
Ramesh Karad controversial statement comparing Latur Gramin with Pakistan Rohit Pawar shares video
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे काल लातूर दौऱ्यावर होते. लातूरमध्ये दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचा पूर्णाकृती पुतळा बसवण्यात आला. या पुतळ्याच्या उद्घटनासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह पंकजा मुंडे, धनंजय मुंडे आणि भाजपचे इतर नेते तसेच मुंडे समर्थक उपस्थित होते. यावेळी भाजप नेते आमदार रमेश कराड हे देखील उपस्थित होते. मात्र यावेळी रमेश कराड यांनी आपल्या भाषणामध्य लातूर ग्रामीणला थेट पाकिस्तानची उपमा देत अजब दावा केला. यामुळे आता राजकीय वर्तुळातून जोरदार टीका केली जात आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी भाजप आमदार रमेश कराड यांचा व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये रमेश कराड हे त्यांचा लातूर ग्रामीण मतदारसंघ हा पाकिस्तानमध्ये भारताचा झेंडा लावण्यासारखं आहे असे म्हणाले आहेत. यावरुन आता वाद चिघळण्याची शक्यता आहे. रमेश कराड यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर हे वक्तव्य केले आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
आमदार रमेश कराड यांचा व्हिडिओ शेअर करताना रोहित पवार यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. रोहित पवार यांनी लिहिले आहे की, “बेताल बरळणाऱ्या सत्ताधाऱ्यांमध्ये लातूर ग्रामीणचे आमदार रमेशअप्पा कराड यांचाही समावेश झाला. ‘‘लातूर ग्रामीण मतदारसंघ म्हणजे पाकिस्तानात भारताचा झेंडा लावण्यासारखा प्रकार’’, हे त्यांचं वक्तव्य म्हणजे लातूर ग्रामीण मतदारसंघातील तमाम जनतेचा अवमान आहे आणि याबाबत त्यांनी माफी मागितली पाहिजे. विशेष म्हणजे मुख्यमंत्री महोदय हे व्यासपीठावर असूनही त्यांनी कराड यांना रोखलं नाही, त्यामुळं त्यांचाही या वक्तव्याला पाठींबा आहे का? असा प्रश्न पडतो,” असा आक्रमक पवित्रा आमदार रोहित पवार यांनी घेतला आहे.
बेताल बरळणाऱ्या सत्ताधाऱ्यांमध्ये लातूर ग्रामीणचे आमदार रमेशअप्पा कराड यांचाही समावेश झाला. ‘‘लातूर ग्रामीण मतदारसंघ म्हणजे पाकिस्तानात भारताचा झेंडा लावण्यासारखा प्रकार’’, हे त्यांचं वक्तव्य म्हणजे लातूर ग्रामीण मतदारसंघातील तमाम जनतेचा अवमान आहे आणि याबाबत त्यांनी माफी मागितली… pic.twitter.com/TFnVy88IhO — Rohit Pawar (@RRPSpeaks) August 12, 2025