
Satara ZP, Bapu Shinde, Kidnapping case, NitinKaka Patil,
Satara ZP News: सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवड प्रक्रियेदरम्यान घडलेल्या नाट्यमय घडामोडींना आता नवे वळण मिळाले आहे. ज्या सदस्याच्या अपहरणाच्या तक्रारीवरून पोलिसांनी धरपकड आणि अटकसत्र राबवले होते, त्या बापू शिंदे यांनी स्वतः समोर येत “माझे अपहरण झालेच नाही” असा खळबळजनक खुलासा केला आहे.
राष्ट्रवादीचे जिल्हा परिषद सदस्य बापू शिंदे सोमवारी सकाळी खासदार नितीन काका पाटील आणि कार्यकर्त्यांसह स्थानिक गुन्हे शाखेच्या (LCB) कार्यालयात हजर झाले. पोलिसांनी त्यांना जबाब नोंदवण्यासाठी पाचारण केले होते. यावेळी त्यांचा जबाब ‘इन कॅमेरा’ नोंदवण्यात आला. बापू शिंदे म्हणाले की, माझ्या अपहरणाची तक्रार पूर्णपणे खोटी असून हे एक राजकीय कटकारस्थान आहे. ज्या मुलाने अपहरणाची तक्रार दिली होती, तो मुलगा आपल्यासोबत राहत नाही आणि आपला त्याच्याशी कोणताही संबंध नाही, तसेच, संबंधित मुलाने कोणाच्या तरी दबावाखाली येऊन ही तक्रार दिली असावी, असा संशयही त्यांनी व्यक्त केला आहे.
Kerala Crime: अंगावर काटा आणणारी घटना! एकाच घरातील 5 जणांचा मृतदेह, दोन महिला फासावर;
२० मार्च रोजी जिल्हा परिषद निवडीच्या वेळी बापू शिंदे यांच्या अपहरणाच्या तक्रारीवरून पोलिसांनी राष्ट्रवादीच्या दोन सदस्यांना अटक कऱण्यात आली. या अटकेनंतर सातारा जिल्हा परिषदेत मोठी धक्काबुक्की आणि गोंधळ उडाला होता, ज्याचे पडसाद संपूर्ण राज्यभर उमटले होते. आता बापू शिंदे यांच्या या खुलाशानंतर पोलीस प्रशासन आणि तक्रारदारांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
खासदार नितीन काका पाटील यांनी बापू शिंदे यांचा जबाब नोंदवल्यानंतर पत्रकारांची अनौपचारिक संवाद साधला. ते म्हणाले, मतदान प्रक्रियेत काही सदस्य सहभागी होऊ नये यासाठी हेतूपूर्वक दोन वेळा गुन्हे दाखल करून संबंधित सदस्यांना अटक करण्यात आली. हा गुन्हा जबरदस्तीने दाखल करण्यात आला असून हे प्रकरण संशयास्पद आहे. पोलीस यंत्रणेचा वापर करून सदस्य फोडण्याचा प्रयत्न झाला.
या प्रकरणामागील मास्टर माइंडचा शोध घेऊन त्याच्यावर न्यायालयीन चौकशी व्हावी आणि कारवाई व्हावी, अशी मागणी नितीन काका यांनी केली. तसेच तक्रारदार हा शिंदे यांचा मुलगा असल्याचे सांगण्यात येत असून त्याला 24 तास पोलिसांनी ताब्यात ठेवला तर हे आरोप करण्यात आला आहे पोलिसांची ही भूमिका चुकीची व संशयास्पद होती राज्यात विशिष्ट राजकीय पक्षाची सत्ता येऊ नये यासाठी हे षडयंत्र रचण्यात आले असा आरोप नितीन काका पाटील यांनी केला .तसेच निवड प्रक्रियेची वैध बाजू तपासून फेरनिवडीच्या संदर्भाने न्यायालयीन प्रक्रियेत दाद मागू असेही त्यांनी स्पष्ट केले .