Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 16 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Vidharbha Congress Politics: पूर्व विदर्भात राजकीय भूकंप! काँग्रेस आणि अजित पवार गटाला मोठे धक्के

Vidarbha Congress politics : गोंदिया-भंडारा विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देवरी तालुक्यातील काँग्रेसच्या एका जिल्हा परिषद सदस्यासह दोन नगरसेवक भाजपच्या संपर्कात असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

  • By anuradha sagar
Updated On: Jun 16, 2026 | 04:28 PM
Vidarbha Congress politics Maharashtra MLC election, Vidarbha Politics, MLC Elections, Eknath Shinde,

Vidarbha Congress politics Maharashtra MLC election, Vidarbha Politics, MLC Elections, Eknath Shinde,

Follow Us
Follow Us:
  • नगरसेवक आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमधील सदस्यांना आपल्या बाजूने वळवण्यासाठी सर्वच पक्षांकडून जोरदार मोर्चेबांधणी
  • अकोला जिल्ह्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाला मोठा धक्का
  • काँग्रेसच्या एका जिल्हा परिषद सदस्यासह दोन नगरसेवक भाजपच्या संपर्कात
 

Vidharbha Congress Politics: राज्यातील विधान परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. अशातच पूर्व विदर्भातून एक मोठी राजकीय घडामोड समोर आली आहे. विधान परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नगरसेवक आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमधील सदस्यांना आपल्या बाजूने वळवण्यासाठी सर्वच पक्षांकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. या प्रक्रियेत काही ठिकाणी पक्षांतरे, तर काही ठिकाणी नगरसेवकांच्या गूढ अनुपस्थितीमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे

अकोल्यात शिंदेसेनेची ताकद वाढली

अकोला जिल्ह्यात काँग्रेस (Congress) आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाला मोठा धक्का बसला आहे. बार्शी-टाकळी नगरपंचायतीतील १० नगरसेवकांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. यामध्ये काँग्रेसचे चार, अजित पवार गटाचे दोन आणि चार अपक्ष नगरसेवकांचा समावेश आहे. मुंबईत उपमुख्यमंत्र्यांच्या ‘नंदनवन’ या निवासस्थानी हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला.

महिलांसाठी सरकारची मोठी घोषणा! बचत गटांना १ हेक्टर जमीन, १ लाखांचे अनुदानही मिळणार, काय आहे नवी योजना?

मेहकरमध्ये ठाकरे गटाचे वर्चस्व

बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर नगरपालिकेत मोठी राजकीय उलथापालथ पाहायला मिळाली. काँग्रेसच्या ११ पैकी ९ नगरसेवकांनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला पाठिंबा जाहीर केला आहे. या निर्णयामुळे नगरपालिकेतील महाविकास आघाडीचे संख्याबळ ७ वरून १६ वर पोहोचले असून स्पष्ट बहुमत निर्माण झाले आहे.

दुसरीकडे काँग्रेस नगरसेवकांनी नगराध्यक्ष किशोर गरोळे यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत त्यांना आपला पाठिंबा जाहीर केला. यापूर्वी काँग्रेस आणि शिंदेसेना यांनी एकत्र येत नगरपालिकेतील सत्तासमीकरणे तयार केली होती. मात्र आता काँग्रेसमधील मोठा गट ठाकरे गटाकडे वळल्याने राजकीय समीकरणे बदलली आहेत.

गोंदिया-भंडाऱ्यात काँग्रेसला धक्का

गोंदिया-भंडारा विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देवरी तालुक्यातील काँग्रेसच्या एका जिल्हा परिषद सदस्यासह दोन नगरसेवक भाजपच्या संपर्कात असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. संबंधित सदस्य भाजपच्या नगरसेवकांसोबत सहलीला गेल्याची चर्चा असून, या घडामोडींमुळे स्थानिक राजकारणात चर्चांना उधाण आले आहे.

PM Kisan Installment : शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! तारीख ठरली, ‘या’ दिवशी जमा होणार PM किसान

हिंगण्यात राष्ट्रवादीचे नगरसेवक ‘नॉट रिचेबल’

नागपूर विभागातील हिंगणा नगरपंचायतीतील राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे सहा नगरसेवक अचानक संपर्काबाहेर गेल्याने महाविकास आघाडीची चिंता वाढली आहे. नागपूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून महाविकास आघाडीचे उमेदवार अतूल लोंढे तर महायुतीचे उमेदवार राजीव पोतदार मैदानात आहेत. अशा परिस्थितीत प्रत्येक मत महत्त्वाचे मानले जात असताना या नगरसेवकांच्या अनुपस्थितीने राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

निवडणुकांपूर्वी पक्षांतरांचे राजकारण तापले

विधान परिषद निवडणुका जवळ येत असताना राज्यातील विविध भागांत पक्षांतर, नगरसेवकांच्या हालचाली आणि राजकीय गटबाजी वाढल्याचे दिसून येत आहे. काही ठिकाणी महायुतीला लाभ होताना दिसत असला, तरी मेहकरसारख्या भागात महाविकास आघाडीने आपली ताकद वाढवली आहे. त्यामुळे आगामी निवडणुकांचे निकाल आणि त्यानंतरची राजकीय समीकरणे याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

 

Web Title: Vidarbha political twist massive blow to congress ncp amid legislative council elections

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 16, 2026 | 03:56 PM

Topics:  

  • Vidarbha Politics

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.