UP CM Yogi adityanath speech in RSS On Love Jihad Halal Certification and Political Islam
Yogi adityanath islamic politics: उत्तर प्रदेश: दीपावली सणाच्या निमित्ताने संपूर्ण देशामध्ये उत्साहाचे वातावरण आहे. उत्तर प्रदेशमध्ये देखील मोठ्या उत्साहात दीपोत्सव साजरा करण्यात आला. यानंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमामध्ये सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी केलेल्य विधानाची सर्वत्र जोरदार चर्चा आहे. योगी आदित्यनाथ यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा देखील उल्लेख केला. त्याचबरोबर राजकीय इस्लामाचा उल्लेख करत विधान केले. यावरुन राजकीय वर्तुळामध्ये जोरदार चर्चांना उधाण आले आहे.
योगी आदित्यनाथ हे आरएसएसच्या कार्यक्रमामध्ये सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी हलाल सर्टीफिकेटवरुन निशाणा साधला. ते म्हणाले की, हलाल प्रमाणपत्रावर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. आता कोणतीही संघटना हलाल प्रमाणपत्र वापरून आपली उत्पादने विकू शकणार नाही. वस्तू खरेदी करताना सर्वांना जीएसटी भरण्याचे आवाहनही त्यांनी केले. योगी म्हणाले की वस्तू खरेदी करताना नेहमीच हलाल प्रमाणपत्र तपासले पाहिजे. त्याच्या नावाखाली कट रचला जात आहे. हलालच्या नावाखाली दहशतवादासाठी निधी उभारला जातो. त्याचा वापर धार्मिक धर्मांतर आणि लव्ह जिहादसाठी केला जातो, असे मोठे विधान योगी आदित्यनाथ यांनी केले आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
साबण आणि कपड्यांसाठीही हलाल प्रमाणपत्राची काय गरज?
मुख्यमंत्री योगी म्हणाले की आम्ही उत्तर प्रदेशात त्यावर बंदी घातली आहे. साबण, कपडे आणि अगदी माचीसच्या काड्यांनाही हलाल प्रमाणपत्र का आवश्यक आहे याबद्दल त्यांनी आश्चर्य व्यक्त केले आणि उत्तर प्रदेशात आता कोणीही ते खरेदी किंवा विक्री करणार नाही असा विश्वास व्यक्त केला.
मुख्यमंत्री योगींकडून लव्ह जिहादचा उल्लेख
लव्ह जिहाद आणि धार्मिक धर्मांतरावर बोलताना मुख्यमंत्री योगी म्हणाले की एकीकडे जातीच्या आधारे महापुरुषांनाही वाटून घेण्याचे प्रयत्न केले जात आहेत. त्याच वेळी, लव्ह जिहाद आणि धार्मिक धर्मांतर यासारख्या राष्ट्रविरोधी कारवाया समाजात पसरत आहेत. त्यांनी रामायणातील कलानेमी, तडका आणि शूर्पणखा या पात्रांच्या प्रासंगिकतेचा उल्लेख करत म्हटले की आजही आपण अशा व्यक्तींपासून सावध राहिले पाहिजे जे टोपणनावांनी कुटुंबात घुसखोरी करतात आणि हिंदू मुलींना फसवतात. त्यांनी बलरामपूर जिल्ह्यातील जलालुद्दीन उर्फ चांगूरच्या कारस्थानांचाही उल्लेख केला. त्यांनी स्पष्ट केले की चांगूरच्या केसमध्ये तीन वर्षांपासून पाळत ठेवण्यात आली होती. आणि अटक होईपर्यंत कोणालाही त्याचे खरे नाव अली आहे हे माहित नव्हते.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
राजकीय इस्लाम म्हणजे काय?
आपल्या भाषणात योगी आदित्यनाथ यांनी “राजकीय इस्लाम” हा सनातन धर्माचा सर्वात मोठा शत्रू असल्याचे वर्णन केले. ते म्हणाले की, आपण ब्रिटिश आणि फ्रेंच वसाहतवादाविरुद्ध लढलो, तर आपल्या पूर्वजांनीही राजकीय इस्लामविरुद्ध लढा दिला. छत्रपती शिवाजी महाराज, महाराणा प्रताप आणि गुरु गोविंद सिंह यांसारख्या राष्ट्रीय नायकांचे स्मरण करून ते म्हणाले की, राजकीय इस्लामचा वापर देशाची लोकसंख्या बदलण्यासाठी आणि मातृभूमीचे तुकडे करण्यासाठी एक साधन म्हणून केला जात आहे, असे विधान योगी आदित्यनाथ य़ांनी केले. यावरुन राजकीय चर्चांना उधाण आले आहे.