'लाडक्या बहिणींनी अर्थसंकल्प गिळला'; अजित पवारांनी मांडलेल्या अर्थसंकल्पावर ठाकरेंची कडाडून टीका
नागपूर : राज्यामध्ये हिवाळी अधिवेशन सुरु असून दिल्लीतील संसदेमध्ये देखील हिवाळी अधिवेशन सुरु आहे. लोकसभेमध्ये वन नेशन, वन इलेक्शन हे विधेयक सादर करण्यात आलं आहे. केंद्रीय कायदा मंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी ‘वन नेशन वन इलेक्शन’ विधेयक लोकसभेत मांडले आहे. याचे पडसाद देशभर पाहायला मिळत आहे. या विधेयकावर आता शिवसेना ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
उद्धव ठाकरे यांनी नागपूरमध्ये विधान परिषदेच्या अधिवेशनला हजेरी लावली आहे. यापूर्वी त्यांनी पत्रकार परिषद घेत विविध राजकीय विषयांवर भाष्य केले. यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले की, “सध्या लाडक्या बहिणीपेक्षा लाडके आमदार ज्यांना मंत्रिपद मिळाली आणि नावडते आमदार अशीच चर्चा जास्त रंगली आहे. लाडक्या बहिणीचे पहिल्या पाच महिन्यांचे 7500 जमा झाले. निवडणूक आयोगाच्या माध्यमातून स्थिगिती मिळाली. निवडणूक झाली, आचारसंहिता संपली. निवडणुकीच्या आधी ज्याप्रकारे तात्काळ पैसे दिले गेले. त्याप्रमाणे आता ही योजना तात्काळ सुरु केली पाहिजे आणि 1500 नव्हे तर महायुतीने 2100 प्रमाणे पैसे दिले पाहिजे,” असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला आहे.
राजकीय घडामोडी वाचण्यासाठी येथे क्लिक करा
पुढे उद्धव ठाकरे यांनी छगन भुजबळ हे संपर्कात असल्याचे देखील वक्तव्य केले आहेत. अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ हे मंत्रिपद न मिळाल्यामुळे नाराज आहेत. ते संपर्कात असल्याचे सूचक वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी केले आहे. उद्धव ठाकरे म्हणाले की, “या महायुतीच्या सरकारची दैना झालेली आहे. त्यामुळे तिकडे चैना अन् मैना काही होणार नाहीये. छगन भुजबळ हे या प्रकरणामध्ये संपर्कात नाही मात्र छगन भुजबळ हे नेहमी माझ्या संपर्कात असतात. भुजबळांच्या बाबत मला खूप वाईट वाटतं. अशा अनेकांचं मला वाईट वाटत आहेत. काही अपेक्षेने तिकडे गेले होते पण काही मिळालं नाही. असे अनेकजण आहेत,” असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला आहे.
त्याचबरोबर लोकसभेमध्ये ‘वन नेशन वन इलेक्शन’ विधेयकावर चर्चा सुरु आहे. यावरुन उद्धव ठाकरेंनी जोरदार सत्ताधाऱ्यांवर घणाघात केला आहे. उद्धव ठाकरे म्हणाले की, “अदानींचा मुद्दा असो किंवा देशातले आणखी काही महत्वाचे विषय असोत, त्यावरून लक्ष भरकटवण्यासाठी किंवा दिशाभूल करण्यासाठी ‘वन नेशन वन इलेक्शन’ हा विषय आणला जात आहे. ‘वन नेशन वन इलेक्शन’च्या आधी निवडणूक प्रक्रिया पारदर्शक झाली पाहिजे. माझं तर असं स्पष्ट मत आहे की निवडणूक आयुक्त हे देखील निवडणुकीतून निवडले गेले पाहिजेत. लोकशाही किंवा मतदानाची प्रक्रिया पारदर्शक झाली पाहिजे. त्याशिवाय ‘वन नेशन वन इलेक्शन’ पूर्ण करू नये. महाराष्ट्रात जे घडलं ते कुणालाही पटलेलं नाही. त्यामुळे ‘वन नेशन वन इलेक्शन’ डोक्यावर मारू नये,” असं स्पष्ट मत उद्धव ठाकरेंनी मांडले आहे.