Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 29 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Supreme Court on Local Body Election: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना हिरवा कंदील; सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

Supreme Court on Local Body Election: स्थानिक स्वराज्य संस्थ्यांच्या निवडणुका घेण्यासाठी आयोगाला पुरेसे मनुष्यबळ पुरण्याच्या सुचना आम्ही राज्य सरकारला आधीच दिल्या आहेत. प्रलंबित निवडणुकांची अधिसूचना न काढण्याचं समर्थन केले जाऊ शकत नाही.

  • By anuradha sagar
Updated On: Oct 29, 2026 | 03:15 PM
Supreme Court, Local Governance, Maharashtra News,

Supreme Court, Local Governance, Maharashtra News,

Follow Us
Follow Us:
  • स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना सर्वोच्च न्यायालयाचा हिरवा कंदील
  • २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुकांचा मार्ग पूर्णपणे मोकळा
  • ५० टक्के आरक्षणाची मर्यादा अंतिम निकालाच्या अधीन ठेवून OBC आरक्षणासह होणार निवडणुका
Supreme Court on Local Body Election: राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी सर्वोच्च न्यायालयाने हिरवा कंदील दिला आहे. सर्वोच्च न्यायालयात आज (29 ऑक्टोबर) ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर झालेल्या सुनावणीदरम्यान, ओबीसी आरक्षणासह स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेऊ शकता असा महत्त्वपूर्ण आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.

वरिष्ठ वकील इंदिरा जयसिंग यांनी न्यायालयाच्या म्हणाल्या की, न्यायालयाच्या आदेशानुसार १२ जिल्हा परिषदांच्या निवडणुका पार पडल्या आहेत. पण अद्यापही २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका झालेल्या नाहीत.ज्या निवडणुका झालेल्या नाहीत, त्या घेतल्या जाऊ शकतात असेही न्यायालयाने म्हटलं आहे. न्यायालयाच्या निर्णयानंतर राज्यातील 20 जिल्हा परिषदा आणि 211 पंचायत समित्यांच्या निवडणुकांचा मार्ग मोकळा झाला आहे.

आंध्र प्रदेशात ‘अर्णब’चा तडाखा; लाखोंना फटका, किनारपट्टीवरही मोठे नुकसान

सुप्रीम कोर्टाचे आदेश काय?

स्थानिक स्वराज्य संस्थ्यांच्या निवडणुका घेण्यासाठी आयोगाला पुरेसे मनुष्यबळ पुरण्याच्या सुचना आम्ही राज्य सरकारला आधीच दिल्या आहेत. प्रलंबित निवडणुकांची अधिसूचना न काढण्याचं समर्थन केले जाऊ शकत नाही. निवडणुका घेण्यासाठी आवश्यक त्या गोष्टी निवडणूक आयोग आणि राज्य सरकारने कराव्यात आणि त्याबाबत आम्हालाही सांगावे, असंही न्यायालयाने आम्हालाही सांगावं, असेही न्यायालयाने म्हटलं आहे. आम्ही दिलेल्या अटी-शर्तीनुसार निवडणुका घ्याव्यात, असेही न्यायालयाने नमुद केलं आहे.

इंदिरा जयसिंग म्हणाल्या की, ओबीसींसाठी किती टक्के आरक्षण असावे, हा मुख्य मुद्दा अद्याप निकाली निघालेला नाही. अंतिम सुनावणीसाठी प्रकरण पुढे ढकलले जात असताना उर्वरित निवडणुका थांबवण्याऐवजी राज्य निवडणूक आयोगाने यापूर्वी राबवलेल्या प्रक्रियेनुसार त्या पूर्ण करण्याची परवानगी देण्यात यावी.

NCMC Card Registration: महिलांनो, NCMC कार्ड नोंदणी करा अन्यथा…; एसटी महामंडळाचे निर्देश

या निवडणुका न्यायालयाच्या सध्याच्या आदेशांनुसार घेतल्या जाव्यात, त्यानंतर सुनावणीसाठी तारीख निश्चित केली जाऊ शकते. ५० टक्के आरक्षणाची मर्यादा आणि त्यासंबंधीचा मुद्दा या प्रकरणातील अंतिम निकालाच्या अधीन ठेवता येईल, अशी भूमिका त्यांनी मांडली.

लोकशाही प्रक्रिया का थांबवावी? सरन्यायाधीशांचा सवाल

सुनावणीदरम्यान सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी लोकशाही प्रक्रिया का थांबवली जावी, अशी विचारणा केली. सॉलिसिटर जनरल यांनी या प्रक्रियेवर काही जण आक्षेप घेऊ शकतात, असे नमूद केले.

त्यावर सरन्यायाधीशांनी न्यायालयाने यापूर्वीच अंतरिम व्यवस्था म्हणून निवडणुका घेण्याचे आदेश दिल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे अद्याप बाकी असलेल्या निवडणुकाही घेता येऊ शकतात; मात्र, त्या न्यायालयाच्या अंतिम निर्णयाच्या अधीन राहतील, असे त्यांनी नमूद केले.

💡

Frequently Asked Questions

  • Que: सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत कोणता महत्त्वाचा निर्णय दिला?

    Ans: सर्वोच्च न्यायालयाने इतर मागासवर्गीय (OBC) आरक्षणासह राज्यातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या प्रलंबित निवडणुका पार पाडण्यास हिरवा कंदील दिला आहे.

  • Que: ओबीसी आरक्षणाच्या ५० टक्के मर्यादेच्या मुद्द्याचे काय होणार?

    Ans: ५० टक्के आरक्षणाची मर्यादा आणि संबंधित कायदेशीर याचिका या प्रकरणातील सर्वोच्च न्यायालयाच्या अंतिम निकालाच्या अधीन (Subject to Final Decision) ठेवण्यात आल्या आहेत.

  • Que: न्यायालयाच्या या आदेशामुळे किती जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांमध्ये निवडणुका होतील?

    Ans: या निर्णयामुळे राज्यातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या रखडलेल्या निवडणुकांची अधिसूचना निघून प्रत्यक्ष मतदान होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे

Web Title: Supreme court gives green signal for maharashtra local body elections obc reservation as

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 29, 2026 | 03:15 PM

Topics:  

  • Supreme Court

संबंधित बातम्या

Sanjay Raut: संजय राऊतांच्या अडचणी वाढणार? CJI सूर्यकांत यांच्यावरील टिप्पणी प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वाचे निर्देश
1

Sanjay Raut: संजय राऊतांच्या अडचणी वाढणार? CJI सूर्यकांत यांच्यावरील टिप्पणी प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वाचे निर्देश

Supreme Court Notice To EC: महाराष्ट्रातील ३ कोटी मतदारांची नावे वगळल्याचा आरोप; निवडणूक आयोग अन् सरकारला नोटीस
2

Supreme Court Notice To EC: महाराष्ट्रातील ३ कोटी मतदारांची नावे वगळल्याचा आरोप; निवडणूक आयोग अन् सरकारला नोटीस

उपचाराच्या नावाने पैसे उकळणाऱ्या रुग्णालयांवर आता कारवाई होणार; सर्वोच्च न्यायालयात सरकारनेच दिली ग्वाही
3

उपचाराच्या नावाने पैसे उकळणाऱ्या रुग्णालयांवर आता कारवाई होणार; सर्वोच्च न्यायालयात सरकारनेच दिली ग्वाही

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.