महायुतीची दिवाळी गोड करायची; हिंदु समाज महायुतीच्या पाठीशी- नितेश राणे
कणकवली/भगवान लोके: विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळात नवी समीकरणं तयार होत आहे. दरम्यान या सगळ्यावर भाजपा प्रवक्ते नितेश राणे यांनी विरोधकांना अप्रत्यक्षपणे टोला लगावला आहे. या विधानसभा निवडणुकीत २३ नोव्हेंबरला माझी जनता परत एकदा पाच वर्ष मला त्यांची सेवा करण्याची संधी देईल. माझ्या विरोधात मैदानात कोणी यायलाच तयार नाही. शेवटी काम माझ्या मतदार संघात झालेले आहे. त्यामुळे माझ्या जनतेने मला पुन्हा निवडुन देण्याचे ठरवले आहे. कदाचित ही बातमी माझ्या प्रतिस्पर्ध्यांकडे पोहोचलेली आहे. त्यामुळेच माझ्या मतदार संघात राज्यात सर्वांत कमी उमेदवार उभे राहीले आहेत.जनतेनेच ठरवले आहे, महायुतीची दिवाळी गोड करायची आहे. हिंदु समाज महायुतीच्या पाठीशी असल्याचं वक्तव्य नितेश राणे यांनी केले आहे.
एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत राणे म्हणाले की, विधानसभा निवडणुकीत २३ नोव्हेंबरला तुम्हाला धमाके दिसणार आहे. महाराष्ट्राच्या जनतेने, माता भगिनींनी ठरवलं आहे की, यंदाच्या दिवाळी ही महायुतीसाठी साजरी करायची. त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील हिंदू समाजाने ठरवलेलं आहे की, ज्यांच्यामुळे आज आम्ही मोकळ्या पद्धतीने हिंदू सण साजरा करू शकतो, त्या महायुतीला परत निवडून द्यायचे आहे. माझ्या मतदारसंघामध्ये ४१ हजारांची लीड लोकसभेला खा.नारायण राणे यांना होती.
पुढे राणे असंही म्हणाले की, शासनाच्या माध्यामातून लोकांची सेवा करतोय, माझ्या मतदार संघातील कधीही त्यांच्या समोर लोकप्रतिनिधी किंवा कुठला राजकीय कार्यकर्ता म्हणून गेलो नाही. मी घरातला भाऊ, मुलगा, मित्र म्हणून मी त्यांच्याबरोबर वावरलेलो आहे, म्हणून मला विश्वास आहे. दहा वर्ष ज्या प्रामाणिक पद्धतीने मी त्यांची सेवा केलेली आहे. त्याचप्रमाणे पुढील पाच वर्षे माझ्या मतदारसंघातील जनता माझ्या पाठीशी राहणार असा विश्वास देखील आमदार नितेश राणे यांनी व्यक्त केला आहे.
हेही वाचा-“महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये जनतेची काम करण्याची धमक आहे”; आमदार प्रशांत ठाकूर
दरम्यान महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यातली कडवी स्पर्धा पहायला मिळत आहे. कणकवली विधानसभा मतदार संघ देखील याला अपवाद नाही. राणेंचा बालेकिल्ला असलेल्या कणकवली मतदार संघात महायुतीकडून ठाकरे गटाला शह देेण्यासाठी कडवा प्रतिसााद दिला जात आहे. काही दिवसांपूर्वीच राणे यांनी उद्धव ठाकरे गटावर जोरदार टीका केली होती. नितेश राणे म्हणाले की, उद्धव ठाकरेंनी आणि संजय राऊत यांनी युतीत होते तेव्हाचे दिवस आठवावे. भाजप सोबतचा इतिहास तपासावा, तेव्हा कसे होता ? तेव्हा काय मान सन्मान कसा होता.आता असा कचरा केला आहे की 88 जागा घ्यायच्या तर घ्या नाहीतर बाजूला व्हा.
पुढे राणे असंही म्हणाले होते की, राहुल गांधींच दर्शन उद्धव ठाकरेंना दूरच झालेलं आहे. कारण राहुल गांधीच्या डाव्या उजव्यासोबत उद्धव ठाकरेंना भोगावं लागत आहे. राहुल गांधी यांच्याजवळ पास पण नाही. नियतीचा खेळ असा आहे की राहुल गांधी उद्धव ठाकरेंचा आता फोनही घेत नाही आहेत. 2019 ला सत्ता स्थापनेवेळी उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांचा फोन घेतला नाही. आज राहुल गांधी यांचे फोन घेत नाही, याला नियतीचा फेरा म्हणतात. उगाच छाती ताणून दाखवू नका तुमची लायकी काँग्रेसने महाराष्ट्रातील जनतेला योग्य पद्धतीने दखवलेली आहे. अशी कडव्या शब्दांत राणेंनी उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र सोडलं.त्यामुळे निडवणूकीची ही लढत अतीतटीची होत आहे. त्यामुळे कणकवलीचा बालेकिल्ला राणे आणि महायुती राखणार की महाविकास आघाडी विजय मिळवणार हे पाहणं औस्तुक्याचं ठरणार आहे.