Shinde Group Sanjay Gaikwad controversial statement about Maharashtra Police
मुंबई : राज्यामध्ये पुन्हा एकदा महायुती सरकार स्थापन झाल्यानंतर अनेकदा महायुतीच्या नेत्यांनीच राज्य सरकारवर टीका केली आहे. तसेच मित्रपक्षांमध्ये शीतयुद्ध होत असल्याचे देखील दिसून आले आहेत. दरम्यान, शिंदे गटाचे नेते संजय गायकडवाड हे नेहमी त्यांच्या वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत असतात. आता पुन्हा एकदा संजय गायकवाड यांनी महाराष्ट्रातील पोलीस खात्यावर टीका केली आहे. त्यामुळे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या खात्यावर संजय गायकवाड यांनी टीका करुन घराचा आहेर दिला आहे.
शिंदे गटाचे नेते संजय गायकवाड यांनी महाराष्ट्र पोलिसांबाबत वादग्रस्त आणि अपमानस्पद वक्तव्य केले आहे. ते म्हणाले की, ‘पोलीस खात्यासारखं अकार्यक्षम डिपार्टमेंट भारतात, जगात कुठेही नाही. शासनाने कोणताही कायदा कला, की यांचा एक हप्ता वाढला, गुटखा बंदी केली तर गुटखा द्यायचा पण यांचा हप्ता वाढला. दारू बंद केली की चालू करायची, यांचा एक हप्ता वाढला. या राज्यातील पोलिसांनी, देशातील पोलिसांनी इमानदारीने काम केल ना, तर या जगातील सगळी गंदगी खतम होईल, यांनी फक्त प्रामाणिकपणे आपले कर्तव्य ‘सद्रक्षणाय खलनिग्रहणाय एवढ चांगल केल, तर सगळी गुन्हेगारी खतम होईल’, अशा शब्दात यांनी पोलिसांच्या कार्यक्षमतेवर संशय घेत टीका केली आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
संजय गायकवाड यांनी पहलगाम येथे झालेल्या हल्ल्यावर देखील प्रतिक्रिया दिली होती. यामुळे ते चर्चेत आले होते. आपल्या पंतप्रधानांनी निर्णय घ्यायचा असेल तर इस्त्राइलच्या पंतप्रधानांसारखा निर्णय घ्यावा. त्यांच्या घरात घुसून रोखठोक भूमिका घ्यावी ही काळाची गरज आहे. जल करार स्थगित करण्याने काहीही साध्य होणार नाही. पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेतल्याशिवाय आतंकवादाची समस्या संपणार नाही. एकदा का पीओके खतम करून टाका, पीओके ताब्यात घ्या आणि मग बॉर्डी करा, यामुळे आपल्या देशात कोणी घुसणार नाही. 26 चा बदला 260 ने घ्या, अशी प्रतिक्रिया संजय गायकवाड यांनी दिली होती.
त्याबरोबर उर्दू भाषेमध्ये अतिरेकी संदेश पाठवत असतात. पण आपल्याला उर्दू समजत नसल्यामुळे ते पकडले जात नाहीत. त्यामुळे उर्दुही शिकवली जावी. पहिलीपासून उर्दू शिकवली जावी, असे विधान शिंदे गटाचे नेते संजय गायकवाड यांनी केले. त्यामुळे त्यांच्यावर जोरदार टीका देखील करण्यात आली आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज (दि.26) परभणीच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी विकासकामांचा आढावा घेत अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतल्या आहेत अजित पवार यांनी काही दिवसांपूर्वी शेतकऱ्यांबाबत वक्तव्य केले होते. अजित पवार यांनी शेतकऱ्यांनी एक रुपयामध्ये पीक विमा देण्याच्या योजनेला चुना लावला असे वक्तव्य केले होते. त्यामुळे परभणीमध्ये आक्रमक आंदोलकांनी अजित पवारांच्या ताफ्यावर चुन्याच्या डब्या फेकल्या. यामुळे रस्त्यांमध्ये चुन्याच्या डब्या पडलेल्या दिसून आल्या. आक्रमक कार्यकर्ते हे अजित पवार यांच्या ताफ्याकडे जाण्याचा प्रयत्न करत होते. मात्र पोलिसांनी त्यांना पूर्ण प्रयत्नांनी अडवले. त्याचबरोबर कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. आक्रमक आंदोलकांना नवा मोंढा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.