Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 30 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

अभिजीत दिपकेंवर POCSO गुन्हा दाखल करण्याची कोणी केली मागणी? पोक्सो अंतर्गत येणारे प्रमुख गुन्ह्यांचे प्रकार कोणते

दिल्लीतील आंदोलनात अल्पवयीन मुलांच्या उपस्थितीवरून CJP नेते अभिजीत दीपके आणि इतरांविरोधात इंदौर गुन्हे शाखेकडे तक्रार करण्यात आली आहे. मुंबईतील सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर फैझान अंसारी यांनी या प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली आहे.

  • By anuradha sagar
Updated On: Aug 13, 2026 | 11:40 AM
Abhijeet Dipke Cockroach Janata Party, NEET Paper Leak Protest Jantar Mantar

Abhijeet Dipke Cockroach Janata Party, NEET Paper Leak Protest Jantar Mantar

Follow Us
Follow Us:
  • नीट पेपरफुटीविरोधात CJP कडून दिल्लीतील जंतर-मंतर येथे आंदोलन
  • आंदोलनात अल्पवयीन मुलांना सहभागी करून घेतल्याचा संशय
  • पॉक्सो, BNS आणि IT कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची विनंती
Abhijeet Dipke Cockroach Janata Party : नीट पेपरफुटी प्रकरणी दिल्लीतील जंतर-मंतर येथे कॉकरोच जनता पार्टीने (CJP) आंदोलन केले होते. देशातील विविध राज्यांमधील विद्यार्थी या आंदोलनात CJP सोबत सहभागी झाले होते. या विद्यार्थ्यांनी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. त्यानंतर आता कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दीपके यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

दिल्लीतील आंदोलनात अल्पवयीन मुलांच्या उपस्थितीवरून CJP नेते अभिजीत दीपके आणि इतरांविरोधात इंदौर गुन्हे शाखेकडे तक्रार करण्यात आली आहे. मुंबईतील सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर फैझान अंसारी यांनी या प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली आहे. नीट पेपरफुटीविरोधातील आंदोलनात अल्पवयीन मुलांना आणण्यात आणि त्यांना आंदोलनात सहभागी करून घेण्यात आले असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.

Parliament Monsoon Session: अमित शाह यांचे मौन हीच त्यांची कबुली!; राहुल गांधींचे टीकास्त्र, गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी

चौकशीची मागणी

या प्रकरणाच्या तपासात गुन्हा आढळल्यास पोक्सो (POCSO), भारतीय न्याय संहिता (BNS), माहिती तंत्रज्ञान कायदा (IT Act) आणि बाल न्याय कायद्यांतर्गत एफआयआर नोंदवण्याची मागणी करण्यात आली आहे. मात्र, अद्याप या प्रकरणात गुन्हा दाखल झालेला नाही. तसेच, आंदोलनाशी संबंधित सीसीटीव्ही फुटेज, फोटो, व्हिडीओ आणि सोशल मीडिया सामग्रीची चौकशी करण्याची विनंतीही करण्यात आली आहे. दरम्यान, या तक्रारीवर अभिजीत दीपके यांनी अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. ते यावर काय भूमिका मांडतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

पोक्सो अंतर्गत येणारे प्रमुख गुन्ह्यांचे प्रकार कोणते?

१. प्रवेशक लैंगिक अत्याचार (Penetrative Sexual Assault)
बालकांशी लैंगिक संबंध ठेवणे किंवा लैंगिक संबंधाचा प्रयत्न करणे

२. गंभीर प्रवेशक लैंगिक अत्याचार (Aggravated Penetrative Sexual Assault)
पोलीस अधिकारी, शिक्षक, नातेवाईक किंवा विश्वास, अधिकार अथवा जबाबदारीच्या पदावर असलेल्या व्यक्तीकडून लैंगिक अत्याचार झाल्यास तो गंभीर लैंगिक अत्याचार मानला जाऊ शकतो.

शिंदेंना मुख्यमंत्री करण्याचा निर्णयही बेकायदेशीर? कपिल सिब्बलांचा सर्वोच्च न्यायालयात मोठा युक्तिवाद

३. लैंगिक अत्याचार (Sexual Assault)
लैंगिक हेतूने बालकाच्या शरीराला स्पर्श करणे किंवा बालकांना स्पर्श करण्याचा प्रयत्न करणे, मात्र प्रवेश न करणे, हा लैंगिक अत्याचाराच्या कक्षेत येतो.

४. लैंगिक छळ (Sexual Harassment)
बालकाला लैंगिक स्वरूपाचे शब्द, शेरेबाजी किंवा हावभाव करणे, अश्लील सामग्री दाखवणे, पाठलाग करणे किंवा लैंगिक हेतूने वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न करणे यांचा लैंगिक छळात समावेश होऊ शकतो.

५. बालकांचा अश्लील सामग्रीसाठी वापर (Child Sexual Abuse Material – CSAM)
बालकांचा लैंगिक स्वरूपाच्या अश्लील चित्र, व्हिडिओ किंवा डिजिटल सामग्रीमध्ये वापर करणे, अशी सामग्री तयार करणे, प्रसारित करणे किंवा काही परिस्थितींमध्ये साठवणे यावर POCSO कायद्यानुसार कारवाई होऊ शकते.

 

Web Title: Who demanded that a pocso case be registered against abhijeet dipke

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 13, 2026 | 10:41 AM

Topics:  

  • abhijeet dipke
  • neet paper leak

संबंधित बातम्या

CJP Demands Gyanesh Kumar Resignation: ज्ञानेश कुमार यांनी राजीनामा न दिल्यास…; अभिजीत दिपकेंकडून आंदोलनाची घोषणा
1

CJP Demands Gyanesh Kumar Resignation: ज्ञानेश कुमार यांनी राजीनामा न दिल्यास…; अभिजीत दिपकेंकडून आंदोलनाची घोषणा

Cockroach Janata Party PC: ‘ज्ञानेश कुमार सर्वात मोठे देशद्रोही?’ अभिजीत दिपकेंचा हल्लाबोल
2

Cockroach Janata Party PC: ‘ज्ञानेश कुमार सर्वात मोठे देशद्रोही?’ अभिजीत दिपकेंचा हल्लाबोल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.