Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

BMC Politics : मुंबईमध्ये शरद पवारांनी फिरवली भाकरी; राष्ट्रवादीने ठाकरे बंधूंना सोडून दिली महायुतीला साथ

शरद पवार गटाचे एकमेव नगरसेवक अजित रावराणे यांनी सत्ताधारी महायुतीला पाठिंबा जाहीर केला आहे. या निर्णयामुळे ठाकरे बंधूंना मोठा झटका बसला आहे, यामुळे बीएमसीमध्ये राजकारण बदलले आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Feb 06, 2026 | 04:31 PM
NCP Sharad Pawar has extended support to Eknath Shinde's Shiv Sena in BMC

NCP Sharad Pawar has extended support to Eknath Shinde's Shiv Sena in BMC

Follow Us
Close
Follow Us:
  • BMC च्या राजकारणामध्ये मोठा बदल
  • राष्ट्रवादी शरद पवार गटाची महायुतीला साथ
  • ठाकरे गटाला दिला मोठा धक्का
BMC Politics : मुंबई : सर्वात जास्त चर्चेत असलेली आणि श्रीमंत असलेल्या महापालिका मुंबई महापालिकेबाबत (BMC Elections) आणखी एक धक्कादायक दावा समोर आला आहे. मुंबईच्या राजकारणामध्ये मोठा ट्वीस्ट आला असून आता शरद पवारांनी डाव खेळला आहे. मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये शिवसेना ठाकरे गट, मनसे आणि राष्ट्रवादी शरद पवार गट (Sharad Pawar) यांनी एकत्रित निवडणूक लढवली होती. मात्र आता राष्ट्रवादी शरद पवार गटाने ठाकरे बंधूंना सोडून दिली भाजपला साथ देण्याचा निर्णय घेतला आहे.

महाविकास आघाडीचे घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचा एकमेव नगरसेवक अजित रावराणे आहे. त्यांनी आता महायुतीला पाठिंबा देत असल्याचे स्पष्टपणे जाहीर केले आहे. नगरसेवक अजित रावराणे यांनी सत्ताधारी महायुतीला पाठिंबा जाहीर केला आहे. या निर्णयामुळे ठाकरे बंधूंना मोठा झटका बसला आहे. यामुळे महापालिकेत आता दोन्ही राष्ट्रवादी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पाठीशी उभ्या असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये ठाकरे गटाला पुन्हा एकदा धक्का बसला आहे.

हे देखील वाचा : ‘मी देवेंद्र फडणवीस यांचा लाडका मंत्री, तुम्हाला पाहिजे तेवढा निधी देऊ शकतो’; नितेश राणे यांचं विधान

मीडिया रिपोर्टनुसार, मालाडमधील प्रभाग क्रमांक ४३ मधून अजित रावराणे हे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नगरसेवक आहेत. आणि ते एकमेव शरद पवार गटाचे मुंबईमधील नगरसेवक आहेत. त्यांनी नुकतीच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. या भेटीत त्यांची विविध मुद्द्यांवर सविस्तर चर्चा झाली. या चर्चेनंतर रावराणे यांनी महायुतीच्या गोटात सामील होण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे शरद पवार गटाचा हा सत्ताधाऱ्यांना पूर्णपणे पाठिंबा असल्याचे दिसून आले आहे.

महायुतीला पाठिंबा दिल्यानंतर अजित रावराणे यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. यावेळी त्यांनी दोन महत्त्वाच्या मुद्द्यांवर भर दिला आहे. ते म्हणाले की, गेल्या काही काळापासून प्रभागातील विकासकामांसाठी आवश्यक असणारा निधी मिळवण्यात अडचणी येत होत्या. सत्ताधाऱ्यांसोबत गेल्याशिवाय विकास शक्य नाही. तसेच प्रलंबित प्रकल्पांना गती देण्यासाठी महायुती सरकारकडून सहकार्य मिळवण्याचे आश्वासन मिळाले आहे, त्यामुळे मी पाठींबा जाहीर केला आहे, असे स्पष्ट मत अजित रावराणे यांनी व्यक्त केले आहे.

हे देखील वाचा :  Eknath Shinde News: एकनाथ शिंदे वाढदिवस साजरा करणार नाहीत; काय आहे कारण?

राज्यामध्ये सर्वात जास्त चर्चेत राहिलेली महापालिका ही मुंबई महापालिका राहिली आहे. या पालिकेमध्ये मागील 25 वर्षांपासून शिवसेनेची सत्ता होती. मात्र भाजपला शिवसेनेची सत्ता मोडण्यास यश आले आहे. यावेळी झालेल्या निवडणुकीमध्ये महायुतीला जनतेची भक्कम साथ असल्याचे दिसून आले आहे. महायुतीमध्ये अजित पवार गट हा आधीपासून भाजप व शिंदेसेनेचा पाठिशी होती. यानंतर आता शरद पवार गटातील एकमेव नगरसेवकाने देखील महायुतीला साथ दिली आहे. त्यापूर्वी संपूर्ण राष्ट्रवादी ही महायुतीमध्ये असल्याचे स्पष्ट झाले आहे. तसेच आगामी महापौर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अपक्ष आणि छोट्या गटांच्या नगरसेवकांना वळवण्यात शिंदे गटाला यश येत आहे.

 

Web Title: Ncp sharad pawar has extended support to eknath shindes shiv sena in bmc

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 06, 2026 | 04:31 PM

Topics:  

  • BMC Election 2026
  • Mahayuti Politics
  • Sharad Pawar

संबंधित बातम्या

Sharad Pawar यांची हर्षवर्धन सदगीरला आंतरराष्ट्रीय तयारीसाठी १२ लाखांची शिष्यवृत्ती
1

Sharad Pawar यांची हर्षवर्धन सदगीरला आंतरराष्ट्रीय तयारीसाठी १२ लाखांची शिष्यवृत्ती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.