Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 24 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मोठी बातमी ! काँग्रेस आमदाराचा राजीनामा; जनतेच्या अपेक्षा पूर्ण करता न आल्याने घेतला निर्णय

राजीनामा मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार आणि विधानसभा अध्यक्षांच्या कार्यालयाकडे सुपूर्द केला. आपण आपल्या मतदारसंघातील जनतेच्या अपेक्षा आणि आकांक्षा पूर्ण करण्यास असमर्थ ठरलो आहोत, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

  • By कृपादान आवळे
Updated On: Sep 24, 2026 | 09:39 AM
मोठी बातमी ! काँग्रेस आमदाराचा राजीनामा; जनतेच्या अपेक्षा पूर्ण करता न आल्याने घेतला निर्णय

मोठी बातमी ! काँग्रेस आमदाराचा राजीनामा; जनतेच्या अपेक्षा पूर्ण करता न आल्याने घेतला निर्णय

Follow Us
Follow Us:

बंगळुरू : गेल्या काही दिवसांपासून कर्नाटकच्या राजकारणात विविध घडामोडी घडत आहेत. राज्यात दुष्काळाचा प्रश्न गंभीर बनत आहे. यावरूनच आता काँग्रेस आमदार यशवंतरायगौडा पाटील यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला आहे. इंडी तालुक्याला दुष्काळग्रस्त घोषित न केल्याच्या निषेधार्थ पाटील यांनी आमदारकीचा राजीनामा दिला आहे.

यशवंतरायगौडा पाटील यांनी आपला राजीनामा मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार आणि विधानसभा अध्यक्षांच्या कार्यालयाकडे सुपूर्द केला. आपण आपल्या मतदारसंघातील जनतेच्या अपेक्षा आणि आकांक्षा पूर्ण करण्यास असमर्थ ठरलो आहोत, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. तसेच, सध्याच्या राजकीय वातावरणात प्रभावशाली व्यक्ती आणि दबाव आणणाऱ्यांनाच अधिक महत्त्व दिले जात असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. पाटील यांनी २२ सप्टेंबर रोजी अध्यक्षांना लिहिलेल्या पत्रात म्हटले की, विजापूर जिल्ह्यातील इंडी तालुका २०२६-२७ च्या खरीप हंगामात दुष्काळाने प्रचंड होरपळला आहे.

Pune MLC Election 2026 : पुणे पदवीधरसाठी भाजप कोणाला देणार संधी?! महाविकास आघाडीतही इच्छुकांची रांग

हंगामाच्या सुरुवातीला थोडा पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी कर्ज काढून बियाणे व खते खरेदी केली आणि पेरण्या केल्या. मात्र, वेळेवर पाऊस न पडल्याने पिके पूर्णपणे वाळून गेली असून, नागरिक आणि गुराढोरांसाठी पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे.

तालुक्यांची संख्या वाढणार

उपमुख्यमंत्री जी. परमेश्वर यांनी सांगितले की, राज्यातील दुष्काळग्रस्त तालुक्यांची संख्या लवकरच १७७ वर पोहोचेल आणि येत्या काही दिवसांत हा आकडा २०० पर्यंतही जाऊ शकतो.

राहुल बोंद्रेंचा भाजप प्रवेश रखडला

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या जिल्ह्यातच पक्षाला मोठा राजकीय धक्का बसण्याची शक्यता निर्माण झाली होती. बुलढाण्याचे काँग्रेसचे माजी आमदार राहुल बोंद्रे (Rahul Bondre) भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा रंगली होती. त्यांनी फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून भाजपमध्ये जाण्याचा निर्णयही जाहीर केला होता. मात्र, ऐनवेळी बोंद्रे यांनी आपला निर्णय बदलत काँग्रेसमध्येच राहण्याचा निर्णय घेतला.

BJP New Incharge List 2026 : भाजपमध्ये मोठे संघटनात्मक फेरबदल; विनोद तावडेंकडे उत्तर प्रदेश, बैजयंत पांडा महाराष्ट्राचे प्रभारी

Web Title: Yashwantrayagouda patil has resigned as mla

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 24, 2026 | 09:39 AM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.