ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आजचा निकाल हा केवळ जय -पराजयाचा नसून तो निष्ठेचा आहे की खोक्यांचा हा ठरवणार असल्याचे म्हणाल्या आहेत.
मालवणमध्ये शिंदे गटाचे आमदार निलेश राणे यांनी ‘स्ट्रिंग ऑपरेशन’ करत भाजपचे पदाधिकारी पैसे वाटप करत असल्याचा आरोप केला होता. या प्रकरणानंतर पोलिसांनी भाजप कार्यकर्त्याच्या वाहनातून रोकड जप्त केल्याची कारवाई केली.
नामनिर्देशनपत्र आणि शपथपत्र दाखल करण्याची अंतिम मुदत १७ नोव्हेंबर २०२५, दुपारी ३ वाजेपर्यंत निश्चित करण्यात आली आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या या निर्णयामुळे इच्छूक उमेदवारांना मोठा दिलासा मिळाला आहे.