Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 10 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Gandhi: जावाजावांची भांडणं चव्हाट्यावर, सोनिया गांधीने केले मनेका गांधीवर अनेक खुलासे

Gandhi: सोनिया गांधीने लिहिलेल्या पुस्तकात आपली जाऊ मनेका गांधीबाबत काही खुलासे केले आहेत. मनेकाला लहान सून म्हटल्यामुळे अपमानजनक वाटत होते असंही त्यांनी म्हटलंय

  • By दिपाली नाफडे
Updated On: Nov 10, 2026 | 04:52 PM
सोनिया गांधी यांचे मनेका गांधीबाबत खुलासे (फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

सोनिया गांधी यांचे मनेका गांधीबाबत खुलासे (फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • सोनिया गांधीने केले मनेका गांधीबाबत खुलासे
  • पुस्तकात काही बाबी केल्या स्पष्ट 
  • नक्की मनेकाला काय वाटत असावे याचाही केला खुलासा 
Gandhi: काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी त्यांच्या ‘बिलॉन्गिंग: अ जर्नी ऑफ लव्ह’ या पुस्तकात त्यांच्या कौटुंबिक आणि राजकीय प्रवासाविषयी अनेक खुलासे केले आहेत. त्यांनी त्यांचे दीर संजय गांधी आणि त्यांच्या पत्नी मनेका गांधी यांच्याबद्दलही लिहिले आहे. आता याबाबत चर्चेला सुरूवात झाली आहे. 

सोनियाने कोणते खुलासे केले 

सोनिया गांधी यांनी लिहिले की, ‘१९७३ च्या अखेरीस, संजय गांधी त्यांच्या शाळकरी मित्राच्या साखरपुड्यात मनेका आनंद यांना भेटले. मनेका संजयपेक्षा १० वर्षांनी लहान होत्या. त्या एका लष्करी अधिकाऱ्याची मुलगी होत्या, त्यांनी एलएसआर कॉलेजमध्ये शिक्षण घेतले होते आणि काही काळ मॉडेलिंगही केले होते. त्यांच्या नात्याला काही दिवसच झाले असताना, सोनिया यांनी इंदिरा गांधींना सांगितले की ते लग्नाचा विचार करत आहेत. 

इंदिरा यांना आश्चर्य वाटले कारण संजयने यापूर्वी आपल्या मैत्रिणींची ओळख कुटुंबाला करून दिली होती, पण ते पहिल्यांदाच लग्नाबद्दल चर्चा करत होते, आणि तेही त्यांच्या नात्याला सुरुवात झाल्यानंतर इतक्या लवकर. इंदिरा यांनी संजयला थांबायला सांगितले. मनेका त्यावेळी अल्पवयीन होत्या, त्यामुळे लग्नासाठी त्यांना १८ वर्षांचे होणे आवश्यक होते.’

सोनिया गांधी यांनी पुस्तकात पुढे लिहिले की, “इंदिरा यांना भीती होती की दोघांमधील वयाच्या फरकामुळे त्यांच्या जुळवून घेण्यात अडचणी येतील. पण त्याहून अधिक चिंताजनक गोष्ट म्हणजे त्यांना मिळालेली माहिती. मनेकाची आई, अमतेश्वर आनंद, संजयवर लग्नाची तारीख निश्चित करण्यासाठी दबाव टाकत होत्या. इंदिरा यांनी संजयच्या एका जवळच्या मित्राकडून या माहितीची खात्री केली होती’

Sonia Gandhi Book : सोनिया गांधींचा मोठा खुलासा! आणीबाणीवरून राजीव – संजय गांधींमध्ये झाला होता वाद; इंदिरा गांधींची चूकही मान्य

मनेका खूप उत्साही आणि बोलकी मुलगी होती – सोनिया गांधी

संजयच्या आग्रहानंतर, त्या दोघांचा लवकरच साखरपुडा झाला आणि सप्टेंबर १९७४ मध्ये त्यांचे लग्न झाले. सोनिया यांच्या मते, ‘मनेका खूप उत्साही, बोलकी आणि उत्साहाने भरलेली मुलगी होती. घरात अशी वहिनी असणे खूप दिलासादायक होते. तिचे बोलणे ऐकायला मला खूप आवडायचे. प्रियांकासुद्धा अनेकदा मनेकाच्या खोलीत तिच्या गोष्टी ऐकताना आढळायची. पण हळूहळू, घरातील वातावरण बदलू लागले आणि चिडचिड सुरू झाली.’

सोनियाने लिहिले की, ‘घरी मला ‘बहुरानी’ म्हटले जायचे आणि मनेका माझ्या धाकट्या भावाची पत्नी असल्याने तिला ‘छोटी बहुरानी’ म्हटले जायचे. माझ्यासाठी आम्ही दोघीही घराच्या मुली होतो आणि आमचा दर्जा समान होता. पण मनेकाला कदाचित हे अपमानकारक वाटत असावे. कधीकधी, जेव्हा ती उद्धटपणे बोलायची, तेव्हा शांतता राखण्यासाठी मी गप्प राहायचे. पण जेव्हा मला वाटायचे की गोष्टी हाताबाहेर गेल्या आहेत, तेव्हा मी गप्प न बसता प्रत्युत्तर द्यायचे.’

संजय आणि मनेका यांच्यातील मतभेदही दिसू लागले – सोनिया गांधी

सोनिया यांनी संजय आणि मनेका यांच्या नात्यातील मतभेदही या पुस्तकात पुढे लिहिले आहेत. ‘जेव्हा संजय आणि मनेका मोठ्याने, रागाने बोलायचे, तेव्हा त्यांच्यातील मतभेद स्पष्ट दिसू लागले. मनेका रागावल्यावर, ती इंदिरा गांधींसमोरही शिवीगाळ करायची. सामाजिकदृष्ट्या जुळवून घेणाऱ्या स्वभावाच्या एका तरुण मुलीसाठी एकत्र कुटुंबात राहणे कठीण गेले असेल. संजय त्याच्या कार प्रोजेक्टमध्ये व्यस्त होता. इंदिरा गांधी दिवसभर काम करायच्या. राजीव पायलट होता आणि मी घरकाम आणि मुलांमध्ये व्यस्त होते. आमचे घर तिला कंटाळवाणे आणि जास्तच शिस्तबद्ध वाटले असेल. नंतर, मनेका संजयसोबत राजकीय कार्यक्रमांना जाऊ लागली आणि तिचे वागणे काही प्रमाणात स्थिर झाले. मनेकाने ‘सूर्या’ नावाचे एक मासिक सुरू केले, ज्यात तिची आई संचालक होती आणि मनेका संपादक होती.’

Sonia Gandhi : हे राजकीय पुस्तक नाही, तर खासगी आयुष्याची कहाणी; सोनिया गांधींचे स्पष्टीकरण

इंदिरा गांधी असे का म्हणाल्या की मनेकाचे पंख आधीच बाहेर येत आहेत?

सोनिया यांच्या मते, आणीबाणीच्या काळात संजय गांधींच्या वागणुकीमुळे पक्षातील अनेक ज्येष्ठ नेते नाराज होते. संजय गांधींवर मनमानी निर्णय घेतल्याचा आरोप होता. दरम्यान, इंदिरा गांधींना मनेकाच्या भूमिकेबद्दल चिंता वाटत होती. संजयला शांत करण्याऐवजी, मनेका त्याच्या कृतींना प्रोत्साहन देत असे आणि अनेकदा त्यात सहभागीही होत असे. सोनिया पुस्तकात लिहितात की, इंदिरा गांधींनी तत्कालीन कॅबिनेट सचिव पी. एन. धर यांना मनेकाबद्दल सांगितले होते, ‘तिला आतापासूनच पंख फुटू लागले आहेत.’ 

आता सोनिया यांच्या या खुलाशानंतर मनेका गांधी यांचं काय वक्तव्य असणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे. कारण मनेका गांधी हेदेखील राजकारणतील एक मोठं नाव असल्याने अशा पद्धतीने पुस्तकात झालेल्या खुलाशाने कदाचित त्यांच्या प्रतिमेला धक्का लागू शकतो. 

💡

Frequently Asked Questions

  • Que: सोनिया गांधींच्या पुस्तकांचं नाव काय?

    Ans: बिलॉन्गिंग : ए जर्नी ऑफ लव’ हे सोनिया गांधी यांच्या पुस्तकांचं नाव आहे

  • Que: या पुस्तकात नक्की काय आहे

    Ans: हे राजकारणाबाबत नाही तर खासगी आयुष्याबाबत पुस्तक असल्याचं सोनिया गांधींनी सांगितलं आहे

  • Que: सोनिया गांधींच्या मनेका गांधी नात्यात काय आहेत

    Ans: मनेका गांधी या सोनिया गांधी यांच्या लहान जाऊबाई आहेत

Web Title: Sonia gandhi revelations about maneka gandhi in the book belonging a journey of love dn

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 10, 2026 | 04:52 PM

Topics:  

  • Latest Political News
  • Maneka Gandhi
  • Sonia Gandhi

संबंधित बातम्या

Sonia Gandhi Book : सोनिया गांधींचा मोठा खुलासा! आणीबाणीवरून राजीव – संजय गांधींमध्ये झाला होता वाद; इंदिरा गांधींची चूकही मान्य
1

Sonia Gandhi Book : सोनिया गांधींचा मोठा खुलासा! आणीबाणीवरून राजीव – संजय गांधींमध्ये झाला होता वाद; इंदिरा गांधींची चूकही मान्य

Sonia Gandhi : हे राजकीय पुस्तक नाही, तर खासगी आयुष्याची कहाणी; सोनिया गांधींचे स्पष्टीकरण
2

Sonia Gandhi : हे राजकीय पुस्तक नाही, तर खासगी आयुष्याची कहाणी; सोनिया गांधींचे स्पष्टीकरण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.