Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sharad Pawar : “ते एक मत मिळालं अन् वाजपेयींचं सरकार कोसळलं”; शरद पवारांनी सांगितला खास किस्सा

जेष्ठ राजकारणी आणि नेते शरद पवार यांनी नीलेश कुमार कुलकर्णी लिखित 'संसद भवन ते सेंट्रल व्हिस्टा' या मराठी पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याला उपस्थिती लावली. यावेळी त्यांनी अनेक राजकीय किस्से सांगितले.

  • By प्रीति माने
Updated On: Feb 22, 2025 | 01:11 PM
Sharad Pawar told story how Atal Bihari Vajpayee government toppled by a single vote in 1999

Sharad Pawar told story how Atal Bihari Vajpayee government toppled by a single vote in 1999

Follow Us
Close
Follow Us:

नवी दिल्ली :  जेष्ठ नेते शरद पवार हे त्यांच्या राजकीय चालीसाठी ओळखले जातात. केंद्रापासून राज्यपर्यंत शरद पवार यांच्या राजकीय विधानांवर आणि चालीवर सर्वाचे लक्ष असते. शरद पवार यांची राजकीय हालचालीचे कोणीच भाकित करु शकत नाही असे मानले जाते. आता पुन्हा एकदा शरद पवार यांनी स्वतः वाजपेयी सरकार पाडल्याच्या एका घटनेचा उल्लेख केला आहे. 1999 साली अटलबिहारी वाजपेयी सरकार लोकसभेत केवळ एका मताने पडले होते. शरद पवार यांनी या आठवणींना उजाळा देत खास राजकीय किस्सा सांगितला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) प्रमुख शरद पवार यांनी गुरुवारी खुलासा केला की, 1999 मध्ये जेव्हा अटलबिहारी वाजपेयी सरकार लोकसभेत केवळ एका मताने अविश्वास प्रस्ताव हरले, तेव्हा त्यांनी (पवार)  केवळ एका नेत्यासोबत 8 चे 10  मिनिटे चाललेल्या चर्चेनंतर “सत्ताधारी आघाडी (एनडीए) विरोधी पक्षाच्या बाजूने मतदान” केले.

राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

गुरुवारी (दि.20) दिल्लीतील महाराष्ट्र सदनात नीलेश कुमार कुलकर्णी लिखित ‘संसद भवन ते सेंट्रल व्हिस्टा’ या मराठी पुस्तकाच्या प्रकाशन सोहळा पार पडला. यावेळी जेष्ठ नेते शरद पवार यांनी उपस्थित लोकांशी संवाद साधला. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या पूर्वसंध्येला आयोजित कार्यक्रमाला शिवसेना (यूबीटी) राज्यसभा सदस्य संजय राऊत यांनीही उपस्थिती लावली. या कार्यक्रमामध्ये शरद पवार यांनी अटलबिहारी वाजपेयी यांचे केवळ एका मताने पडलेल्या सरकारबद्दल किस्सा सांगितला आहे.

जुन्या संसद भवनाबद्दलच्या आठवणीबद्दल सांगताना, शरद पवार यांनी 1999 मध्ये वाजपेयी सरकारच्या काळात विरोधी पक्षनेते असतानाचा एक प्रसंग सांगितला. शरद पवार म्हणाले, “खूप कमी लोकांना आठवत असेल की 1999 मध्ये मी विरोधी पक्षनेता होतो. आम्ही वाजपेयी सरकारविरुद्ध अविश्वास प्रस्ताव आणला होता आणि त्यावर संसदेत बरीच चर्चा झाली होती. अविश्वास प्रस्तावावर मतदान होण्यापूर्वी, मी ‘चर्चेसाठी’ सभागृहाबाहेर पडलो तेव्हा आमच्याकडे आठ ते दहा मिनिटे होती. त्यानंतर, मतदान झाले तेव्हा सरकारच्या बाजूने एका सदस्याने विरोधी पक्षाच्या बाजूने मतदान केले. वाजपेयी सरकार फक्त एका मताने बरखास्त झाले. मी विरोधी पक्षाच्या बाजूने ते एक मत मिळवले, पण मी ते कसे केले हे मी उघड करणार नाही.” असा राजकीय किस्सा शरद पवार यांनी सांगितला.

महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

सेंट्रल व्हिस्टाबद्दल भाष्य करताना जेष्ठ नेते शरद पवार म्हणाले की, नवीन संसद भवनाबद्दल अद्याप आसक्ती निर्माण झालेली नाही. देशातील अनेक प्रतिष्ठित राजकारणी ज्या जुन्या संसद भवनात राहिले आहेत त्याबद्दल मला अजूनही प्रेम आहे.” पवार यांनी १९६२-६३ मध्ये काँग्रेसच्या बैठकीसाठी दिल्लीला आलेल्या त्यांच्या पहिल्या भेटीची आठवण करून दिली आणि जवाहरलाल नेहरूंना पहिल्यांदा पाहून ते आणि त्यांचे काही पक्षातील सहकारी कसे आश्चर्यचकित झाले होते ते सांगितले.

Web Title: Sharad pawar told story how atal bihari vajpayee government toppled by a single vote in 1999

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 22, 2025 | 01:11 PM

Topics:  

  • Atal Bihari Vajpayee
  • Sharad Pawar

संबंधित बातम्या

Ajit Pawar : मला माझे मन सांगायचे की…; अजित पवारांकडून पुन्हा एकदा शरद पवारांचं कौतुक
1

Ajit Pawar : मला माझे मन सांगायचे की…; अजित पवारांकडून पुन्हा एकदा शरद पवारांचं कौतुक

मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिलं, पण…; पडळकरांच्या जयंत पाटलांवरील टीकेवर शरद पवारांची प्रतिक्रीया
2

मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिलं, पण…; पडळकरांच्या जयंत पाटलांवरील टीकेवर शरद पवारांची प्रतिक्रीया

Sharad Pawar News : अशी अतिवृष्टी याआधी पाहिली नव्हती…; माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवारांनी राज्य सरकारला दिला मोठा सल्ला
3

Sharad Pawar News : अशी अतिवृष्टी याआधी पाहिली नव्हती…; माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवारांनी राज्य सरकारला दिला मोठा सल्ला

“मुद्दामहून वाचाळवीर निर्माण …सत्ताधाऱ्यांनी महाभागांना पोसलं; पडळकरांच्या वक्तव्यामुळे राष्ट्रवादीचा राग उफाळला
4

“मुद्दामहून वाचाळवीर निर्माण …सत्ताधाऱ्यांनी महाभागांना पोसलं; पडळकरांच्या वक्तव्यामुळे राष्ट्रवादीचा राग उफाळला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.