
Election process negligence
मिळालेल्या माहितीनुसार, भंडारा नगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक तीन मधील एका मतदान केंद्रावरील EVM मशीनमध्ये उमेदवाराच नावचं नसल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी भंडारा जिल्हाधिकारी सावन कुमार यांनी मतदान केंद्र प्रमुखासह सात कर्मचाऱ्यांवर तडकाफडकी निलंबनाची कारवाई केली आहे. या कारवाईनंतर सावन कुमार यांनी निवडणूक निर्णय अधिकारी माधुरी तिखे आणि सहायक निवडणूक निर्णय अधिकारी जुम्मा प्यारेवाले यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. (Bhandara News)
भंडारा नगरपालिकेच्या प्रभाग तीनमधील मतदान केंद्रावरील EVM मशीनमध्ये पाच उमेदवार आणि एक नोटा असे सहा पर्याय देण्यात आले होते. मतदान केंद्र अधिकारी आणि तेथील कर्मचाऱ्यांनी मतदान यंत्र तयार करताना शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार करूणा राऊत यांच्या नावसह नोटा पर्याय झाकला गेला. त्यामुळे प्रत्यक्षात EVM मशीनवर फक्त चारच उमेदवारांचे पर्याय दिसत होते. त्यामुळे या चारच उमेदवारांना मते मिळाली. यात करूणा राऊत यांच्या नावाचा पर्यायच न दिसल्यामुळे आपल्याला मतेच मिळाली नाहीत, असा आरोप राऊत यांनी केली. या संपूर्ण प्रक्रियेत EVM मशीन तपासल्यानंतर मतदान केंद्र प्रमुखासह सात कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. माधुरी तिखे आणि जुम्मा प्यारेवाले यांना ही कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.