Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • women premier league |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Vasai Virar Election: सत्तेसाठी काहीही? वसई-विरारचा ‘गड’ राखण्यासाठी हितेंद्र ठाकूर यांची वादग्रस्त नेत्याशी युती

वसई विरार महापालिका निवडणूक जिंकण्यासाठी आता हितेंद्र ठाकूर यांनी शिवसेनेचे माजी नेते धनंजय गावडे यांची साथ घेतली आहे. गावडे यांच्यावर अनेक आरोप असल्यामुळे शहराच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली आहे.

  • By मयुर नवले
Updated On: Jan 10, 2026 | 09:49 PM
हितेंद्र ठाकूर यांची शिवसेनेचे माजी नेते धनंजय गावडेसोबत युती

हितेंद्र ठाकूर यांची शिवसेनेचे माजी नेते धनंजय गावडेसोबत युती

Follow Us
Close
Follow Us:
  • वसई-विरारचे राजकारण तापले
  • हितेंद्र ठाकूर यांची शिवसेनेचे माजी नेते धनंजय गावडेसोबत युती
  • भाजपच्या ‘चक्रव्यूहा’ला गुन्हेगारी पार्श्वभूमीचे आव्हान?
वसई–विरारच्या राजकारणात सध्या मोठी उलथापालथ पाहायला मिळत आहे. एकेकाळी या भागावर एकछत्री वर्चस्व असलेले हितेंद्र ठाकूर आणि त्यांची बहुजन विकास आघाडी (बविआ) आता अस्तित्वाच्या लढाईत अडकलेली दिसत आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतर, वसई–विरार महापालिकेवरील सत्ता टिकवण्यासाठी ठाकूर यांनी सर्वस्व पणाला लावले आहे. मात्र, या सत्तासंघर्षात त्यांनी शिवसेनेचे माजी नेते धनंजय गावडे यांची घेतलेली साथ सध्या तीव्र चर्चेचा आणि वादाचा विषय ठरत आहे.

राज्यात सत्तेत असलेल्या भारतीय जनता पक्षाने वसई–विरार महापालिकेतून बविआची सत्ता उखडून टाकण्याचा निर्धार केला आहे. गेल्या अनेक दशकांपासून ठाकूर कुटुंबाकडे असलेल्या सत्तेला सुरुंग लावण्यासाठी भाजपने ठोस रणनीती आखली असून, विधानसभा निवडणुकीतील यशामुळे पक्षाचा आत्मविश्वास अधिक बळावला आहे. आगामी महापालिका निवडणुकीत परिवर्तन घडवण्याच्या उद्देशाने भाजप कंबर कसून मैदानात उतरली आहे.

आपल्या बालेकिल्ल्याला पडलेले खिंडार रोखण्यासाठी हितेंद्र ठाकूर यांनी अत्यंत आक्रमक भूमिका घेतली आहे. सत्ता वाचवण्यासाठी त्यांनी वादग्रस्त पार्श्वभूमी असलेल्या धनंजय गावडे यांना जवळ केले आहे. ठाकूर–गावडे यांची ही युती राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडवणारी ठरली आहे.

आधुनिकता आणि परंपरेचा संगम! सोलापूरच्या सिद्धेश्वर यात्रेत यंदा ३०० ड्रोनचा भव्य लाईट शो

एकीकडे भाजप ‘भ्रष्टाचारमुक्त आणि गुन्हेगारीमुक्त वसई–विरार’चा नारा देत असताना, दुसरीकडे ठाकूर यांनी गंभीर गुन्ह्यांचे आरोप असलेल्या गावडे यांच्याशी हातमिळवणी केल्याने टीकेची झोड उठली आहे. विधानसभा निवडणुकीतील पराभवाचा धक्का इतका तीव्र आहे की, सत्ता टिकवण्यासाठी ठाकूर कोणत्याही थराला जाण्यास तयार असल्याची चर्चा या युतीमुळे रंगली आहे.

आगामी वसई–विरार महापालिका निवडणूक केवळ विकासाच्या मुद्द्यांपुरती मर्यादित न राहता, आता ‘वर्चस्व विरुद्ध परिवर्तन’ या निर्णायक वळणावर येऊन ठेपली आहे. धनंजय गावडे यांची साथ ठाकूर यांना तारणार की त्यांच्या राजकीय अधोगतीला कारणीभूत ठरणार, हे येणारा काळच ठरवेल. मात्र, गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या नेत्यांच्या युतीमुळे वसई–विरारच्या राजकारणातील गुन्हेगारीकरण पुन्हा एकदा ऐरणीवर आले आहे.

गावडे यांच्यावर गंभीर गुन्ह्यांचे आरोप

धनंजय गावडे यांची कारकीर्द वसई–विरारमध्ये सर्वपरिचित आहे. त्यांच्यावर बलात्कार, खंडणी यांसह तब्बल १२ गंभीर गुन्हे दाखल असल्याची नोंद आहे. तुळींज पोलीस ठाण्यात बलात्कार, पिस्तुलाचा धाक दाखवणे तसेच अश्लील चित्रफित प्रसारित करण्याची धमकी दिल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता.

Maharashtra Election : “मेट्रो प्रकल्प रखडण्यामागे भाजपा कारणीभूत” ; विकास कामावर प्रताप सरनाईक यांचे गंभीर आरोप

बनावट कागदपत्रांच्या आधारे जमीन हडपल्याचा आरोपही त्यांच्यावर असून, आचोळे येथील २६ गुंठे जमीन खरेदी प्रकरणात तुळींज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. तसेच भाईंदर येथील एका विकासकाकडून २० लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोपही त्यांच्यावर आहे.

याशिवाय आयकर विभाग आणि अंमलबजावणी संचालनालयाने (ED) त्यांच्या निवासस्थानी छापे टाकले होते. त्या कारवाईदरम्यान त्यांच्या वाहनातून ४० लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली होती. नोटबंदीच्या काळात गावडे यांच्याकडे तब्बल १ कोटी २२ लाख रुपयांच्या नव्या नोटा आढळून आल्या होत्या. या प्रकरणात आयकर विभाग आणि नालासोपारा गुन्हे शाखेने त्यांना रंगेहाथ पकडले होते.

मनसुख हिरेन प्रकरणातही नाव

मुंबईतील बहुचर्चित मनसुख हिरेन प्रकरणातही धनंजय गावडे यांचे नाव समोर आले होते. त्या वेळी पोलीस अधिकारी सचिन वाझे आणि गावडे यांच्यातील संबंधांवर आरोप झाले होते. या प्रकरणामुळे त्यांच्या गुन्हेगारी कारवायांची माहिती राज्यभर पोहोचली. गुन्हेगारी जगताशी संबंध आणि खंडणीखोर अशी प्रतिमा असतानाही हितेंद्र ठाकूर यांनी त्यांना जवळ केल्याने, “महापालिका वाचवण्यासाठी दोन वादग्रस्त चेहरे एकत्र आले आहेत का?” असा सवाल सर्वसामान्य नागरिक उपस्थित करत आहेत.

Web Title: Vasai virar municipal election 2026 hitendra thakur joined hands with dhananjay gawade

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 10, 2026 | 09:48 PM

Topics:  

  • Marathi News
  • Vasai Virar
  • Vasai-Virar Municipal Corporation

संबंधित बातम्या

आधुनिकता आणि परंपरेचा संगम! सोलापूरच्या सिध्दरामेश्वर यात्रेत यंदा ३०० ड्रोनचा भव्य लाईट शो
1

आधुनिकता आणि परंपरेचा संगम! सोलापूरच्या सिध्दरामेश्वर यात्रेत यंदा ३०० ड्रोनचा भव्य लाईट शो

Thane :  निवडणुकीआधी ठाण्यात राजकीय समीकरणं बदलली
2

Thane : निवडणुकीआधी ठाण्यात राजकीय समीकरणं बदलली

Muncipal Corporation Elections : “लातूर शहर दहशत मुक्त करण्यासाठी काँग्रेसला साथ द्या” – अमित देशमुख
3

Muncipal Corporation Elections : “लातूर शहर दहशत मुक्त करण्यासाठी काँग्रेसला साथ द्या” – अमित देशमुख

CA विद्यार्थ्यांसाठी खुशखबर ! ICAI चा मोठा निर्णय;आर्टिकलशीप आता होणार डिजिटल
4

CA विद्यार्थ्यांसाठी खुशखबर ! ICAI चा मोठा निर्णय;आर्टिकलशीप आता होणार डिजिटल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.