फोटो सौजन्य- pinterest
ज्योतिशास्त्रामध्ये शनि ग्रहाला मंद गतीने चालणारा ग्रह मानला जातो. असे मानले जाते की, हा ग्रह एकाच राशीमध्ये अडीच वर्षे राहतो आणि संपूर्ण राशीमध्ये प्रदशिक्षा पूर्ण करण्यासाठी सुमारे 30 वर्षे लागतो. सध्या शनि मीन राशीमध्ये स्थित असल्याने ग्रहांची युती आणि पैलूंवर त्यांचा प्रभाव पडतो.
रविवार, 22 जून रोजी शुक्र आणि शनि सकाळी 11.43 वाजता 45 अंशाचा कोन तयार करत आहे त्यालाच अर्धकेंद्र योग असे म्हटले जाते. या योगाचा परिणाम काही राशीच्या लोकांवर आर्थिकदृष्ट्या दिसून येतो. शुक्र ग्रहाला आनंद, सौंदर्य आणि विलासाचा कारक मानले जाते तर शनि ग्रहाला कर्म, शिस्त आणि परिणामांसाठी कारक मानले जाते. जेव्हा शुक्र आणि शनि एकत्र येतात तेव्हा अर्धकेंद्र योग तयार होतो. या योगाचा परिणाम आर्थिक स्थिरतेवर होतो. या योगामुळे काही राशीच्या लोकांना आर्थिक लाभ, गुंतवणुकीत लाभ आणि अडकलेले पैसे परत मिळणे यांसारख्या गोष्टींचा शुभ परिणाम होताना दिसून येतो. अर्धकेंद्र योगामुळे कोणत्या राशीच्या लोकांना आर्थिक लाभ होऊ शकतो, जाणून घ्या
मेष राशीच्या लोकांसाठी अर्धकेंद्र योग खूप फायदेशीर राहील. हा योग तुमच्या बाराव्या घरात असल्याने तु्म्हाला अडचणीतून बाहेर पडण्यास मदत होईल. तुम्ही कोणत्याही कामामध्ये चांगली कामगिरी करु शकतात. या कामगिरीचा तुम्हाला भविष्यात खूप फायदा होईल. तुम्ही मित्र परिवारांसोबत वेळ घालवू शकतात. तुम्हाला करिअर क्षेत्रामध्ये या योगाचा फायदा होईल. कामाच्या ठिकाणी तुमची प्रशंसा होईल.
वृषभ राशीच्या लोकांना हा योग शुभ राहणार आहे. तुमच्या वरिष्ठांशी तुमचे संबंध दृढ होतील आणि तुमच्या कामाचे कौतुक होईल. पगारवाढ किंवा वाढ होण्याचे संकेत मिळू शकतात. दीर्घकाळापासून सुरु असलेल्या समस्या आज संपतील. विद्यार्थ्यांसाठी हा योग शुभ असेल त्यांना यश मिळेल. परिवाराकडूनव तुम्हाला पूर्ण पाठिंबा मिळेल. तुमची आर्थिक स्थिती सुधारेल.
मकर राशीच्या लोकांसाठी हा योग अतिफायदेशीर राहील. परिवारामध्ये सुरु असलेले वाद मतभेद संपतील. नातेसंबंधामध्ये गोडवा राहील. नोकरी करणाऱ्यांसाठी हा योग अतिशुभ राहील. तुम्ही ज्या कामासाठी खूप मेहनत घेत असाल त्यामध्ये तुम्हाला यश मिळेल. तुम्हाला कामाच्या ठिकाणी पदोन्नती आणि नवीन जबाबदारी देखील मिळू शकते. आर्थिक दृष्टिकोनातूनही हा काळ तुमच्यासाठी खूप चांगला राहील.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)