Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 24 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

ZP Election 2026: तासगावमध्ये शरद पवार गटाच्या उमेदवारांना मिळतोय सकारात्मक प्रतिसाद

NCP Sharad Pawar: उमेदवार सकाळपासून पायाला भिंगरी लावून घराघरांत पोहोचत असून, थेट वैयक्तिक भेटी घेत मतदान रूपी आशीर्वाद मागत आहेत.

  • By तेजस भागवत
Updated On: Feb 04, 2026 | 06:53 PM
ZP Election 2026: तासगावमध्ये शरद पवार गटाच्या उमेदवारांना मिळतोय सकारात्मक प्रतिसाद

ZP Election 2026: तासगावमध्ये शरद पवार गटाच्या उमेदवारांना मिळतोय सकारात्मक प्रतिसाद

Follow Us
Follow Us:

सावळज जि.प. गटात राष्ट्रवादी (श. प.)चा जोर
सर्व गावांतून उमेदवारांना उत्स्फूर्त पाठिंबा
प्रचाराने घेतला चांगलाच वेग

तासगाव: तासगाव तालुक्यातील सावळज जिल्हा परिषद गटात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रचाराने चांगलाच वेग घेतला असून, वायफळे, वडगाव, सावळज, जरंडी, डोंगरसोनी, सिद्धेवाडी, दहिवडी, अंजनी, नागेवाडी, यमगरवाडी आणि लोकरेवाडी या सर्व गावांत पक्षाच्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या उमेदवारांना मोठा व सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याचे स्पष्ट चित्र आहे. निवडणूक जसजशी जवळ येत आहे, तसतसे संपूर्ण गटातील वातावरण राष्ट्रवादी (श. प.)च्या बाजूने झुकताना दिसत आहे.

सावळज जिल्हा परिषद गटासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून ॲड. विजय धेंडे निवडणूक रिंगणात असून, सावळज पंचायत समिती गणातून प्रकाश पाटील तर वायफळे पंचायत समिती गणातून पंकज उर्फ जितेंद्र झांबरे-पाटील मतदारांसमोर आहेत. सुशिक्षित, अभ्यासू आणि स्वच्छ प्रतिमेच्या या उमेदवारांबाबत संपूर्ण गटातील मतदारांकडून सकारात्मक प्रतिक्रिया उमटत आहेत. ‘काम करणारे आणि विश्वासार्ह चेहरे’ अशी भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे.

आमदार रोहित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समर्थक संघटितपणे प्रचारात उतरले आहेत. उमेदवार सकाळपासून पायाला भिंगरी लावून घराघरांत पोहोचत असून, थेट वैयक्तिक भेटी घेत मतदान रूपी आशीर्वाद मागत आहेत. भाषणांपेक्षा थेट संवाद, स्थानिक प्रश्नांची जाण आणि विकासकामांची स्पष्ट मांडणी यामुळे प्रचाराला प्रभावी धार मिळाली आहे.

प्रचाराच्या दरम्यान स्वर्गीय आर. आर. आबा पाटील व स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या स्मृतीस अभिवादन करण्यात येत असून, ‘आबा पाटलांचा बालेकिल्ला अबाधित ठेवण्याचा’ निर्धार कार्यकर्त्यांच्या जोशातून प्रकर्षाने जाणवतो. एकूणच संघटित प्रचार, स्थानिक नेतृत्वाची मजबूत पकड आणि विकासाभिमुख भूमिका यामुळे सावळज जिल्हा परिषद गटात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची आघाडी अधिक भक्कम होत असल्याचे राजकीय जाणकारांकडून सांगितले जात आहे.

 

Web Title: Sharad pawar ncp received good response zp elections 2026 tasgaon politics news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 04, 2026 | 06:53 PM

Topics:  

  • Sharad Pawar
  • Tasgaon
  • ZP Election 2026

संबंधित बातम्या

Maharashtra Drought : ‘तर राज्यात दुष्काळच पडला नसता..,’ शरद पवारांच्या दुष्काळ दौऱ्यावर जयकुमार गोरेंचा खोचक टोला
1

Maharashtra Drought : ‘तर राज्यात दुष्काळच पडला नसता..,’ शरद पवारांच्या दुष्काळ दौऱ्यावर जयकुमार गोरेंचा खोचक टोला

Devendra Fadnavis : शरद पवारांचं मुख्यमंत्र्यांना पत्र, फडणवीसांचा मोठा निर्णय; ‘या’ तारखेनंतर दुष्काळी परिस्थितीचे पंचनामे करणार!
2

Devendra Fadnavis : शरद पवारांचं मुख्यमंत्र्यांना पत्र, फडणवीसांचा मोठा निर्णय; ‘या’ तारखेनंतर दुष्काळी परिस्थितीचे पंचनामे करणार!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.