Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

अंबरनाथमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाला पुन्हा मोठा धक्का! ‘या’ बड्या नेत्यांचा शिंदे गटात प्रवेश

अंबरनाथमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) ला मोठा धक्का बसला असून, माजी नगरसेवक उमर इंजिनिअर आणि बिलाल इंजिनिअर यांनी अनेक कार्यकर्त्यांसह शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Oct 24, 2025 | 05:08 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:

शिवसेना शिंदे गटाने अंबरनाथमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) मध्ये पुन्हा मोठं खिंडार पाडलं आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे माजी नगरसेवक उमर इंजिनिअर आणि बिलाल इंजिनिअर यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह थेट शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. हा पक्षप्रवेश सोहळा कल्याण लोकसभेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत, तसेच माजी उपनगराध्यक्ष अब्दुलभाई शेख यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. या वेळी दोन्ही माजी नगरसेवकांनी शिवबंधन हाती बांधून शिंदे गटावर विश्वास दाखवला. त्यांच्या सोबत राष्ट्रवादी शरद पवार गटातील अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनीही शिंदे गटात प्रवेश केला.

भाजपच्या कार्यकर्त्यांच्या मोबाईलवर पक्षाची नजर; व्हॉटसअप सर्वेलन्सवर असल्याचे बावनकुळेंनी दिली कबुली

या नव्या घडामोडीमुळे अंबरनाथमधील राजकीय समीकरणांमध्ये उलथापालथ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. स्थानिक राजकारणात राष्ट्रवादी शरद पवार गटासाठी हा धक्का महत्त्वाचा मानला जात आहे. याआधीही राष्ट्रवादी शरद पवार गटाला मोठा फटका बसला होता. शहराध्यक्ष सदाशिव पाटील यांनी पक्ष सोडून राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश केला होता.

आता माजी नगरसेवक उमर आणि बिलाल इंजिनिअर यांच्या शिंदे गट प्रवेशामुळे शरद पवार गट आणखी कमजोर झाला आहे, असं राजकीय विश्लेषकांचं मत आहे. शिंदे गटाच्या नेत्यांनी सांगितलं की, “अंबरनाथमध्ये पक्ष बळकट करण्यासाठी अनुभवी आणि लोकसंपर्क असलेले कार्यकर्ते पक्षात येत आहेत. त्यामुळे आगामी निवडणुकांमध्ये पक्षाला याचा नक्कीच फायदा होईल.”

Bawankule Mobile Surveillance: चंद्रशेखर बावनकुळे यांना तात्काळ अटक करा; संजय राऊतांचा चढला पारा, राजकारण तापलं 

या घडामोडीनंतर स्थानिक राजकीय वर्तुळात शरद पवार गटात अस्वस्थता आणि शिंदे गटात नव्या उमेदीनं उत्साह पाहायला मिळत आहे. या प्रवेशामुळे आगामी नगरपरिषदेच्या निवडणुकीत शिंदे गटाची पकड अधिक मजबूत होईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

Web Title: Umar engineer bilal engineer joined shivsena shinde gat

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 24, 2025 | 05:08 PM

Topics:  

  • Nationalist Congress Party
  • Sharad Pawar NCP

संबंधित बातम्या

Rajiv Deshmukh Passes Away: शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते राजीव देशमुख यांचे निधन
1

Rajiv Deshmukh Passes Away: शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते राजीव देशमुख यांचे निधन

Maharashtra Politics: शरद पवारांची राष्ट्रवादी साजरी करणार ‘काळी दिवाळी’; कारण काय? वाचाच…
2

Maharashtra Politics: शरद पवारांची राष्ट्रवादी साजरी करणार ‘काळी दिवाळी’; कारण काय? वाचाच…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.