ShivSena Aditya Thackeray demands Dhananjay Munde resignation to cm of Maharashtra
मुंबई : बीडमधील हत्येच्या घटनेमुळे राज्यामध्ये वातावरण तापले आहे. बीडमधील मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करुन त्यांची निर्घुणपणे हत्या करण्यात आली. या प्रकरणामध्ये आरोपींना अटक करण्यात आली असून एक आरोपी फरार आहे. या प्रकरणामध्ये आरोपी म्हणून वाल्मिक कराड याचे नाव पुढे येत आहे. सर्व आरोपींवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. वाल्मिक कराडसोबत संबंध असल्यामुळे अजित पवार गटाचे मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर देखील राजीनाम्याची टांगती तलवार आहे. विरोधकांसह सत्ताधारी नेते देखील धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी आहे. याबाबत ठाकरे गटाचे नेते व आमदार आदित्य ठाकरे यांनी जोरदार घणाघात केला आहे.
ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यावरुन महायुती सरकारला घेरले आहे. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना राजीनामा घेण्यापासून कोणी रोखले आहे असा सवाल आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला आहे. माध्यमांशी संवाद साधताना त्यांना संतोष देशमुख हत्या प्रकरणाबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावर अदित्य ठाकरे म्हणाले, “त्यांना राजीनामा देण्यापासून तसेच मुख्यमंत्र्यांना त्यांचा राजीनामा घेण्यापासून कोण अडवत आहे? मुख्यमंत्र्यांवर काही राजकीय दबाव आहे का? की काही वेगळा युतीधर्म आहे. हे मुख्यमंत्र्यांनी सांगायला पाहिजे.” असा खोचक सवाल आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याबाबत बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले, “हे सगळे मीडियातून, लोकांच्या बोलण्यातून आणि राजकीय स्तरावर होणाऱ्या चर्चांमधून समोर येत आहे. पण राजीनामा काही घेतला जात नाही. म्हणजे त्यांना मुख्यमंत्र्यांचे पूर्ण संरक्षण आहे. हे ईव्हीएम सरकार असल्याचे म्हणत जेवढे भ्रष्ट मंत्री आहेत, त्यांना हे सरकार संरक्षण देत राहिलं, असा घणाघाती आरोप आमदार आदित्य ठाकरे यांनी केला आहे.
नवराष्ट्र विशेष लेख वाचण्यासाठी क्लिक करा
वाल्मीक कराडला जामीन मिळणार का?
संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मीक कराडचा सहभाग असल्याचा आरोप केला हात आहे. दरम्यान या प्रकरणात वाल्मीक कराडवर मकोका अंतर्गत कावर करण्यात आली आहे. त्यानंतर वाल्मीक कराडला 7 दिवसांची एसआयटी कोठडी कोर्टाने सुनावली आहे. मकोका अंतर्गत कारवाई केल्यानंतर त्याला बीड कोर्टाने कोठडी सुनावली आहे. दरम्यान आज वाल्मीक कराडच्या केज कोर्टात त्याच्या जामीन अर्जावर सुनावणी होणार आहे. केज कोर्टात झालेल्या सुनावणीमध्ये केज कोर्टाने वाल्मीक कराडला न्यायालयीन कोठडी सुनावली होती. त्यानंतर लगेचच त्याने जामीनासाठी अर्ज दाखल केला होता. मात्र या अर्जाला सीआयडीने कोर्टात आव्हान दिले आहे. संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मीक कराडची चौकशी करायची आहे, त्यामुळे त्याला जामीन देऊ नये अशी विनंती सीआयडीने कोर्टासमोर केली आहे. आज कराडच्या अर्जावर सुनावणी होणार आहे. कोर्ट वाल्मीक कराडला जामीन देते की सीआयडीची मागणी मान्य करते ते पहावे लागणार आहे.