
Thackeray group Kishori Pednekar press conference on Nagar Panchayat election results 2025
शिवसेना नेत्या किशोरी पेडणेकर म्हणाल्या की, “2 डिसेंबरला मतदान होऊन देखील निकालासाठी 21 डिसेंबर पर्यंत वाट पहावी लागली. म्हणजे निकालासाठी सुमारे 21 दिवस वाट पहावी लागली आहे. त्यामुळे निवडणूक आयोग शुद्धीवर आहे का? मतदार याद्यांमध्ये घोळ घालणे आणि जाणून बुजून निवडणूका लांबणीवर ढकलणे हे मतदारांना कमजोर करण्याचे षडयंत्र आहे. आज सुद्धा अनेक ठिकाणी आमदार हे पैशांच्या पेट्या घेऊन बसले आहेत. सत्तेतून पैसा आणि पैशातून पुन्हा सत्ता मिळवण्याचा हा प्रयत्न महाराष्ट्रच्या संस्कृतीला अत्यंत घातक आहे,” असा आक्रमक पवित्रा किशोर पेडणेकर यांनी घेतला आहे.
हे देखील वाचा : राज्यात एक नंबर भाजपच! कॉंग्रेसच्या वडेट्टीवारांची कबुली, चर्चांना उधाण
पुढे त्या म्हणाल्या की, “सत्ताधाऱ्यांनी मतदारांना जो पैसा वाटला आहे तो जनतेचाच पैसा आहे. याचे भान मतदारांनी ठेवले पाहिजे. पैशांना भुलून नाही तर विचार करुन मतदान केले पाहिजे. त्यांच्यामुळे आज निष्ठेचे गुलाल उधळला जाईल असे मत किशोरी पेडणेकर यांनी व्यक्त केले. कणकवलीमध्ये राणे बंधूंमध्ये अंतर्गत लढाई सुरु आहे. याबाबत पेडणेकर म्हणाल्या की, घरातच दोन भाऊ एकमेकांचे कपडे फाडत आहेत. आणि पैशांच्या बॅगा पकडून दिल्या जात आहेत. बदलापूर सारख्या घटनांच्या वेळी असे लोक कुठे होते,” असा सवाल किशोरी पेडणेकर यांनी उपस्थित केला आहे.
हे देखील वाचा : महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठ्या घडामोडी; आघाडी तुटली, काँग्रेस आता स्वबळावर
किशोरी पेडणेकर यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचे कौतुक देखील केले. त्या म्हणाल्या की, “उद्धव ठाकरेंवर अनेक आरोप करण्यात आले आहेत. मात्र त्यामधील एकही आरोप सिद्ध करण्यात आला नाही. ते दिल्लीच्या दिल्लीश्वरापुढे झुकले नाहीत. ही निवडणूक अशा व्यक्तीची प्रतिष्ठा जपण्यासाठी देखील ज्याने संकाटामध्ये महाराष्ट्राला सांभाळून घेतले,” अशा शब्दांत किशोरी पेडणेकर यांनी स्तुतिसुमने उधळली