: झेंडे वेगवेगळे पण उद्देश एकच!; CJP नेत्यांच्या अटकेनंतर राहुल गांधींची टिका
Rahul Gandhi on CJP leaders Arrest: जंतर मंतरवर तिरंगा फडकवणे हा गुन्हा नाही. यासाठी तरुणांना तुरुंगात टाकणे हा भ्याडपणा आहे.” अशी टिका करत लोकसभेचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी भाजप आणि मोदी सरकारवर जोरदार हल्ला चढवला. जंतरमंतर मैदानात तिरंगा फडकावून घोषणाबाजी केल्याप्रकरणी कॉकरोच जनता पार्टीचे नेते सौरभ दास आणि आशुतोष रांका यांना बुधवारी पाच दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. यावरून राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर टिकास्त्र डागले आहे.
‘एक्स’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करत काँग्रेस खासदार म्हणाले, ” जंतर-मंतरवर शांततापूर्ण आंदोलनादरम्यान तिरंगा फडकवणे हा काही गुन्हा नाही. त्यासाठी तरुणांना तुरुंगात डांबणे हा भ्याडपणा आहे. विद्यार्थी, तरुण, पत्रकार आणि ‘इंडिया’ (INDIA) आघाडी… संघटना वेगळ्या असल्या, तरी उद्दिष्ट एकच आहे. सर्व आंदोलनांचा सूर एकच आहे: देशवासी आपल्या घटनात्मक हक्कांची मागणी करत आहेत. जंतर-मंतर भारताच्या जनतेचे आहे आणि आपण ते पुन्हा मिळवूनच राहू!” असं राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.
राहुल म्हणाले की, विविध नागरी समाज गट, विद्यार्थी आणि इंडिया ब्लॉक यांची आंदोलने ही वास्तविक पाहता एकाच चळवळीचा भाग आहेत, जरी त्यांचे झेंडे वेगवेगळे असले तरी. विद्यार्थी, तरुण, पत्रकार, इंडिया ब्लॉक… झेंडे वेगवेगळे आहेत, पण उद्देश एकच आहे. सर्व आंदोलने एकच आहेत. नागरिक आपल्या घटनात्मक हक्कांची मागणी करत आहेत.
गेल्या १०-१२ दिवसांत देशातील विरोधी इंडिया आघाडी आणि कॉकरोच जनता पार्टीने दिल्लीत मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात निदर्शने केली.या निदर्शनांमुळे केंद्र सरकारचा ताणही चांगलाच वाढला आहे. या सर्व घटनांच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने दोन दिवसांपूर्वी जंतरमंतर मैदान आंदोलन स्थळ म्हणून रद्द करत असल्याची घोषणा केली. यानंतरही सीजेपीच्या नेत्यांनी आपण जंतरमंतरवरच आंदोन करणार असल्याचा पवित्रा घेतला आणि काल दुपारी गनिमी काव्याने जंतरमंतरवर प्रवेश करत तिरंगा फडकावला आण घोषणाबाजीही केली.
परवानगीशिवाय जंतर मंतर परिसरात प्रवेश केल्याबद्दल आशुतोष रांका, सौरव दास आणि अजिंक्य शिंदे यांना मंगळवारी प्रतिबंधात्मक कोठडीत घेण्यात आले. त्यांना बुधवारी सकाळी मंदिर मार्ग पोलीस ठाण्यात विशेष कार्यकारी दंडाधिकारी (एसईएम) यांच्यासमोर हजर करण्यात आले.
8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! 18 हजारांचा पगार थेट 69 हजारांवर जाणार? कसं
सुनावणीदरम्यान, दंडाधिकाऱ्यांनी आशुतोष रांका आणि सौरव दास यांना शांतता कराराचे उल्लंघन करून जंतर मंतरमध्ये प्रवेश केल्याबद्दल दोषी ठरवत त्यांना पाच दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत तिहार तुरुंगात पाठवण्यात आले. तर, अजिंक्य शिंदे यांची ५,००० रुपयांच्या जामीनावर सुटका करण्यात आली. जंतर मंतर आता आंदोलनाचे ठिकाण म्हणून ओळखले जात नाही.
अभिजीत दिपके म्हणाले की, मी नरेंद्र मोदींना सांगू इच्छितो की तुम्हाला देशात आणीबाणी लावायचीच असेल तर ती अधिकृतपणे जाहीर करा. सीजेपीच्या नेत्यांना फक्त जंतरमंतरवर तिरंगा फडकवल्यामुळे तुम्ही भित्र्याप्रमाणे तुम्ही पाच दिवस तुरूंगात टाकत आहात. असं तर आणीबाणीच्या काळातही झाले नव्हते, तिरंगा फडकावणे हे कधीपासून पाप मानले जात आहे. असे भित्र्यासारखे वागू नका. तुमच्यात दम असेल तर आणीबाणीची अधिकृत घोषणा करा. असे आव्हानही अभिजीत दिपकेंनी दिले आहे.
दरम्यान, ताब्यात असलेल्या सीजेपीच्या नेत्यांना राहुल गांधी यांनी उघडपणे पाठिंबा दिल्याने काँग्रेसच्या भूमिकेत बदल झाल्याची चर्चा सुरू झाली आहे. आंदोलन सुरू असताना सीजेपीपासून अंतर ठेवल्याबद्दल काँग्रेसवर टीका होत होती. या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांनी दिलेला पाठिंबा महत्त्वाचा मानला जात आहे.
मंगळवारी सकाळी सीजेपीच्या नेत्यांसह १४ जणांनी गेट आणि बॅरिकेड्स ओलांडून जंतर मंतर परिसरात प्रवेश केला. त्यानंतर त्यांनी तिरंगा फडकावत घोषणाबाजी केली. या घटनेनंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आणि नंतर अटक केली.
परवानगीशिवाय जंतर मंतर परिसरात प्रवेश करणे आणि जामिनाच्या अटींचे उल्लंघन करणे, असे आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आल्याचे वृत्त आहे. १० ऑक्टोबर रोजी होणाऱ्या आंदोलनाचे नेतृत्व करण्यासाठी हे नेते दिल्लीत दाखल झाले होते. त्यावेळी विमानातूनच त्यांना ताब्यात घेण्यात आले होते. याच्या अवघ्या एक दिवस आधी त्यांनी जामिनाच्या अटी मान्य केल्या होत्या.
Waving the Tricolour at Jantar Mantar in a peaceful protest is not a crime. Jailing youth for it is an act of cowardice.
Students. Youth. Journalists. The INDIA bloc. Different banners, one cause. All protests are one: citizens demanding their constitutional rights.
Jantar Mantar belongs to the people of India. We will reclaim it.
— Rahul Gandhi (@RahulGandhi) October 14, 2026






