Photo Credit- Social Media
नवी दिल्ली : दिल्लीमध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. भाजप, आम आदमी पक्ष आणि कॉंग्रेसमध्ये जोरदार लढत सुरु आहे. येत्या 5 फेब्रुवारी रोजी दिल्ली विधानसभेसाठी मतदानो होणार आहे. दिल्लीमध्ये 70 जागांसाठी एकाच टप्प्यामध्ये मतदान होणार आहे. तर येत्या 8 फेब्रुवारी रोजी मतमोजणी होऊन निकाल हाती येणार आहे. दिल्लीच्या प्रचारामध्ये लेटरबॉम्बने धुमाकूळ घातला होता. त्यानंतर आता पुन्हा एकदा माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उद्देशून पत्र लिहिले आहे.
दिल्लीचे माजी मुख्यमंत्री व आप नेते अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी पत्र लिहिले आहे. या पत्रामध्ये त्यांनी दिल्लीच्या विद्यार्थ्यांसाठी खास मागणी केली आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अरविंद केजरीवाल यांनी केलेली मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी मान्य करुन कार्यवाही करणार का याची सर्वांना उत्सुकता लागली आहे.
राजकीय बातम्या वाचा एका क्लिकवर
काय आहे अरविंद केजरीवाल यांच्या पत्रात?
दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पत्रात लिहिले आहे की, आदरणीय पंतप्रधान, दिल्लीतील शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांशी संबंधित एका महत्त्वाच्या बाबीकडे तुमचे लक्ष वेधण्यासाठी मी हे पत्र लिहित आहे. दिल्लीतील विद्यार्थी त्यांच्या शाळा किंवा महाविद्यालयांमध्ये जाण्यासाठी मोठ्या प्रमाणात मेट्रोवर अवलंबून असतात. विद्यार्थ्यांवरील आर्थिक भार कमी करण्यासाठी मी दिल्ली मेट्रोमध्ये विद्यार्थ्यांना ५०% सवलत देण्याचा प्रस्ताव ठेवतो. दिल्ली मेट्रो हा दिल्ली सरकार आणि केंद्र सरकार यांच्यातील ५०:५० सहकार्याचा प्रकल्प आहे. त्यामुळे यावर होणारा खर्च दिल्ली सरकार आणि केंद्र सरकारने समान रीतीने करावा, असे अरविंद केजरीवाल यांनी व्यक्त केले आहे.
AAP National Convenor Arvind Kejriwal writes to Prime Minister Narendra Modi to provide a 50% subsidy on Metro fares for school and college students.
He also proposed that the burden of this subsidy be borne by the state and central government by a ratio of 50:50 pic.twitter.com/no13Y8QC2Z
— ANI (@ANI) January 17, 2025
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचा एका क्लिकवर
पुढे आप नेते अरविंद केजरीवाल म्हणाले आहे की, आमच्याकडून, आम्ही विद्यार्थ्यांसाठी बस प्रवास पूर्णपणे मोफत करण्याची योजना आखत आहोत. मला मनापासून आशा आहे की तुम्ही या प्रस्तावाला सहमती द्याल, अशी विनंतीसह मागणी दिल्लीचे माजी मुख्यमंत्री व आप नेते अरविंद केजरीवाल यांनी केली आहे.