600 Codeine Syrup Bottles Seized ( कोडीन सिरपच्या ६०० बाटल्या जप्त )
पोलिसांनी तब्बल तीन तास सापळा रचून आरोपींची वाट पाहिली; मात्र ते परतलेच नाहीत. अखेर पोलिसांनी कारसह सव्वा लाख रुपयांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त केला. १४ नोव्हेंबर रोजी रात्री ही कारवाई करण्यात आली.अमली पदार्थ प्रतिबंधक पथकाचे सहायक निरीक्षक सचिन जाधव यांना बातमीदाराकडून कटकट गेट येथील सदफ कॉलनी, गल्ली क्रमांक दोनमध्ये समोसा गार्डनजवळ उभ्या असलेल्या पांढऱ्या रंगाच्या कारमध्ये (एमएच ०२ ईझेड ९६६०) कोडेन सिरपचा मोठा साठा असल्याची माहिती मिळाली.
एसटी बसचा भीषण अपघात, ब्रेक निकामी झाल्याने बस खड्ड्यात उलटली; जखमींचा आकडाही समोर
त्यानुसार उपनिरीक्षक उत्तरेश्वर मुंडे यांच्यासह पथकाने घटनास्थळी धाव घेत सापळा रचला. संशयित कार जागेवर आढळली; मात्र पोलिसांची चाहूल लागल्याने आरोपी कारजवळ आलेच नाहीत. गुन्हे शाखेचे निरीक्षक गजानन कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक सचिन जाधव, उपनिरीक्षक उत्तरेश्वर मुंडे, हवालदार सतीश जाधव, देशराज मोरे, विशाल मेटे, नितेश सुंदर्डे, सरताज पठाण आणि चालक होमगार्ड पठाण यांच्या – पथकाने ही कारवाई केली.
संशयित परत येतील, या अपेक्षेने पोलिसांनी सुमारे तीन तास परिससत पाळत ठेवली. मात्र, कोणीही फिरकले नाही. पंचासमक्ष कारची तपासणी करण्यात आली. त्यात कोडेन सिरपच्या ६०० बाटल्या आढळून आल्या. पोलिसांनी सिरपचा साठा आणि कार जप्त केली, तांत्रिक विश्लेषणातून कारमालक अयफाझ जब्बार शेख (रा. गल्ली क्रमांक १, चिश्तिया मस्जिदजवळ, संगमनेर, जि. अहिल्यानगर) याचे नाव समोर आले. याप्रकरणी शेख याच्यासह दोघांवर गुन्हा दाखल केला.
Amravati News: भाववाढीच्या प्रतीक्षेत कापूस घरातच! सोयाबीनची आवकही घटली; ४ दिवसांत दरात झाली घसरण
Ans: कारमधून कोडेन सिरपच्या ६०० बाटल्या जप्त केल्या.
Ans: कटकट गेट परिसरातील सदफ कॉलनी, गल्ली क्रमांक दोन येथे ही कारवाई केली.
Ans: १४ नोव्हेंबर २०२६ रोजी रात्री ही कारवाई केली.






