Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Thackeray Brothers Alliance |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

RSS100 : “जे ही काम करतात ते मुस्लीमांविरोधातच…; शतकपूर्तीदिनी RSS वर बड्या नेत्याने साधला जोरदार निशाणा

समाजवादी पार्टीचे नेते अबू आझमी यांनी महात्मा गांधी यांना अभिवादन केले. त्याचबरोबर राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर जोरदार निशाण साधला आहे. त्यांनी आरएसएस मुस्लीम विरोधी काम करत असल्याचे सांगितले आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Oct 02, 2025 | 04:16 PM
Samajwadi Party's Abu Azmi criticizes RSS 100 Mohan Bhagwat

Samajwadi Party's Abu Azmi criticizes RSS 100 Mohan Bhagwat

Follow Us
Close
Follow Us:

RSS 100 Years : मुंबई : यंदा विजयादशमी आणि गांधी जयंती एकाच दिवशी आल्याने राजकीय चर्चांना आणि टीकांना उधाण आले आहे. तसेच यंदा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा शतकपूर्ती सोहळा असल्यामुळे जोरदार राजकीय चर्चा सुरु आहेत. नागपूरमधील रेशीमबाग या संघ कार्यालयामध्ये सरसंघचालक मोहन भागवत यांच्या उपस्थितीमध्ये कार्यक्रम पार पडला. तर कॉंग्रेस नेत्यांनी महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. समाजवादी पार्टीचे नेते अबू आझमी यांनी महात्मा गांधी यांना अभिवादन केले. त्याचबरोबर राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर जोरदार निशाण साधला आहे.

गांधी जयंतीनिमित्त, महाराष्ट्र समाजवादी पक्षाचे प्रमुख अबू आझमी यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे स्मरण करताना भाजप आणि आरएसएसवर जोरदार निशाणा साधला. एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना अबू आझमी यांनी जोरदार टीकास्त्र डागले. ते म्हणाले की, भारताच्या स्वातंत्र्यात आरएसएसचे कोणतेही योगदान नाही आणि आजच्या मुलांना हे सत्य कळले पाहिजे. भाजप जे काही करेल ते मुस्लिमांविरुद्ध असेल. त्यांनी एकाही मुस्लिमाला तिकीट दिलेले नाही किंवा त्याला मंत्री बनवलेले नाही. मुस्लिमांविरुद्ध सतत विष पसरवले जात आहे.” अशी जोरदार टीका अबू आझमी यांनी केली आहे.

राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा 

ते पुढे म्हणाले की, मुलांना आधुनिक शिक्षण दिले पाहिजे आणि देश स्वतंत्र कसा झाला हे शिकवले पाहिजे. “आज जग खूप प्रगती करत आहे, परंतु आपण अजूनही हिंदू-मुस्लिम वादात अडकलो आहोत, जे द्वेषाला खतपाणी घालतात. स्वातंत्र्यासाठी कोणी बलिदान दिले हे मुलांना कळले पाहिजे आणि द्वेष पसरवणाऱ्यांबद्दल सत्य जाणून घेतले पाहिजे.” आरएसएसवर निशाणा साधताना आझमी म्हणाले की, ही संघटना संविधानाचे पालन करत नाही आणि वर्षानुवर्षे तिरंगा फडकवत नाही. “हे लोक संपूर्ण देशाला एकाच रंगात रंगवू इच्छितात. आज प्रत्येक मुलाला संविधान वाचण्याची गरज आहे जेणेकरून देशात शांतता आणि सौहार्द नांदेल.” असे मत अबू आझमी यांनी व्यक्त केले आहे.

महाराष्ट्रसंंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

इतिहासातील पैलूंची आठवण करून देताना अबू आझमी म्हणाले, “आम्ही वाचले आहे की तुरुंगात असताना संघाचे सदस्य ब्रिटिशांना पत्र लिहित असत, ‘जर त्यांना सोडण्यात आले तर ते गांधीजींची स्वदेशी चळवळ थांबवतील.’ त्यांना ब्रिटिशांकडून पेन्शनही मिळत असे. भारताच्या स्वातंत्र्यात त्यांच्या योगदानाबद्दल आजच्या लोकांना सत्य सांगणे अत्यंत महत्त्वाचे आहे.” अबू आझमी यांच्या विधानामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. आझमी यांच्या टीकेमध्ये केवळ भाजप आणि संघाला लक्ष्य केले नाहीत तर समाजातील वाढत्या द्वेषाकडे आणि शिक्षणाच्या महत्त्वाकडेही लक्ष वेधले आहे.  गांधी जयंतीनिमित्त दिलेली ही विधाने मानवता, समानता आणि देशाच्या इतिहासाचे स्मरण करण्याचा संदेश देखील देतात. की मुलांना सत्य आणि संविधानाबद्दल शिक्षित करूनच समाजात शांतता आणि सौहार्द प्रस्थापित करता येतो.

Web Title: Samajwadi partys abu azmi criticizes rss 100 mohan bhagwat

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 02, 2025 | 04:16 PM

Topics:  

  • Abu Azmi
  • Mahatma Gandhi
  • RSS

संबंधित बातम्या

Congress Politics: काँग्रेसमध्ये नेमकं चाललयं काय? दिग्विजय सिंहाना शशी थरूरांचे समर्थन; म्हणाले
1

Congress Politics: काँग्रेसमध्ये नेमकं चाललयं काय? दिग्विजय सिंहाना शशी थरूरांचे समर्थन; म्हणाले

Bajrang Dal And RSS: बजरंग दल आणि RSS हे देशासाठी प्राणघातक कर्करोग; बड्या नेत्याची जहरी टिका
2

Bajrang Dal And RSS: बजरंग दल आणि RSS हे देशासाठी प्राणघातक कर्करोग; बड्या नेत्याची जहरी टिका

RSS- काँग्रेसमध्ये वाद पेटणार? सरसंघचालकांच्या ‘त्या’ विधानावर उदीत राज यांची टीका; म्हणाले, “हिंमत असेल…”
3

RSS- काँग्रेसमध्ये वाद पेटणार? सरसंघचालकांच्या ‘त्या’ विधानावर उदीत राज यांची टीका; म्हणाले, “हिंमत असेल…”

Bangladesh Hindu : बांगलादेशमध्ये हिंदूवर प्राणघातक हल्ले अन् जाळपोळ; RSS मोहन भागवत यांनी स्पष्टच सांगितलं
4

Bangladesh Hindu : बांगलादेशमध्ये हिंदूवर प्राणघातक हल्ले अन् जाळपोळ; RSS मोहन भागवत यांनी स्पष्टच सांगितलं

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.