Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

प्रताप सरनाईक यांची शरद पवारांच्या सिल्व्हर ओक निवासस्थानी भेट! राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

शिवसेना (शिंदे गट) चे आमदार आणि मंत्री प्रताप सरनाईक यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची त्यांच्या 'सिल्व्हर ओक' निवासस्थानी भेट घेतली, ज्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Oct 23, 2025 | 08:27 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:

शिवसेना (शिंदे गट) चे आमदार आणि राज्याचे मंत्री प्रताप सरनाईक यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची मुंबईतील ‘सिल्व्हर ओक’ या त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. ही भेट घेताच राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं असला, तरी सरनाईक यांनी ती केवळ दिवाळीच्या सदिच्छा भेटीपुरतीच असल्याचे स्पष्ट केले.

कर्जत-जामखेडमध्ये राजकीय खळबळ! सभापती प्रा. राम शिंदे यांची राजेंद्र फाळके यांना सदिच्छा भेट

सरनाईक यांनी सांगितले की, “दरवर्षीप्रमाणे यंदाही मी शरद पवार साहेबांना दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी भेटलो. ही भेट फक्त आदर आणि सदिच्छेच्या भावनेतून झाली असून, तिचा राजकारणाशी काहीही संबंध नाही.” त्यांनी पवारांसोबतच्या चर्चेत कोणतेही राजकीय विषय झाले नसल्याचेही ठामपणे नमूद केले.

शरद पवार आणि प्रताप सरनाईक यांच्यातील संबंध पूर्वीपासूनच सौहार्दपूर्ण राहिले आहेत. त्यामुळे या भेटीला काहींनी राजकीय अर्थ लावला असला, तरी दोन्ही नेत्यांच्या जवळच्या सूत्रांनी ही भेट केवळ सौजन्यपूर्ण असल्याचे सांगितले आहे.

दरम्यान, राज्यातील बदलत्या राजकीय समीकरणांच्या पार्श्वभूमीवर सरनाईक-पवार भेटीने नवा अंदाज निर्माण केला आहे. अलीकडच्या काळात विरोधकांमध्येही संवादाचे पूल बांधले जात असल्याचे चित्र आहे. त्यातच सत्ताधारी गटातील प्रमुख नेत्याची विरोधी गटाच्या ज्येष्ठ नेत्याशी झालेली भेट या चर्चांना अधिक चालना देणारी ठरली. सरनाईक यांनी मात्र माध्यमांशी बोलताना कोणत्याही राजकीय चर्चेला थारा न देता सांगितले की, “पवार साहेबांविषयी माझ्या मनात कायम आदर आहे. मी त्यांच्या आशीर्वादासाठी गेलो होतो. यामध्ये कोणताही राजकीय हेतू नाही.”

Gopinath Munde heir: दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचा खरा वारसदार कोण? पंकजा अन् धनंजय वरुन नेत्यांमध्ये रंगला कलगीतुरा 

राजकीय निरीक्षकांच्या मते, महाराष्ट्राच्या सध्याच्या राजकारणात प्रत्येक हालचाल लक्षवेधी ठरत आहे. त्यामुळे सरनाईक-पवार भेट ही दिवाळीच्या निमित्ताची सदिच्छा भेट असली, तरी तिचा राजकीय अर्थ लावण्याचा मोह अनेकांना आवरलेला नाही.

Web Title: Pratap sarnaiks visit to sharad pawars silver oak residence

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 23, 2025 | 08:27 PM

Topics:  

  • Pratap Sarnaiik
  • Sharad Pawar

संबंधित बातम्या

Pune Breaking News: ठरलं तर…! पुणे महापालिकेसाठी शरद पवार-अजित पवार एकत्र येणार, तारीखही निश्चित
1

Pune Breaking News: ठरलं तर…! पुणे महापालिकेसाठी शरद पवार-अजित पवार एकत्र येणार, तारीखही निश्चित

Pune Election 2026: दोन्ही राष्ट्रवादीच्या एकत्रिकरणाला प्रशांत जगतापांचा विरोध; शरद पवार घेणार मोठा निर्णय?
2

Pune Election 2026: दोन्ही राष्ट्रवादीच्या एकत्रिकरणाला प्रशांत जगतापांचा विरोध; शरद पवार घेणार मोठा निर्णय?

महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या घडामोडी; संजय राऊत घेणार शरद पवारांची भेट, कारण…
3

महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या घडामोडी; संजय राऊत घेणार शरद पवारांची भेट, कारण…

लवासाच्या ‘त्या’ प्रकरणावर न्यायालयाने निर्णय ठेवला राखून; पवार कुटुंबीयांची होणार कोंडी?
4

लवासाच्या ‘त्या’ प्रकरणावर न्यायालयाने निर्णय ठेवला राखून; पवार कुटुंबीयांची होणार कोंडी?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.