Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 24 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sangli ZP Election Result 2026 : सांगली जिल्हा परिषदेत भाकरी फिरली तुतारी वाजली; सत्ता ठरणार राजकीय समीकरणावर

सांगली जिल्हा परिषदेमध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने सर्वाधिक १८ जागा जिंकत हा पक्ष बाजीगर ठरला आहे. ६१ जिल्हा परिषद गट आणि १२२ पंचायत समिती गणांसाठी झालेल्या निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठे संख्याबळ प्राप्त झाले.

  • By श्वेता झगडे
Updated On: Feb 09, 2026 | 06:39 PM
सांगली जिल्हा परिषदेत भाकरी फिरली तुतारी वाजली; सत्ता ठरणार राजकीय समीकरणावर

सांगली जिल्हा परिषदेत भाकरी फिरली तुतारी वाजली; सत्ता ठरणार राजकीय समीकरणावर

Follow Us
Follow Us:

सांगली : स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ‘मिनी मंत्रालय’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सांगली जिल्हा परिषदेमध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने सर्वाधिक १८ जागा जिंकत हा पक्ष बाजीगर ठरला आहे. ६१ जिल्हा परिषद गट आणि १२२ पंचायत समिती गणांसाठी झालेल्या निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठे संख्याबळ प्राप्त झाले आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्ष सर्वाधिक जागा मिळवून जिल्ह्यात नंबर एकचा पक्ष ठरला आहे, मात्र महायुतीला देखील काठावरचे बहुमत मिळाले आहे, राष्ट्रवादी अजित पवार पक्ष व महाविकास आघाडी बऱ्याच ठिकाणी एकत्र लाढली असल्याने सत्तेचे रांगडे निर्माण झाले आहे, राजकीय समीकरणे कशी फिरवली जातात, त्यावर सांगली जिल्हा परिषदेवर महाविकास आघाडीची सत्ता येणार की महायुतीचे हे ठरणार आहे.

जिल्हा परिषदेत महाविकास आघाडीला एकूण ३१ जागा मिळाल्या आहेत. यामध्ये राष्ट्रवादी (शरद पवार) गटाला १८, काँग्रेसला ११, तर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला १ जागा मिळाली आहे. या संख्याबळामुळे जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद राष्ट्रवादी (शरद पवार) गटाकडे जाण्याची दाट शक्यता आहे.

Patan Election Result: पाटणमध्ये ‘शंभू’राज! पालकमंत्री शंभूराज देसाईंचा भाजपला धोबीपछाड; देसाई गटाचा एकतर्फी विजय

महायुतीत भाजपला १६, शिवसेना (शिंदे गट) ला ८, राष्ट्रवादी (अजित पवार) गटाला ८, रयत क्रांती पक्षाला १, तर जनसुराज्य पक्षाला १ जागा मिळाली आहे. पंचायत समित्यांवर समसमान सत्ता वाटप जिल्ह्यातील एकूण आठ पंचायत समित्यांवर सत्ता विभागली गेली आहे.

पंचायत समिती बलाबल

भाजप : जत, मिरज

राष्ट्रवादी (शरद पवार) : वाळवा, कवठेमहांकाळ

राष्ट्रवादी (अजित पवार) : शिराळा, तासगाव

काँग्रेस : पलूस, कडेगाव

शिवसेना (शिंदे गट) : खानापूर, आटपाडी

जयंत पाटील आणि रोहित पाटील यांचा दबदबा

जिल्हा परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी (शरद पवार) गटाने वर्चस्व सिद्ध केले. वाळवा विधानसभा मतदारसंघातून आ. जयंत पाटील यांनी ११ पैकी ८ जागांवर विजय मिळवला. तासगाव–कवठेमहांकाळ मतदारसंघात आ. रोहित पाटील यांनी १० पैकी ७ जागा जिंकत आपला प्रभाव कायम ठेवला. शिराळा तालुक्यात दोन्ही राष्ट्रवादी गट एकत्र येत ३ जागा मिळवण्यात यशस्वी ठरले.

तासगाव–कवठेमहांकाळ : दोन गटांचा संघर्ष कायम

दिवंगत माजी उपमुख्यमंत्री आर.आर. पाटील आणि माजी खासदार संजयकाका पाटील यांचा राजकीय संघर्ष असलेल्या तासगाव–कवठेमहांकाळ मतदारसंघात यंदाही रंगत पाहायला मिळाली. जिल्हा परिषद गटांमध्ये आमदार रोहित पाटील यांनी सात जागांवर विजय मिळवला, मात्र पंचायत समिती पातळीवर तासगावमध्ये संजयकाका पाटील समर्थकांचा, तर कवठेमहांकाळमध्ये आमदार रोहित पाटील यांचा वरचष्मा राहिला.

तासगाव पंचायत समितीत ‘नवरा–बायको’ एकाच सभागृहात

तासगाव पंचायत समिती निवडणुकीत माजी खासदार संजयकाका पाटील समर्थक आणि कुमठे गावचे सरपंच महेश पाटील हे चिंचणी गणातून, तर त्यांच्या पत्नी अरुणा महेश पाटील या कुमठे गणातून विजयी झाल्या. एकाच पंचायत समितीत नवरा–बायको निवडून आल्याने हा निकाल जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरला आहे.

जतमध्ये पडळकरांचा करिष्मा

जत तालुक्यात भाजपचे आ. गोपीचंद पडळकर यांनी आपला करिष्मा पुन्हा एकदा सिद्ध केला. जिल्हा परिषदेत भाजपने ८ जागा, तर पंचायत समितीत १२ जागा जिंकत एकहाती सत्ता मिळवली. काँग्रेसला येथे केवळ चार, तर राष्ट्रवादी (अजित पवार) गटाला दोन जागांवर समाधान मानावे लागले.

जिल्हा परिषदेतील पक्षीय बलाबल

राष्ट्रवादी (शरद पवार) – १८

काँग्रेस – ११

भाजप – १६

शिवसेना (शिंदे) – ७

शिवसेना (उद्धव) – १

राष्ट्रवादी (अजित पवार) – ६

जनसुराज्य – १

रयत क्रांती – १

नवी मुंबईत शिवसेना-भाजप आमनेसामने! खा. म्हस्केंनी दाखवली घोटाळ्यांची फाईल

 

Web Title: Sangli zilla parishad ncp sharad pawar is the frontrunner political equation set to determine power

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 09, 2026 | 06:39 PM

Topics:  

  • Sangli
  • Sharad Pawar
  • ZP Election Result 2026

संबंधित बातम्या

Maharashtra Drought : ‘तर राज्यात दुष्काळच पडला नसता..,’ शरद पवारांच्या दुष्काळ दौऱ्यावर जयकुमार गोरेंचा खोचक टोला
1

Maharashtra Drought : ‘तर राज्यात दुष्काळच पडला नसता..,’ शरद पवारांच्या दुष्काळ दौऱ्यावर जयकुमार गोरेंचा खोचक टोला

Sangli: 127 वर्षांपूर्वीची 14 फूट उंच महाकाय गणेशमूर्ती! लोकमान्य टिळकांनाही पडली होती भुरळ
2

Sangli: 127 वर्षांपूर्वीची 14 फूट उंच महाकाय गणेशमूर्ती! लोकमान्य टिळकांनाही पडली होती भुरळ

सांगली बाजार समितीच्या त्रिभाजनाचा फैसला पुन्हा लांबणीवर; कोल्हापूर खंडपीठाकडून १५ दिवसांची मुदतवाढ
3

सांगली बाजार समितीच्या त्रिभाजनाचा फैसला पुन्हा लांबणीवर; कोल्हापूर खंडपीठाकडून १५ दिवसांची मुदतवाढ

Devendra Fadnavis : शरद पवारांचं मुख्यमंत्र्यांना पत्र, फडणवीसांचा मोठा निर्णय; ‘या’ तारखेनंतर दुष्काळी परिस्थितीचे पंचनामे करणार!
4

Devendra Fadnavis : शरद पवारांचं मुख्यमंत्र्यांना पत्र, फडणवीसांचा मोठा निर्णय; ‘या’ तारखेनंतर दुष्काळी परिस्थितीचे पंचनामे करणार!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.