
Santosh Dhuri joined the BJP and MNS criticized Raj Thackeray Brothers Alliance
संतोष धुरी यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश पार पडला आहे. मनसेला सोडल्यानंतर त्यांनी मनसेच्या विरोधात वक्तव्य केली आहेत. संतोष धुरी यांनी उद्धव ठाकरेंसोबत केलेल्या युतीवर देखील भाष्य केले. ते म्हणाले की, “मुंबईत मनसेला 52 जागा सोडल्याचे दिसत आहेत. मात्र, त्यापैकी सात किंवा आठ सीट निवडून येईल की नाही, याचीही शाश्वती नाही. उद्धव ठाकरे गटाने आम्हाला पाहिजे त्या सीट दिल्या नाहीत. उलट ज्या जागांवर ठाकरे गटाकडे उमेदवारच नव्हते किंवा ज्याठिकाणी त्यांच्या विद्यमान नगरसेवकाचे नाव खराब झाले होते, अशा जागा ठाकरे गटाने मनसेला देऊ केल्या,” असा घणाघात संतोष धुरी यांनी केला आहे.
हे देखील वाचा : मोठी बातमी! बांगलादेशमधे हिंदू हादरले! धडाधड गोळ्या झाडून मृत्यू, २० दिवसात तब्बल ५ ….
पुढे ते म्हणाले की, “माहिम, दादर, वरळी, शिवडी, भांडूप या मराठा माणसांचा टक्का जास्त असलेल्या भागांमध्ये मनसेची फक्त एका जागेवर बोळवण करण्यात आली. ठाकरे गटाने त्यांना ज्या सीट सोडायच्या होत्या, त्याच मनसेला दिल्या, ठाकरे गट आणि मनसेत मुंबईत जागावाटप सुरु असताना प्रत्येक विधानसभा मतदारसंघात मनसेला दोन जागा सोडायच्या असे ठरले होते. पण दादरमधील वॉर्ड क्रमांक 190 आणि वॉर्ड क्रमांक 192 आपल्याला मिळणार नाहीत, असे नितीन सरदेसाईंनी मला सांगितले. मी तेव्हाच काय करायचं ते करा पण मला मोकळं करा, असे नितीन सरदेसाई यांना सांगितलं होतं,” असे देखील संतोष धुरी म्हणाले आहेत.
हे देखील वाचा : लिहिलेले पुसता येतं, पण कोरलेलं नाही! वडिलांवर टीका करताच देशमुख बंधू आक्रमक
पुढे ते म्हणाले की, “मला जागावाटपाच्या चर्चेत घेतलं नाही किंवा उमेदवारी दिली नाही, याचा राग मला नाही. राज ठाकरे साहेबांनी हिरवं रक्त असलेल्या लोकांशी युती केली आहे. या लोकांनी मनसेचा पूर्णपणे ताबा घेतला आहे. राज ठाकरे यांनी आमचा पक्ष त्यांच्यासमोर पूर्णपणे सरेंडर केला आहे. साहेबांनी आम्हाला आधीच भरपूर दिले आहे. पण आमचे नेते संदीप देशपांडे साहेबांना जागावाटपाच्या चर्चेत कुठेही घेतले नाही. ज्यावेळी आम्ही याविषयी विचारणा केली, तेव्हा आम्हाला कळाले की, वरुन असा तह झाला आहे की, राज साहेबांनी संतोष धुरी आणि संदीप देशपांडे हे दोन किल्ले सरेंडर केले आहेत. हे दोघे उमेदवार म्हणून किंवा जागावाटपात कुठेही दिसणार नाहीत, असा आदेश वांद्र्याच्या बंगल्यावरुन आला होता,” असे संतोष धुरी यांनी म्हटले.