Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

संजय शिरसाट यांना सिडकोच्या अध्यक्षपदावरुन हटवले? मंंत्रिपद स्विकारल्यानंतर दिला नव्हता राजीनामा

महायुती सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळामध्ये अनेक नेत्यांना संधी नाकारण्यात आली आहे. तर काही नवीन नेत्यांना संधी देण्यात आली आहे. सिडकोच्या अध्यक्षपदावरुन संजय शिरसाट यांना हटवल्याचे बोलले जात आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Jan 17, 2025 | 04:08 PM
sanjay shirsat said that Thackeray Band is over now maharashtra political news

sanjay shirsat said that Thackeray Band is over now maharashtra political news

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीनंतर जोरदार राजकारण रंगले आहे. महायुतीचे पुन्हा एकदा सरकार आल्यानंतर देखील अनेक आमदार नाराज आहेत. महायुतीच्या देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळामध्ये अनेक नेत्यांना संधी देण्यात आली नाही. मंत्रिमंडळ विस्तारामध्ये संधी न दिल्यामुळे अनेक नेत्यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे. दरम्यान, शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांना सिडकोच्या अध्यक्षपदावरुन हटवण्यात आले आहे.

शिंदे गटाचे नेते व आमदार संजय शिरसाट यांची विधानसभा निवडणुकीपूर्वी सिडकोच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली होती. महायुतीच्या मंत्रिमंडळामध्ये संधी न दिल्यामुळे संजय शिरसाट सिडकोचे अध्यक्षपद देण्यात आले होते. त्यांची नाराजी दूर करण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा निर्णय घेतला होता. मात्र आता संजय शिरसाट यांच्याकडे मंत्रिपद आहे. मंत्रीपद असताना सिडकोच्या अध्यक्षपदी राहता येत नसल्याचा नियम आहे. यामुळे मीडिया रिपोर्टनुसार,  संजय शिरसाट यांना सिडकोच्या अध्यक्षपदावरुन हटवण्यात आले आहे.

राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

महायुतीच्या मंत्रिमंडळामध्ये शिंदे गटाचे संजय शिरसाट यांच्याकडे सामाजिक न्याय खाते आहे. मंत्रिपदाची धुरा स्वीकारल्यानंतर अध्यक्षपदाचा राजीनामा दिला पाहिजे. मात्र मंत्रिपद स्वीकारून महिना उलटून गेला तरी संजय शिरसाट यांनी राजीनामा दिला नव्हता. सिडकोच्या अध्यक्षपदावरुन जोरदार राजकारण रंगले होते. संजय शिरसाट यांनी राजीनामा स्वतःहून न दिल्यामुळे नियमांचे उल्लंघन आणि प्रशासनाचे प्रश्न निर्माण झाले होते. त्यामुळे संजय शिरसाट यांना सिडकोच्या अध्यक्षपदावरुन हटवण्यात आले आहे.

दिल्ली विधानसभा निवडणूकसंबंधित बातम्या वाचा एका क्लिकवर

सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी महायुतीच्या नेत्यांची जोरदार तयारी

देशामध्ये सध्या प्रयागराज येथे महाकुंभमेळ्याचा मोठा उत्साह दिसून येत आहे. जल्लोषपूर्ण वातावरणामध्ये करोडो हिंदू साधूंच्या साक्षीने हा महाकुंभमेळा पार पडत आहे. यानंतर महाराष्ट्रामध्ये सिंहस्थ कुंभमेळा पार पडणार आहे. यासाठी राज्य सरकारने तयारी सुरु केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 2027 साली होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याची तयारी सुरु केली आहे. सिंहस्थ कुंभमेळ्याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आराखडा सादर केला आहे.पुढील सिंहस्थ कुंभमेळा हा महाराष्ट्रामध्ये होणार आहे. महाराष्ट्रामधील नाशिकमधील त्र्यंबकेश्वर येथे हा मेळावा होणार आहे. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी तयार केलेला सुमारे 14 हजार कोटींचा प्रारुप आराखडा यावेळी सादर होणार आहे. सिंहस्थ मेळाव्यासाठी अद्याप दोन वर्षांच्या अवधी बाकी आहे. मात्र सुसज्जता आणि नियोजनासाठी आत्तापासून महायुती सरकारने तयारी सुरु केली आहे.  2015 मधील कुंभमेळ्याचा आराखडा सुमारे 2300 कोटींचा होता. आगामी कुंभमेळ्यात त्यामध्ये चार ते पाच वाढ होण्याची चिन्हे आहेत. महापालिकेने यंदा 6978 कोटींचा आराखडा सादर केला आहे.

Web Title: Shinde faction minister sanjay shirsat removed from cidco chairmanship

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 17, 2025 | 04:08 PM

Topics:  

  • Sanjay Shirsat
  • Shinde group

संबंधित बातम्या

मराठ्यांविरोधात इंग्रजांना मदत करणाऱ्या कुटुंबाच्या घशात कोट्यवधींची जमीन? रोहित पवारांच्या रडारवर शिंदे गटाचा बडा नेता
1

मराठ्यांविरोधात इंग्रजांना मदत करणाऱ्या कुटुंबाच्या घशात कोट्यवधींची जमीन? रोहित पवारांच्या रडारवर शिंदे गटाचा बडा नेता

महायुतीचे नेते काही सुधारेना! आपल्या बापाचा पैसा आहे का? रोहित पवारांच्या रडावर आता शिंदेंचा नवा नेता, व्हिडिओ व्हायरल
2

महायुतीचे नेते काही सुधारेना! आपल्या बापाचा पैसा आहे का? रोहित पवारांच्या रडावर आता शिंदेंचा नवा नेता, व्हिडिओ व्हायरल

कलंकित नेत्यांच्या यादीमध्ये पहिल्या क्रमांकावर कोण? उपनेत्या सुषमा अंधारे यांनी स्पष्टच सांगितलं
3

कलंकित नेत्यांच्या यादीमध्ये पहिल्या क्रमांकावर कोण? उपनेत्या सुषमा अंधारे यांनी स्पष्टच सांगितलं

Sanjay Shirsat Breaking: मोठी बातमी! संजय शिरसाटांच्या घरावर हल्ला; युवक आला, दगडफेक केली अन्…
4

Sanjay Shirsat Breaking: मोठी बातमी! संजय शिरसाटांच्या घरावर हल्ला; युवक आला, दगडफेक केली अन्…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.