
एमपीएससी पेपरफुटीविरोधात रोहित पवार आक्रमक; लातुरमधून प्रशासनाला दिला इशारा
MPSC Paper Leak : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) परीक्षांमधील कथित पेपरफुटी, परीक्षा प्रक्रियेतील अनियमितता आणि रखडलेल्या भरतीवरून विद्यार्थ्यांचा आक्रोश पुन्हा वाढला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी एमपीएससीचे अध्यक्ष विवेक भीमनवार यांच्या राजीनाम्याची मागणी पुन्हा एकदा लावून धरली आहे. आता या मागणीसाठी 26 सप्टेंबरपासून पुण्यात विद्यार्थ्यांसोबत आंदोलन करणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं आहे.
रोहित पवार यांनी सोशल मीडिया पोस्टमधून आपली भूमिका स्पष्ट केली आहे. विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतरही अध्यक्षांच्या राजीन्याबाबत निर्णय झालेला नसल्याचा दावा करत त्यांनी पुन्हा आंदोलनाचा इशारा दिला. 7 सप्टेंबर रोजी पुण्यात विद्यार्थ्यांचा आक्रोश मोर्चा झाला होता. या मोर्चातही एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची प्रमुख मागणी करण्यात आली होती.
आता 26 सप्टेंबरपासून विद्यार्थ्यांसोबत आंदोलनाला बसणार असल्याचं रोहित पवारांनी म्हटलं आहे. एमपीएससी अध्यक्षांचा राजीनामा घ्यावा, त्यांच्या जागी विद्यार्थ्यांना विश्वासात घेऊन स्वच्छ प्रतिमेचा अध्यक्ष नियुक्त करावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.
शेतकरी आत्महत्या करतोय अन्…; दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदामावरून अंबादास दानवे संतापले
आपल्या ‘X पोस्टमधून रोहित पवार म्हणाले, “लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याची राख करणारे MPSC चे महाभ्रष्ट अध्यक्ष विवेक भिमनवार यांच्या राजीनाम्यासाठी राज्यभरात अनेक ठिकाणी मोठमोठे मोर्चे झाले, पण अद्यापही भ्रष्ट अध्यक्षांचा राजीनामा झालेला नाही. पुण्यातल्या ७ सप्टेंबर रोजीच्या विद्यार्थ्यांच्या भव्य आक्रोश मोर्चात अध्यक्षांचा राजीनामा न झाल्यास पुन्हा आंदोलनाची घोषणा विद्यार्थ्यांनी केली होती. त्यानुसार गणेशोत्सव झाल्यानंतर २६ सप्टेंबरपासून पुण्यात विद्यार्थ्यांसमवेत मी स्वत: आंदोलनाला बसणार असून याबाबत पुणे पोलीस आयुक्तांना पत्राद्वारे कळवण्यात आलंय.”
लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याची राख करणारे MPSC चे महाभ्रष्ट अध्यक्ष विवेक भिमनवार यांच्या राजीनाम्यासाठी राज्यभरात अनेक ठिकाणी मोठमोठे मोर्चे झाले, पण अद्यापही भ्रष्ट अध्यक्षांचा राजीनामा झालेला नाही. पुण्यातल्या ७ सप्टेंबर रोजीच्या विद्यार्थ्यांच्या भव्य आक्रोश मोर्चात… pic.twitter.com/8xjeyIDc2z — Rohit Pawar (@RRPSpeaks) September 20, 2026
“भ्रष्ट अध्यक्ष भिमनवार यांचा राजीनामा घेऊन त्यांच्या जागी विद्यार्थ्यांना विश्वासात घेऊन स्वच्छ प्रतिमा असलेले अध्यक्ष नेमावेत ही विद्यार्थ्यांची प्रामाणिक भावना आहे. भ्रष्ट अध्यक्षांचा राजीनामा, दिलेल्या शब्दाप्रमाणे २०२६ मध्ये ७० हजारांची मेगाभरती तत्काळ सुरू करावी आणि राजस्थानप्रमाणे १०० रु. च्या कार्डवर वर्षभर परीक्षा या तीन प्रमुख मागण्या असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पोलिसांनी सहकार्य करावं. नोटिसा द्यायच्याच असतील तर कोणत्याही विद्यार्थ्यांला त्रास न देता मला नोटिसा द्या! विद्यार्थ्यांच्या एकजुटीचा विजय हा होणारच असल्याने सर्वांनी विद्यार्थ्यांच्या एकजुटीला सहकार्य आणि ताकद द्यावी,” असं ते यावेळी म्हणाले.