
Shivaji Kon hota marathi book mla sanjay gaikwad Threat Publisher Prakash Ambi
Shivaji Kon Hota Book : कोल्हापूर : शिंदे गटाचे नेते आणि बुलढाणाचे आमदार संजय गायकवाड हे नेहमी वादाच्या भोवऱ्यात अडकतात. आमदार निवासामध्ये कॅन्टीन चालकाला मारहाण केल्यानंतर आता संजय गायकडवाड हे पुस्तक प्रकाशकाला धमकवत असल्याचे समोर आले आहे. दिवंगत कामगार नेते गोविंद पानसरे लिखित ‘शिवाजी कोण होता’ यावरुन आमजार संजय गायकवाड यांनी पुस्तकाचे कोल्हापूरचे प्रकाशक प्रशांत आंबी यांना शिवीगाळ केली आहे. तसेच अर्वाच्य भाषेमध्ये आमदार गायकवाड यांची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे.
यामध्ये बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबी यांना पुस्तकाच्या शिषर्कावरुन जाब विचारला आहे. गायकवाड म्हणाले की, शिवाजी कोण होता’ असे पुस्तकाचं नावं देऊन तुम्ही शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख करता का? गोविंद पानसरे हा कोण हरामXXX आहे शिवाजी महाराजांना शिवाजी म्हणणारा..तुमच्या सारखे नालायक लोक आमच्या शिवाजी महाराजांना एकेरी भाषेमध्ये बोलता, असे आमदार संजय गायकवाड म्हणाले आहेत.
हे देखील वाचा : ‘आजोबा लवकर बरे व्हा!’ रुग्णालयात असलेल्या शरद पवारांसाठी पार्थ पवारांचे खास ट्विट
पुढे प्रकाशक प्रशांत आंबी यांनी तुम्ही माहिती घ्या..तुम्ही पुस्तक वाचलं आहे का असे प्रत्युत्तर दिले, यावर आमदार गायकवाड म्हणाले की, पुस्तक वाचण्याची गरज नाही मला. पुस्तक वाचण्याची गरज काय आहे? आम्ही फक्त हे पुस्तक नाही तर पूर्ण इतिहास वाचला आहे. आम्ही मराठा आहे त्यांचं वंशज आहे. तुला माहिती ना पानसरेचे काल हाल झाले, तू ब्राम्हण आहे का? तुझ्या आईबद्दल कोणी असं लिहिलं तर तू प्रकाशित करशील का? लिहून घे तू. मी आमदार संजय गायकवाड तुला घरात घुसून मारेल हरामXX..ये भाडXX..मी धमक्या देत नाही, तुला घरात घुसून मारेल…तुझी जीभ छाटेल.. अशा अनेक शिव्या देत आमदार संजय गायकवाड यांनी प्रकाशकाला धमकी दिली. याचा ऑडिओ देखील समोर आला आहे.
नेहमी वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत असलेल्या शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांचा ऑडिओ व्हायरल झाला आहे. यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी कोल्हापूरतून केली जात आहे.
आमदार गायकवाडांवर कारवाई करण्याची मागणी
प्रकाशक प्रकाश आंबी यांनी तुम्ही पुस्तक वाचा किंवा पुस्तकामध्ये काय लिहिले आहे याचा सारांश वाचा असे सांगू देखील आमदार संजय गायकवाड थांबले नाहीत. त्यांनी अर्वाच्च भाषेमध्ये शिवीगाळ सुरुच ठेवली. यावरुन आता आमदार गायकवाड यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.
हे देखील वाचा : “नारीशक्ती भाजपचा मुखवटा टराटराsss फाडतील..! विरोधकांकडून वरळीतील महिलेचे कौतुक अन् BJPचा खरपूस समाचार
हा ऑडिओ क्लीप शेअर करत काँग्रेसने देखील शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांच्यावर निशाणा साधला. काँग्रेसने लिहिले आहे की, संजय गायकवाड हा व्यक्ती महाराष्ट्राच्या संस्कृतीला लागलेली कीड आहे. आमदार निवासातील कँटीनमधे कर्मचाऱ्यांसोबत हाणामारी करणे, सुरक्षेसाठी असणाऱ्या पोलिसांना स्वतःची गाडी धुवायला सांगणे असो की आता पुरोगामी चळवळीतील कार्यकर्ते प्रशांत आंबी यांना धमकी देणे असो, या प्रत्येक घटनेवेळी हा माणूस विकृत आहे, हेच सिद्ध होतं. एकीकडे छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घ्यायचं आणि आई बहिणीवरून घाण शिवीगाळ करायची, हे छत्रपती शिवाजी महाराजांचा, त्यांनी या भूमीला घालून दिलेल्या संस्कारांचाही अपमान आहे.
संजय गायकवाड हा व्यक्ती महाराष्ट्राच्या संस्कृती ला लागलेली कीड आहे. आमदार निवासातील कँटीन मधे कर्मचाऱ्यांसोबत हाणामारी करणे, सुरक्षेसाठी असणाऱ्या पोलिसांना स्वतःची गाडी धुवायला सांगणे असो की आता पुरोगामी चळवळीतील कार्यकर्ते प्रशांत आंबी यांना धमकी देणे असो, या प्रत्येक घटनेवेळी… pic.twitter.com/6HrFfpsFwK — Maharashtra Congress (@INCMaharashtra) April 23, 2026
प्रशांत आंबी यांना दिलेल्या धमकीत ‘पानसरेंचे जे हाल केले, ते करण्याची’ असा उल्लेख आहे. कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येत या विकृत आमदाराचा देखील सहभाग आहे का, याची चौकशी राज्याच्या गृहविभागाने करावी व प्रशांत आंबी यांना राज्य सरकारने तातडीने सुरक्षा द्यावी., अशी मागणी महाराष्ट्र काँग्रेसकडून करण्यात आली आहे.