मोठी बातमी ! शिंदे गटाच्या संजय शिरसाट यांच्या अडचणी वाढणार? आयकर विभागाने बजावली नोटीस
छत्रपती संभाजीनगर : राज्यामध्ये लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका होणार आहेत. सुप्रीम कोर्टाने निवडणूका चार महिन्यांमध्ये घेण्याबाबत निर्देश दिल्यामुळे निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. मुंबईमध्ये राजकीय हालचालींना वेग आला आहे. मुंबई महापालिकेवर सत्ता मिळवण्यासाठी शिवसेनेच्या दोन्ही गटांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. मुंबई पालिकेवर वर्चस्व मिळवण्यासाठी ठाकरे गट आणि शिंदे गट जोरदार प्रयत्न करणार आहेत. यामुळे मुंबईतील शिवसेनेचे भविष्य ठरणार आहे. मुंबई ठाणे मनपा निवडणूक ही मोठा भाऊ कोण ठरवणार असल्याचे वक्तव्य मंत्री संजय शिरसाट यांनी केले आहे.
महायुतीचे राज्यामध्ये सरकार आले असले तरी तिन्ही पक्षामध्ये अंतर्गत कलह सुरु असल्याचे दिसून आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील दोन्ही उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये संवाद नसल्याचे मान्य केले आहे. यावरुन महायुतीमध्ये सारं काही आलबेल नसल्याचे अनेकदा दिसून आले आहे. याबाबत शिंदे गटाचे मंत्री संजय शिरसाट म्हणाले की, काल झालेली बैठक ही आमच्या पक्षाच्या ध्येय धोरणाबाबत होती, संघटन बाबतीत होती. काम करताना काय काय अडचणी येतात, या बाबत आमदारानि सांगितले आहे. मात्र शिंदे साहेबांनी स्पष्ट सांगितले आहे. कुठेही वाच्यता करु नका. तिन्ही नेते मिळून मार्ग काढू म्हटले आहे, असे मत संजय शिरसाट यांनी व्यक्त केले आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
मुंबई महानगर पालिकेबाबत संजय शिरसाट म्हणाले की, निवडणुकीच्या काळात पक्ष सर्व्हे करतात. फीडबॅक घेत असतात व अहवाल पक्षाकडे सादर केला जातो. विधानसभेत अशी सर्व्हे झाली, मात्र त्यातील ८० टक्के सर्व्हे चूक निघाले. या अंदाजावर राजकीय गणित बांधणे चुकीची आहे. मात्र पक्षाची परिस्थिती काय याचा आढावा अशा सर्व्हेतून घेतले जाते. कोण छोटा भाऊ आणि कोण मोठा भाऊ अजून हे ठरलेले नाही. याला अजून वेळ आहे. आजच्या घडीला सांगणे नाही. आता जर सांगितलं की कोण मोठा आणि कोण छोटा तर वाद होईल. कोण कुठल्या ठिकाणाहून लढत आहेत, त्यानंतर सर्व्हेला महत्व राहील. हा प्राथमिक सर्व्हे यानंतर अजून दोन सर्व्हे होईल, असे मत संजय शिरसाट यांनी व्यक्त केले आहे. त्यामुळे भाजप आणि शिंदे गटामध्ये मोठा भाऊ आणि लहान भाऊ असा वाद उफाळला आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
राजकीय वर्तुळामध्ये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा रंगल्या आहेत. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये ठाकरे बंधूंची युती ही महायुतीला धडकी भरवणारी असेल. याबाबत संजय शिरसाट म्हणाले की, हा फक्त अंदाज आहे, हा सर्व्हे आहे. असेच घडेल असे मानून चालणे योग्य नाही. मुंबई महापालिकेवर आमचा भगवा फडकला पाहिजे, मोठा भाऊ कोण हे निवडणुकीवेळी ठरेल, असा टोला संजय शिरसाट यांनी लगावला आहे.