आयुक्त शुभम गुप्तांच्या कारभाराची चौकशी करा: संजयकाका पाटलांची फडणवीस यांच्याकडे मागणी
Sangli News : सांगली मिरज आणि कुपवाड शहर महापालिका उपयुक्त लाचलुचपतच्या जाळ्यात सापडले, यामध्ये तत्कालीन आयुक्तांचे नाव आले आहे, आयुक्त शुभम गुप्ता यांचा आयुक्त पदाचा कारभार हा अतिशय भ्रष्टाचाराने बरबटलेला राहिला आहे. अर्थपूर्ण व्यवहार झालेले आहेत. यांच्या कारभाराची चौकशी करावी अशी मागणी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पालकमंत्री यांच्याकडे करणार आहे, अशी मागणी माजी खासदार संजयकाका पाटील यांनी पत्रकार परिषदेत केली.
ते म्हणाले, ” महापालिकेत कोणतेही काम पैसे घेल्याशिवाय होत नसल्याच्या नागरिक आणि विविध उद्योगात काम करणाऱ्यानी माझ्याकडे तक्रार केली आहे. तत्कालीन आयुक्त गुप्ता यांची चौकशी करून या प्रकारांना चाप लावावा, अशी मागणी मी करत आहे. जिल्हा बँकेसह इतर संस्थाना देखील सोडले नाही, गुप्ता यांच्या व्हॉट्सअँप कॉलची देखील चौकशी व्हावी, म्हणजे त्यांनी केलेला भ्रष्टाचार समोर येईल, फाईल का थांबल्या, अडवणूक का केली, बांधकाम व्यवसायिक, व्यापारी, यांना नागवले गेले. लोकांच्या मदतीसाठी असणाऱ्या प्रशासनावर वचक बसवण्यासाठी आणि नैतिकता प्रबळ करण्यासाठी आणि सामान्य नागरिकांचे शोषण थांबवण्यासाठी आता मी पुढाकार घेत आहे. ”
MNS BJP Alliance: राज ठाकरेंसाठी हा सौदा फायद्याच्या की तोट्याचा; काय आहेत राजकीय समीकरणे?
जिल्हा बँकेकडून घेतली लाच
“आदीवासी विकासने देखील त्यांची चौकशी करून त्यांच्यावर ठपका ठेवला होता, आशा प्रकारच्या अधिकाऱ्यांवर वचक बसवून एकूण प्रशासकीय यंत्रणेला आदर्श घालून देणे गरजेचे आहे. आदिवासी विभागात झालेल्या भ्रष्टाचाराचे आरोप आयुक्त गुप्ता त्यांच्यावर होताना विशाल पाटील यांनी पाठराखन केली होती, मात्र अशा कारभाराला त्यांचे समर्थन असेल असे वाटत नाही, मात्रबअनेक लोकप्रतिनिधी असणाऱ्या जिल्हा बँकेच्या परवानगीला लाखो रुपये लाच द्यावी लागते. वैभव साबळे हा छोटा मासा, मोठा मासा गळाला लागणे गरजेचे आहे.” असेही संजयकाका म्हणाले.
पूरनियंत्रण करण्यासाठी केंद्राकडून माझ्या लोकसभा सदस्य काळात केंद्र शासनाकडून निधी आणला आहे, त्यासाठी नियोजन करून योग्य काम करण्यासाठी नवे आयुक्त सत्यम गांधी यांची भेट घेणार आहे. असेही संजयकाका पाटील म्हणाले.
कराड शहरासह तालुक्याला बसला वादळी पावसाचा तडाखा; बेलवडे परिसरात तर ढगफुटीसदृश्य पाऊस
यावेळी पडलेल्या पावसाने द्राक्षे बागांना काड्या नाहीत, डाळिंब बागा गेल्या, खरीप पेरण्या नाहीत, पाऊस सुरू असल्याने अद्याप होऊ शकल्या नाहीत. शेतीचे मोठे नुकसान झाले आहे, जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणीही शासनाकडे करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.