुती, ‘मविआ’त कांटे की टक्कर; सत्तास्थापनेत राज ठाकरे किंगमेकर ठरणार? पहा आतली बातमी
गेल्या वेळेच्या तुलनेत यावर्षी कमी मतदान झाल्याचे सांगितले जात आहे. 2019 मध्ये 61.74 टक्के मतदान झाले होते. आता मात्र, हा आकडा 65 टक्क्यांवर आला आहे. महायुतीत भाजपने 149 जागांवर, शिवसेनेने 81 जागांवर उमेदवार उभे केले होते आणि अजित पवारांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीने 59 जागांवर उमेदवार उभे केले होते. तर विरोधी महाविकास आघाडीत काँग्रेसने 101, शिवसेना (UBT) 95 आणि NCP (SP) 86 उमेदवार उभे केले.
दरम्यान, नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यात बुधवारी ६९.६३ टक्के, तर मुंबईत ५१.४१ टक्के मतदान झाले. 2019 च्या निवडणुकीत मुंबईतील मतदानाचा आकडा 50.67 टक्के होता. 288 विधानसभा जागांसाठी सकाळी 7 वाजता मतदानाला सुरुवात झाली आणि 1,00,186 मतदान केंद्रांवर 4,100 हून अधिक उमेदवारांचे भवितव्य ठरले, जे 2019 च्या निवडणुकीत 96,654 केंद्रांपेक्षा जास्त होते.
झारखंडमध्ये शांततेत मतदान; 68 टक्के मतदारांनी बजावला हक्क
झारखंडमध्ये बुधवारी विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या आणि शेवटच्या टप्प्यात ३८ जागांवर शांततेत मतदान झाले, ज्यामध्ये १.२३ कोटी मतदारांपैकी ६८ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. 2019 मध्ये झालेल्या 67.04 टक्के मतदानापेक्षा हे प्रमाण अधिक असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. पहिल्या टप्प्यात 43 जागांवर 66 टक्के मतदान झाले असून, त्यामुळे आतापर्यंत 81 सदस्यीय झारखंड विधानसभेच्या निवडणुका पूर्ण झाल्या आहेत.
अनेक संस्थांचे एक्झिट पोल समोर
मतदान पूर्ण झाल्यानंतर अनेक कंपन्यांचे एक्झिट पोल समोर आले आहेत. काही एक्झिट पोलनुसार राज्यात महायुतीला तर काही पोलनुसार महाविकास आघाडीला यश मिळण्याची शक्यता आहे. मात्र, लढत ही अत्यंत चुरशीची होणार आहे. त्यामुळे कदाचित या निवडणुकीत राज ठाकरे हे महत्वाचे ठरण्याची शक्यता आहे.
मनसेने 128 जागांवर उभे केले उमेदवार
मनसेने 128 जागांवर आपले उमेदवार उभे केले आहेत. यामुळे काही ठिकाणी महायुती आणि महाविकास आघाडीला नुकसान होण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. तर एका मुलाखतीमध्ये यावेळेस भाजपचा मुख्यमंत्री तर 2029 मध्ये मनसेचा मुख्यमंत्री होईल, असे वक्तव्य केले होते. सध्या समोर आलेल्या एक्झिट पोलनुसार महायुतीची सत्ता येण्याचा अंदाज आहे.
हेदेखील वाचा: Maharashtra Exit Polls 2024: महाराष्ट्राच्या जनतेनं कौल दिला; एक्झिट पोलमध्ये समोर आली आश्चर्यकारक आकडेवारी