
Municipal Elections 2026: वसई-विरार पालिका निवडणुकीत प्रतिष्ठेची लढाई; एका जागेसाठी भाजपा आमदारांमध्ये संघर्ष
Municipal Elections 2026: वसई-विरार पालिका प्रभाग २२ मध्ये आपल्याच समर्थकाला उमेदवारी मिळावी यासाठी आ. राजन नाईक आणि आ. स्नेहा दुबे यांनी प्रतिष्ठा पणाला लावल्याने अर्ज छाननीत मोठा गोंधळ निर्माण झाला होता. या प्रतिष्ठेच्या लढाईत राजन नाईक गटाची सरशी होऊन अभय कक्कड यांची उमेवारी पक्की झाली. या गोंधळात उमेदवारी अर्ज छानणीत उशीर झाला. पालिकेच्या ११५ पंधरा जागासाठी ९८९ उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. बुधवारी रात्री उशिरापर्यंत छाननी सुरु होती. प्रभाग क्र.२२ मध्ये उमेदवार देण्यावरून मंगळवारपासून भाजपचे आमदार राजन नाईक आणि आमदार स्नेहा दुबे यांच्या गटात वाद सुरु होता.
नाईक गटाकडून अभय कक्कड यांना एबी फॉर्म देऊन उमेदवारी देण्यात आली होती. कक्कड यांनी अर्ज भरल्यानंतर दुबे गटाने वरिष्ठ पातळीवर दबाव टाकून बिजेंदर कुमार यांना एबी फॉर्म आणून मंगळवारी त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला होता. बुधवारी छानणीत दोन्ही गटाने हक्क कायम ठेवल्याने मोठा गोंधळ झाला होता. हा वाद भाजपच्या वरिष्टांकडे गेला होता. महायुतीने सर्वच उमेदवारांना एबी फॉर्म दिले. बविआकडून शेवटच्या दिवशीदेखील एबी फॉर्म दिले गेले नाहीत.
पालिका निवडणुकीसाठी भाजप-शिंदे गट युतीवर शिक्कामोर्तब झाले. भाजपने ८२ जागांवर उमेदवार उभे केले आहेत. यामध्ये श्रमजीवी संघटना आणि आगरी सेनेलाही काही जागा देण्यात आल्या आहेत. मात्र, महायुतीने अजित पवार गट आणि आरपीआयला एकही जागा सोडली नाही, त्यामुळे आरपीआयने बविआला पाठिंबा दिला आहे. तर अजित पवार गटाने १७ जागांवर उमेदवार उभे केले आहेत. तर शरद पवार गटाने एकही उमेदवार उभा केलेला नाही. बहुजन विकास आघाडीने काँग्रेस, मनसे आणि धनंजय गावडे यांच्याशी जुळवून घेत काँग्रेसला ८, मनसेला २ आणि गावडेंना २ जागा सोडल्या आहेत. ठाकरे गट स्वबळावर निवडणूक लढवत असून त्यांनी ९५ जागांवर उमेदवारी दिले आहेत.
उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानंतर भाजपमध्ये सर्वाधिक नाराजी दिसून आली आहे. भाजपने अनेक दिग्गज पदाधिकाऱ्यांना उमेदवारी दिलेली नाही. त्यामुळे त्यांची नाराजी दूर करून बविआला टक्कर देण्याचे मोठे आव्हान भाजपपुढे असणार आहे. शिंदे गटातही जागावाटपानंतर मोठी नाराजी उफाळून आली आहे. तर नालासोपाऱ्यात महिला पदाधिकारी रुचिता नाईक यांनी अपक्ष उमेदवारांची अंतिम यादी प्रसिध्द होऊन प्रत्यक्ष निवडणुकीची धामधूम सुरु होणार आहे. सोमवारी फक्त ५९ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. त्यामुळे बुधवारी शेवटच्या दिवशी सर्वच पक्षांच्या उमेदवारांनी अर्ज दाखल केल्याने सर्वच प्रभाग समिती कार्यालय परिसरात उमेदवार आणि त्यांच्या समर्थकांनी गर्दी केली होती. वाजत गाजत मिरवणुकीने शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केले.
हेही वाचा: Ahilyanagar News: अहिल्यानगर मनपा निवडणुकीत महायुतीत फूट; नाराज उमेदवारांचे पक्षांतर
वसई-विरार महापालिकेच्या ११५ जागांसाठी तब्बल ९८९ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. सोमवारपर्यंत फक्त ५९ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. मंगळवारी रात्री उशिरापर्यंत तब्बल ८९० उमेदवारी अर्ज दाखल झाले. तर बुधवारी रात्री उशिरापर्यंत छाननी सुरू होती. यावेळी एबी फॉर्म वाटपावरून गोंधळ झाल्याचे दिसून आले. शुक्रवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे. त्यादिवशी
म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे शिंदे गटालाही नाराजी दूर करण्याचे काम करावे लागणार आहे. बविआतही काही प्रमाणात नाराजीची सूर आहे. आधीच बविआचे दहा नगरसेवक आणि काही पदाधिकारी भाजपमध्ये सामिल झाले आहेत. ती पोकळी भरून काढत असताना जागावाटपातही काही नाराजी तयार झाले आहेत. काँग्रेसने आठ तर मनसेने दोन जागांवर समाधान मानले आहे.