Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

“पक्षाला सोडून जाणारे कंस आणि रावणाचे वंशज…”; खासदार संजय राऊतांची गंभीर टीका

अजित पवार गटाचे नेते सुनील तटकरे यांनी शरद पवार गटाच्या नेत्यांना ऑफर दिली असल्याचा दावा करण्यात येत आहे. यावरुन विरोधक आक्रमक झाले असून संजय राऊतांनी जोरदार टीका केली.

  • By प्रीति माने
Updated On: Jan 09, 2025 | 11:46 AM
Sanjay raut target sunil tatkare for giving offer mp and mla in ncp sharad pawar group

Sanjay raut target sunil tatkare for giving offer mp and mla in ncp sharad pawar group

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : राज्यामध्ये विधानसभा निवडणूकीनंतर जोरदार राजकारण रंगले आहे. अजित पवार यांनी राष्ट्रवादीला सोडून महायुतीसोबत वेगळी चूल मांडली आहे. यामुळे राष्ट्रवादीमध्ये देखील दोन गट असून विधानसभा निवडणूकीमध्ये शरद पवार गटाला मोठा फटका बसला आहे. यामध्ये हिवाळी अधिवेशनावेळी सभागृहाच्या आवारामध्ये अजित पवार गटाचे नेते सुनील तटकरे यांनी शरद पवार गटाच्या नेत्यांना ऑफर दिल्याची चर्चा होती. यामुळे विरोधकांनी देखील नाराजी व्यक्त केली होती.

सुनील तटकरे यांनी  खासदारांना ‘बाप आणि लेकीला सोडून दादांसोबत चला’ असा सल्ला दिला होता, असे बोलले जात आहे. यावर खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह विरोधकांनी जोरदार टीका करत नाराजी व्यक्त केली आहे. यावर आता खासदार संजय राऊत यांनी जोरदार टीका केली आहे. खासदार संजय राऊत म्हणाले, “संतोष देशमुखचा खून जेवढा निर्घृण आहे, तेवढीच ही भाषा क्रूर आणि निर्घृण आहे,” अशी टीका संजय राऊत यांनी केली.

राजकीय बातम्या वाचा एका क्लिकवर

पुढे खासदार राऊत म्हणाले की, “संतोष देशमुखचा खून जेवढा निर्घृण आहे, तेवढीच ही भाषा क्रूर आणि निर्घृण आहे. ज्या पितृतुल्य नेत्याने तुम्हाला या स्तरावर नेलं, पण तुम्ही बाप-लेकीला सोडा, ही भाषा वापरण्यापर्यंत, या स्तरापर्यंत येता हे गंभीर आहे. केंद्रामध्ये मंत्रीपद मिळवण्यासाठी तुम्ही ही पातळी गाठता, ते क्रूर आहे,” अशा शब्दांत शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी निशाणा साधला आहे.

तर ते कंस आणि रावणाचे वंशजच

पुढे संजय राऊत यांनी अमित शाह यांनी केंद्रामध्ये मंत्रिपद देण्यासाठी प्रफुल पटेल यांना टार्गेट दिले असल्याची गंभीर टीका केली आहे. खासदार राऊत म्हणाले की, “अमित शहांना खुश करण्यासाठी मोगॅम्बोला खुश करण्यासाठी हा सर्व खटाटोप सुरू आहे, अशी टीका त्यांनी केली. लोकसभा निवडणुकीत , ज्या कठीण परिस्थितीत शरद पवार यांनी कष्ट करून 8 खासदार निवडून आणले , त्यातले काही लोक जर सोडून जात असतील तर ते रावणाचे वंशज आहेत, अशा शब्दांत राऊतांनी हल्ला चढवला. उद्धव ठाकरे किंवा शरद पवारांना कोणी सोडून जात असेल, कोणी पक्षातून फुटत असेल तर ते कंस आणि रावणाचे वंशजच असतील, निर्घृण-अमानुष असतील,” अशा कडक शब्दांत खासदार संजय राऊत यांनी टीका केली आहे.

महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचा एका क्लिकवर

जितेंद्र आव्हाडांनी व्यक्त केली नाराजी

माध्यमांशी संवाद साधताना जितेंद्र आव्हाड म्हणाले की, “सुनील तटकरे यांनी फोन नाही केले. ते संसदेमध्ये भेटले. यावेळी त्यांनी खासदारांना सांगितलं की, बापाला आणि मुलीला बाजूला ठेवा. आणि या आमच्याकडे. एकीकडे आमचं दैवत आहे म्हणायचं. पक्ष आणि निशाणी घेतली हे ठीक आहे. आता खासदार पण पळवा. आणि वर एकत्र येतात म्हणून बोंबाबोंब करत आहे. बापाला आणि पोरीला सोडा असं सांगतात. यावरुन संस्कार आणि काय तुमची संस्कृती हे दिसून येत, अशा शब्दांत जितेंद्र आव्हाड यांनी निशाणा साधला आहे. तसेच ऑफर देण्याऱ्यांवर अजित पवार गटाच्या नेत्यांवर रोष व्यक्त केला आहे.”

Web Title: Sanjay raut target sunil tatkare for giving offer mp and mla in ncp sharad pawar group

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 09, 2025 | 11:42 AM

Topics:  

  • ajit pawar
  • sanjay raut
  • sunil tatkare

संबंधित बातम्या

Devendra Fadnavis : २०२६ ठरणार पदभरतीचे वर्ष, देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा
1

Devendra Fadnavis : २०२६ ठरणार पदभरतीचे वर्ष, देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा

“युतीची दोन्ही बाजूने पूर्ण तयारी आहे; राज-उद्धव युतीबाबत खासदार संजय राऊत यांचे सूचक विधान
2

“युतीची दोन्ही बाजूने पूर्ण तयारी आहे; राज-उद्धव युतीबाबत खासदार संजय राऊत यांचे सूचक विधान

ऐन Dasara मेळाव्यात संजय राऊत काय बोलून गेले? मोदींना थेट रावणाची… ; राजकारण तापणार
3

ऐन Dasara मेळाव्यात संजय राऊत काय बोलून गेले? मोदींना थेट रावणाची… ; राजकारण तापणार

Ajit Pawar: ‘या’ विमानतळांच्या विकासासाठी त्वरित कार्यवाही करावी; अजित पवारांचे स्पष्ट निर्देश
4

Ajit Pawar: ‘या’ विमानतळांच्या विकासासाठी त्वरित कार्यवाही करावी; अजित पवारांचे स्पष्ट निर्देश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.