shinde mla sanjay shirsat ready to meet uddhav thackeray political news
छत्रपती संभाजीनगर : राज्यामध्ये लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका होणार आहेत. यासाठी सर्वच राजकीय पक्ष जोरदार कामाला लागले आहेत. मुंबई महापालिकेवर शिवसेना ठाकरे गटाचे वर्चस्व राहिले आहे. ते कायम ठेवण्यासाठी उद्धव ठाकरे प्रयत्न करत आहेत. ठाकरे गटाने जोरदार तयारी सुरु केली आहे. याचबरोबर राज ठाकरे व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची देखील भेट झाली आहे. दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी भेटायला बोलावले तर मी जाणार असल्याचे वक्तव्य शिंदे गटाचे नेते व मंत्र्यांनी केले आहे.
सामाजिक न्याय मंत्री व शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी अनेक विषयांवर भाष्य केले आहे. त्यांनी माध्यमांशी संवाद साधून राजकीय भाष्य केले. मागील काही दिवसांपासून इम्तियाज जलील यांनी संजय शिरसाट यांच्यावर गंभीर आरोप केले होते. जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या भूखंड आणि जमीन खरेदीचे प्रकरण थांबता थांबत नाहीये. एकापाठोपाठ एक शहर व शहरालगतच्या भागात संजय शिरसाट यांनी आपल्या दोन्ही मुले व पत्नीच्या नावाने कोट्यावधी रुपयांची जमीन आणि प्लॉट खरेदी केल्याचा दावा एमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलील यांनी केला आहे. यावर संजय शिरसाट म्हणाले की, उठावानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांना अंगावर घेण्याचं काम केलं होत, त्या अर्थाने मी बोललो, मला इम्तियाज जलील बद्दल बोलायचं नाही, मला थोडा वेळ द्या, पूर्ण ताकदीनिशी मी बोलेल, असे संजय शिरसाट म्हणाले आहेत.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
त्याचबरोबर शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांचा आज वाढदिवस आहे. यानिमित्ताने त्यांच्यावर शुभेच्छा वर्षाव होत आहे. मात्र अहमदाबाद येथे झालेल्या अपघातानंतर आदित्य ठाकरे यांनी आपला वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांना शुभेच्छा देताना संजय शिरसाट म्हणाले की, आदित्य ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा, त्यांनी चांगले राहावं, चांगलं वागाव, चांगलं बोलावे. लवकर लग्न करावं, वडिलांसुद्धा सुद्धा त्रास होता कामा नये, याची काळजी घ्यावी. भविष्यात चांगला मोठा नेता व्हावा. या मनापासून शुभेच्छा, असे मत संजय शिरसाट यांनी व्यक्त केले.
ठाकरे यांनी बोलावले तर भेटायला जाईल
मागील काही दिवसांपासून उद्धव ठाकरे व राज ठाकरे हे एकत्र येणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. उद्धव-राज हे ठाकरे बंधू मागील वाद विसरुन पुन्हा एकत्र येण्याच्या चर्चा होत्या. मात्र राज ठाकरेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत चर्चांना पूर्णविराम लावला आहे. यावर संजय शिरसाट म्हणाले की, ठाकरे कुटुंब एकत्र येत असेल, यावर आमच्या शुभेच्छा आहेत. भेट झाली यात काही राजकीय चर्चा झाल्या आहेत, शरद पवार व अजित पवार भेटी होतात, मी उद्धव ठाकरे यांनी बोलावले तर भेटायला जाईल, यात परत राजकीय चर्चा करू नका, असे सूचक वक्तव्य शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी केले आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
सामाजिक न्याय खाते सांभाळणारे संजय शिरसाट हे महायुतीमध्ये निधीवरुन नाराज आहेत. त्यांच्या खात्याला अर्थमंत्री अजित पवार हे निधी देत नसल्याची तक्रार ते अनेकदा माध्यमांसमोर करत आहेत. तसेच सामाजिक न्याय विभागाचा निधी लाडकी बहीण योजनेला वळवला जात असल्याची आरोप संजय शिरसाट यांनी केला आहे. याबाबत ते पुन्हा म्हणाले की, मला पण निधी दिला जात आहे, माझी नाराजी नाही, माझी दादाची भेट झाली, असे मत संजय शिरसाट यांनी व्यक्त केले.
चूक कशी झाली याची चौकशी होणार?
तसेच अहमदाबाद येथे झालेल्या अपघाताबाबत मंत्री संजय शिरसाट यांनी शोक व्यक्त केला आहे. ते म्हणाले की, काल विमान दुर्घटना सर्व देशाला जाणीव करून देणारे होती. मन हेलावणारी लागणारी घटना होती, अनेकजण गेले आहेत, चूक कशी झाली, कोणामुळे झाली, याची चौकशी होईल. भविष्यात अशा घटना घडू नये, याचा प्रयत्न केला जाणार, असे मत संजय शिरसाट यांनी व्यक्त केले.