Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

कल्याण शीळ रस्त्यावरील वाहतूक कोंडीवर राजू पाटील यांची प्रशासनावर टीका

कल्याण शीळ रस्त्यावर मेट्रोच्या कामामुळे गंभीर वाहतूक कोंडी झाली, ज्यामुळे नागरिक आणि शाळकरी विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागला. या परिस्थितीवर मनसे नेते राजू पाटील यांनी संताप व्यक्त केला.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Mar 26, 2025 | 08:58 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:

कल्याण शीळ रस्त्यावर पुन्हा एकदा तीव्र वाहतूक कोंडी निर्माण झाली. या कोंडीमुळे सामान्य नागरिकांसह शाळकरी विद्यार्थ्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागला. वाहतूक कोंडी इतकी गंभीर होती की विद्यानिकेतन शाळेला दुपारच्या सत्रातील पाचवी ते आठवीच्या वर्गांना सुट्टी जाहीर करावी लागली. या परिस्थितीवर मनसे नेते राजू पाटील यांनी संताप व्यक्त करत प्रशासनावर निशाणा साधला. त्यांनी स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा याचे गाणे ट्वीट करून, “धन्यवाद कुणाल कामरा, आम्हा डोंबिवलीकरांच्या व्यथा मांडल्याबद्दल,” असे म्हणत एमएमआरडीए आणि बिल्डर लॉबीवर जोरदार टीका केली.

कल्याण शीळ रस्ता गेल्या अनेक वर्षांपासून वाहतूक कोंडीचा केंद्रबिंदू बनला आहे. रस्त्याचे रुंदीकरणाचे काम दीर्घकाळ प्रलंबित आहे, त्यातच आता मेट्रोचे काम हाती घेण्यात आले आहे. या रस्त्यावर एमएमआरडीए, एमएसआरडीसी, एमएसईबी आणि वाहतूक पोलिस यांच्यात समन्वयाचा अभाव असल्याने वाहतूक व्यवस्थापन कोलमडले आहे. आज सकाळी मेट्रोच्या कामासाठी बॅरिकेटिंग करण्यात आल्याने मानपाडा रोड परिसरात मोठ्या प्रमाणात वाहने अडकली. याचा परिणाम ऑफिसला जाणाऱ्या नागरिकांवर आणि शाळकरी विद्यार्थ्यांवर झाला. रस्त्यावर वाहनांच्या रांगा लागल्या असून पर्यायी मार्ग नसल्याने वाहनचालकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला.

या परिस्थितीवर मनसे नेते राजू पाटील यांनी ट्विटरच्या माध्यमातून प्रशासनाला लक्ष्य केले. त्यांनी कुणाल कामराच्या गाण्याचा संदर्भ घेत एमएमआरडीए आणि बिल्डर लॉबीवर हल्लाबोल केला. त्यांनी ट्वीटमध्ये “बिल्डरांची मेट्रो # एमएमआरडीए, # टक्केवारी, # कुणाल कामरा” असे लिहीत प्रशासनाच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

धन्यवाद @kunalkamra88 , आम्हा डोंबिवलीकरांच्या व्यथा मांडल्याबद्दल ! #बिल्डरांची_मेट्रॅा #MMRDA #MSRDC #टक्केवारी #kunal_kamra pic.twitter.com/R7smgHaymm

— Raju Patil ( प्रमोद (राजू) रतन पाटील ) (@rajupatilmanase) March 26, 2025

Web Title: Raju patil criticizes the administration over traffic congestion on kalyan sheel road

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 26, 2025 | 08:57 PM

Topics:  

  • kalyan news
  • raju patil

संबंधित बातम्या

Kalyan : कल्याणमध्ये पावसामुळे कोसळली घराची भिंत ‪
1

Kalyan : कल्याणमध्ये पावसामुळे कोसळली घराची भिंत ‪

Kalyan : खड्ड्यांनी घेतला एकुलत्या भावाचा बळी, कल्याणमधील हृदयद्रावक घटना
2

Kalyan : खड्ड्यांनी घेतला एकुलत्या भावाचा बळी, कल्याणमधील हृदयद्रावक घटना

Raju Patil: “१५ ॲागस्टला मांसाहारी हॅाटेल्स बंद ठेवणार का?” राजू पाटील यांचा संतप्त सवाल
3

Raju Patil: “१५ ॲागस्टला मांसाहारी हॅाटेल्स बंद ठेवणार का?” राजू पाटील यांचा संतप्त सवाल

Kalyan News : घोटाळेबाज बिल्डरांना अभय कोणाचं ? 14 वर्ष घराचा ताबा मिळाला नाही, संतप्त नागरिकांचं आमरण उपोषण
4

Kalyan News : घोटाळेबाज बिल्डरांना अभय कोणाचं ? 14 वर्ष घराचा ताबा मिळाला नाही, संतप्त नागरिकांचं आमरण उपोषण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.