
MPSC, MPSC Scam, Rohit Pawar, Drug Inspector Exam,
Rohit Pawar PC: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या ‘ड्रग इन्स्पेक्टर’ (DI) भरती परीक्षेत कथित घोटाळ्याचे प्रकरण समोर आल्याने संपूर्ण राज्यात एकच खळबळ उडाली आहे. शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार या पेपरफुटीसंदर्भात सातत्याने गंभीर आरोप करत असून आता त्यांनी नवा बॉम्ब फोडला आहे.डीआय परीक्षेचा पेपर १२ लाख रुपयात फोडण्यात आल्याचा खळबळजनक गौप्यस्फोट केला आहे.
सोमवारी झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी अनेक गंभीर आरोप केले आहेत. ” डीआय परीक्षेचा पेपर १२ लाख रुपयांत विकल्या गेला. ५ लाख अॅडव्हान्स देण्यात आले आणि ७ लाख रुपये नंतर दिले जाणार होते. तर टीईटी घोटाळ्यातील आरोपी भाजपशी संबंधित असून तो एका नेत्याची आर्थिक कामे सांभाळतो. नंदुरबारमध्ये ‘कौटिल्य अॅकॅडमी’ नावाची एक क्लास आहे.” या आरोपांनंतर एमपीएससीही झोपेतून जागी झाली असून प्रकरणाच्या तपासाला सुरुवात केली आहे.
रोहित पवार म्हणाले की , एका नायब तहसीलदाराच्या मुलाचा १३ वा रैंक (९४९ गुण) आणि मुलीचा १६ वा रैंक (१४८ गुण) आला. हा निव्वळ योगायोग आहे का? कट-ऑफ लिस्ट १०५ गुणांची होती. तरीही १०३ गुण मिळवणाऱ्या उमेदवाराला मुलाखतीसाठी बोलावण्यात आले. आम्हाला यात ‘बार्शी कनेक्शन बद्दल माहिती मिळाली आहे.
आयोगाचा पेपर असल्याचे चेष्टेने म्हटलो, असा दावा ‘एमपीएससी सूत्रीच्या’ हवाल्याने व्हायरल पत्रात आहे. याचा अर्थ स्क्रीनशॉट खरे आहेत.
तक्रार चेष्टेत केली होती, तर मग आयोगाने या संपूर्ण प्रकरणाचा तपास का केला? व्हॉट्सअॅपवर प्रश्नपत्रिकेतील ९० प्रश्न जसेच्या तसे परीक्षेत आले, असा दावा केला जात आहे. मग ही ९० प्रश्न मॅच होणारी ‘टेस्ट सिरीज’ कोणाची? असे सवाल रोहित पवार यांनी उपस्थित केले आहेत.
रोहित पवार म्हणाले, “एका नायब तहसीलदारांच्या मुलाला 13 वा आणि मुलीला 16 वा क्रमांक मिळाला आहे. हा केवळ योगायोग आहे का? असा प्रश्न निर्माण होतो. या प्रकरणात बार्शी कनेक्शन असल्याची माहिती आम्हाला मिळाली असून विद्यार्थ्यांनी 21 जुलै रोजी एमपीएससीकडे तक्रार केली होती. पण त्यावर अद्याप कोणतीही कारवाई झाल्याची माहिती नाही. उलट तक्रार करणाऱ्यांनाच पोलिसांकडून कारवाईची धमकी दिली जात आहे.”
एमपीएससी आणि एफडीएने या पेपर लीक प्रकरणाची तातडीने चौकशी करावी, अशी मागणी करत रोहित पवार केली. तसेच, या प्रकरणाची चौकशी सीबीआयच्या माध्यमातून केली जावी. सीआयडीच्या चौकशीबाबत आमचा पूर्वीचा अनुभव चांगला नाही. त्यामुळे निष्पक्ष तपासासाठी केंद्रीय यंत्रणेकडून चौकशी होणे आवश्यक आहे, असही रोहित पवार यांनी नमुद केलं.