Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

अरे देवा! मस्तान नाका परिसरातील बंद दगड खाणीत दोन अल्पवयीन मुलांचा बुडून दुर्दैवी मृत्यू, एकाचा मृतदेह हाती दुसऱ्याचा शोध सुरू

वसई विरारच्या मनोर येथे अत्यंत दुर्दैवी घटना घडली असून या घटनेत २ अल्पवयीन मुलांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. बंद दगड खाणीत ही घटना घडली असून परिसरात हळहळ व्यक्त होते आहे

  • By दिपाली नाफडे
Updated On: Feb 28, 2026 | 12:22 AM
वसई विरारमधील हृदयद्रावक घटना (फोटो सौजन्य - Gemini Google AI)

वसई विरारमधील हृदयद्रावक घटना (फोटो सौजन्य - Gemini Google AI)

Follow Us
Follow Us:
  • मस्तान नाक्यावर दुर्दैवी घटना 
  • २ अल्पवयीन मुलांचा मृत्यू 
  • एकाचा मृतदेह सापडला तर दुसऱ्याच अजूनही शोध सुरूच 
मनोर: वसई-विरार महापालिका हद्दीतील मुंबई अहमदाबाद महामार्गावरील मस्तान नाका उड्डाणपुलाच्या पश्चिमेकडील टाकवहालच्या हद्दीत असलेल्या बंद दगड खाणीत शुक्रवारी दुपारी दोन अल्पवयीन मुलांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. या घटनेमुळे परिसरात तीव्र हळहळ व्यक्त केली जात असून नागरिकांमध्ये संतापाची भावना पसरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार जिग्नेश विजय पवार (वय ८) आणि आयुष मुकेश पवार (वय १५) आणि अजून एक मुलगा असे तीन मुले दुपारच्या सुमारास खाणीत साचलेल्या पाण्यात आंघोळ करण्यासाठी गेले असता जिग्नेशचा पाय सटकल्याने तो पाण्यात बुडाला लागला. आयुष्य त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला असता तो देखील पाण्यात बुडाला तेव्हा तिसरा मुलगा जो होता त्यांनी त्या दोन्ही मुलांच्या घरच्यांना सांगितले तेव्हा ही गोष्ट उघड झाली. प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र पाण्याची खोली व तळाचा अंदाज न आल्याने दोघेही खोल पाण्यात गेले आणि बुडाल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

अग्निशमन दलाची शोधमोहीम

घटनेची माहिती मिळताच मनोर पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने शोधकार्य सुरू करण्यात आले. त्यानंतर वसई विरार महापालिका अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. अग्निशमन दलाच्या जवानांनी खाणीत उतरून सखोल शोधमोहीम राबवली.

दीर्घ प्रयत्नांनंतर जिग्नेश विजय पवार (वय ८) याचा मृतदेह हाती लागला. मात्र आयुष मुकेश पवार (वय १५) याचा उशिरापर्यंत शोध सुरू असून अग्निशमन दलाकडून पाण्यात सखोल तपासणी करण्यात येत आहे. खाण परिसरात मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. पोलिसांनी नागरिकांना सुरक्षित अंतरावर ठेवत बचावकार्य सुरळीत पार पाडले.

Nalasopara Crime: नालासोपाऱ्यात पहाटेचा थरार! मनोरुग्ण भावाकडून बहिणीची कोयत्याने हत्या, आईलाही…

मूळ कुटुंब इंदूरचे 

मृत मुलांची कुटुंबे मूळची इंदूर (मध्य प्रदेश) येथील असून काही दिवसांपूर्वी कामानिमित्त मनोर परिसरात वास्तव्यास आली होती. संबंधित कुटुंबे भटक्या जमातीतील असल्याची माहिती पुढे येत आहे. या दुर्दैवी घटनेमुळे कुटुंबांवर शोककळा पसरली असून परिसरात शोकमय वातावरण आहे. दरम्यान हीच खाण यापूर्वीही जीवघेणी ठरली आहे. सुमारे आठ महिन्यांपूर्वी एका महिलेचा कपडे धुण्यासाठी गेलेल्या अवस्थेत पाण्यात बुडून मृत्यू झाला होता. तरी देखील संबंधित खाण पूर्णतः बंद करण्याबाबत ठोस उपाययोजना करण्यात आल्या नसल्याची चर्चा स्थानिक नागरिकांतून होत आहे.

निष्काळजीपणाचा प्रशासनावर आरोप

स्थानिकांनी प्रशासनावर निष्काळजीपणाचा आरोप करत तात्काळ कारवाईची मागणी केली आहे. बंद असलेल्या आणि पाण्याने भरलेल्या खाणींना सुरक्षित कुंपण घालणे, इशारा फलक लावणे तसेच नागरिकांना प्रवेशबंदी करणे अत्यावश्यक असल्याचे मत व्यक्त केले जात आहे. विशेषतः लहान मुले व युवक अशा ठिकाणी खेळण्यासाठी किंवा पोहण्यासाठी जात असल्याने भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी कठोर उपाययोजना करणे गरजेचे असल्याची मागणी होत आहे.

सध्या वसई विरार महापालिका अग्निशमन दल आणि मनोर पोलिसांकडून शोधकार्य आणि पुढील तपास सुरू असून, आयुष पवार याचा शोध लागताच अधिकृत माहिती जाहीर करण्यात येणार आहे. या दुर्दैवी घटनेने संपूर्ण परिसर हादरला असून प्रशासनाने तातडीने पावले उचलावीत. अशी एकमुखी मागणी नागरिकांकडून होत आहे.

Nalasopara : वसई विरारमध्ये ट्राफिकचा कहर; दंड फक्त बाईकस्वारांसाठीच? चारचाकी पार्किंगकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

Web Title: Two minors drown in a closed stone quarry in mastan naka area search for one still underway

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 28, 2026 | 12:22 AM

Topics:  

  • Vasai news
  • Vasai Virar
  • Vasai-Virar Municipal Corporation

संबंधित बातम्या

Vasai Virar Garbage Scam : 957 कोटींच्या कचरा कंत्राटाचा फैसला आता नगरसेवकांच्या हाती! दोषी आढळल्यास कायदेशीर कारवाई
1

Vasai Virar Garbage Scam : 957 कोटींच्या कचरा कंत्राटाचा फैसला आता नगरसेवकांच्या हाती! दोषी आढळल्यास कायदेशीर कारवाई

Vasai Virar Water Tax Hike : अपुरा पाणीपुरवठा अन् वाढीव पाणीपट्टी! महासभेत सत्ताधारी-विरोधक भिडले; भाजप आक्रमक
2

Vasai Virar Water Tax Hike : अपुरा पाणीपुरवठा अन् वाढीव पाणीपट्टी! महासभेत सत्ताधारी-विरोधक भिडले; भाजप आक्रमक

Vasai Virar Roads : दरवर्षी कोट्यवधींचे ‘पॅचवर्क’, मग काँक्रिटचे रस्ते कधी? वसई-विरारकरांचा पालिकेला संतप्त
3

Vasai Virar Roads : दरवर्षी कोट्यवधींचे ‘पॅचवर्क’, मग काँक्रिटचे रस्ते कधी? वसई-विरारकरांचा पालिकेला संतप्त

Vasai Virar News : महापालिकेचा मोठा निर्णय? निराधार महिलांच्या अनुदानात होणार वाढ; दरमहा मिळणार ‘इतके’ रुपये
4

Vasai Virar News : महापालिकेचा मोठा निर्णय? निराधार महिलांच्या अनुदानात होणार वाढ; दरमहा मिळणार ‘इतके’ रुपये

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.