Shiv Sena Uddhav Thackeray holds office bearer meeting at Matoshree
मुंबई: शिवसेनेचे ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेते राजन साळवी यांनी काल शिंदे गटात प्रवेश केला. त्यांच्या पक्षप्रवेशामुळे राज्यात ऑपरेशन टायगरची चर्चा जोर धरू लागली आहे. या सगळ्यात महसूल राज्यमंत्री योगेश कदम यांनी ठाकरे गटावर निशाणा साधला आहे. “राजन साळवी यांच्या शिंदे गटात प्रवेशानंतर कोकणासह मुंबईत शिवसेनेची ताकद वाढणार आहे. येत्या काही दिवसात कोकणात एकही ठाकरे गटाचा पदाधिकारी त्यांच्यासोबत नाही. त्यामुळे त्यांनी जागं व्हावं, अन्यथा पुढील सहा महिन्यांत त्यांचा संपूर्ण अस्त होईल.” अशा शब्दांत योगेश कदम यांनी डिवचलं आहे.
शिंदे गटात होत असलेल्या इनकमिंगवर भाष्य करताना कदम म्हणाले:”राजन साळवी यांच्या प्रवेशामुळे ग्रामीण कोकण आणि मुंबई महापालिका निवडणुकीवर मोठा परिणाम होणार आहे. आम्ही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत भगवा झेंडा नक्कीच फडकवू.””ठाकरे गटाचा एकही जिल्हाप्रमुख, तालुकाप्रमुख उरलेला नाही. आता त्यांच्या खासदारांबाबतही चर्चा सुरू आहे.राज्यात ‘ऑपरेशन टायगर’ सुरू झाले आहे आणि आता ते थांबणार नाही. कार्यकर्तेही आमच्याकडे येण्यास इच्छुक आहेत, आम्ही त्यांचे स्वागत करू.”योगेश कदम यांनी केलेल्या या विधानानंतर राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
RBI News : आरबीआयची मोठी कारवाई! ‘या’ बँकेतून पैसे काढता येणार नाही, तुमचे तर खाते
राजन साळवी यांच्या शिंदे गटात प्रवेशानंतर महसूल राज्यमंत्री योगेश कदम यांनी ठाकरे गटावर जोरदार टीका केली आहे. त्यांनी ठामपणे सांगितले की,”ठाकरे गटाच्या आमदारांप्रमाणे आता माजी आमदारही सोडून जात आहेत. त्यांच्या संघटनेचा पाया ढासळला आहे. एकही जिल्हाप्रमुख किंवा तालुकाप्रमुख त्यांच्यासोबत राहिलेला नाही. आता तरी त्यांनी जागं व्हावं, नाहीतर पुढील सहा महिन्यांत त्यांचा अस्त होईल.”
“ठाकरे गटाचे खासदारही शिंदे गटात येणार असल्याची चर्चा आहे. ‘ऑपरेशन टायगर’ सुरू झाले आहे आणि आता हे ऑपरेशन थांबणार नाही. आम्हाला कोणावर दबाव टाकण्याची गरज नाही, लोक स्वतःच आमच्याकडे येत आहेत. उबाठाचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे) कार्यकर्तेही आमच्यात यायला इच्छुक आहेत, आणि आम्ही सर्वांचे स्वागत करणार आहोत.” या तीव्र टीकेमुळे राजकीय वातावरण तापले असून, ठाकरे गटाची प्रतिक्रिया काय असेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.