Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ashada Gupta Navratri: आषाढ गुप्त नवरात्रीच्या चौथ्या दिवशी करा कूष्मांडा देवीची पूजा, जाणून घ्या महत्त्व आणि मंत्र

शनिवार, १८ जुलै रोजी आषाढ गुप्त नवरात्रीचा चौथा दिवस आहे. या दिवशी देवी कूष्मांडा देवीची पूजा केली जाते. या देवीला 'अष्टभुजा' या नावानेही ओळखली जाते. या दिवशी पूजा केल्याने सर्व आजार बरे होतात आणि सुख-समृद्धी प्राप्त होते, अशी धार्मिक श्रद्धा आहे. कूष्मांडा देवीची पूजा करण्याची पद्धत, महत्त्व आणि मंत्र जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Jul 18, 2026 | 07:45 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:
  • आषाढ गुप्त नवरात्रीच्या तिसऱ्या चौथ्या दिवशी करा कूष्मांडा देवीची पूजा
  • कूष्मांडा देवीची पूजा करण्याची पद्धत
  • काय आहे कूष्मांडा देवीचे स्वरुप
 

 

शनिवार, १८ जुलै रोजी आषाढ गुप्त नवरात्रीच्या चौथा दिवस कुष्मांडा देवीला समर्पित आहे. या दिवशी कुष्मांडा देवीची पूजा केली जाणार आहे. ‘अष्टभुजा’ म्हणूनही ओळखल्या जाणाऱ्या या देवीने आपल्या हास्याने संपूर्ण विश्वाची निर्मिती केली, असे मानले जाते. या दिवशी तिची पूजा केल्याने सर्व आजार दूर होतात आणि सुख-समृद्धी प्राप्त होते, अशी धार्मिक श्रद्धा आहे. कूष्मांडा देवीची पूजा करण्याची पद्धत, स्वरुप, महत्त्व आणि मंत्र जाणून घेऊया

कूष्मांडा देवीची पूजा करण्याची पद्धत

नवरात्रीच्या चौथ्या दिवशी सकाळी स्नान करून स्वच्छ पिवळे किंवा हिरव्या रंगांचे वस्त्र परिधान करावे. त्यानंतर देवघर पवित्र करून आदिशक्तीची मूर्ती/चित्र स्थापना करावी. देवी कुष्मांडाला भोपळा (पेठा) किंवा पिवळ्या रंगाची मिठाई अर्पण करा. शेवटी, आरती करा आणि आपल्या कुटुंबाच्या सुख-समृद्धीसाठी प्रार्थना करा.

Ashadha Month: आषाढ महिन्यात या कारणांसाठी टाळली जातात शुभकार्य, जाणून घ्या कारणे

काय आहे कुष्मांडा देवीचे स्वरुप

कुष्मांडा देवी ही सिंहावर आरूढ आहे आणि तिला आठ हात आहेत, म्हणूनच तिचे नाव अष्टभुजा देवी असे आहे. ती आपल्या हातांमध्ये या वस्तू धारण करते. तिच्या हातामध्ये कमंडलू, धनुष्य, बाण, कमळ, अमृताने भरलेला कलश, चक्र, गदा आणि जपमाळ आहे. सिंह हे तिचे वाहन आहे.

‘कुष्मांडा’ हे नाव तीन शब्दांनी बनलेले आहे

कु – लहान
उष्मा – ऊर्जा किंवा उष्णता
अंडा – विश्व

अर्थात, ती देवी जिने आपल्या ऊर्जेने विश्वाची निर्मिती केली.

गुप्त नवरात्रीचे महत्त्व

आषाढ गुप्त नवरात्रीदरम्यान, देवी दुर्गेच्या नऊ रूपांसोबतच दहा महाविद्यांचीही पूजा केली जाते. आपली आध्यात्मिक शक्ती वाढवण्यासाठी भक्त गुप्तपणे मंत्रांचा जप करतात आणि तंत्राचा अभ्यास करतात. या काळात उपवास (व्रत) करण्याचा आणि सात्विक राहण्याचा विशेष नियम आहे.

Jagannath Rath Yatra: पुरीची जगन्नाथ रथयात्रा का आहे जगप्रसिद्ध? जाणून घ्या इतिहास, परंपरा आणि महत्त्व

कुष्मांडा देवीला या गोष्टींचा दाखवा नैवेद्य

कुष्मांडा देवीला केशर पेडा, मालपुआ, हिरवी वेलची या गोष्टींचा नैवेद्य दाखवला जातो.

या मंत्रांचा करा जप

“या देवी सर्वभूतेषु माँ कुष्मांडा रूपेन संस्थिता।”
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः॥”

देवीचे व्रत पाळल्याने होतात हे फायदे

आरोग्याच्या समस्या (विशेषतः पोटाचे आणि त्वचेचे आजार) कमी होतात.

तोतरेपणासारखे बोलण्यातील दोष सुधारतात.

आयुष्यात कीर्ती, शक्ती आणि ऊर्जा वाढते.

बुध ग्रह शांत होतो आणि बुद्धी/ज्ञानात वाढ होते.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

💡

Frequently Asked Questions

  • Que: आषाढ गुप्त नवरात्रीच्या चौथ्या दिवशी कोणत्या देवीची पूजा केली जाते?

    Ans: आषाढ गुप्त नवरात्रीच्या चौथ्या दिवशी देवी दुर्गेच्या चौथ्या स्वरूप असलेल्या माता कूष्मांडा यांची पूजा केली जाते.

  • Que: कूष्मांडा देवीचे धार्मिक महत्त्व काय आहे?

    Ans: धार्मिक मान्यतेनुसार माता कूष्मांडा यांनी आपल्या दिव्य हास्याने संपूर्ण ब्रह्मांडाची निर्मिती केली. त्यामुळे त्यांना सृष्टीची आदिशक्ती मानले जाते.

  • Que: कूष्मांडा देवीला कोणता नैवेद्य अर्पण करावा?

    Ans: मालपुआ, दही, गोड पदार्थ, भोपळ्यापासून बनवलेले पदार्थ किंवा हंगामी फळांचा नैवेद्य अर्पण करणे शुभ मानले जाते.

Web Title: Ashada gupta navratri 2026 method of worshiping goddess kushmanda importance and mantras

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 18, 2026 | 07:05 AM

Topics:  

  • dharm
  • hindu religion
  • Navratri

संबंधित बातम्या

Chandrama Upay: कुंडलीमध्ये चंद्र कमजोर असल्यास पौर्णिमेच्या दिवशी करा हे खास उपाय
1

Chandrama Upay: कुंडलीमध्ये चंद्र कमजोर असल्यास पौर्णिमेच्या दिवशी करा हे खास उपाय

Sakharchauth Ganpati: आगरी समाजाचा साखरचौथचा गणपती नेमका काय? जाणून घ्या भाद्रपदातील या खास परंपरेचे महत्त्व
2

Sakharchauth Ganpati: आगरी समाजाचा साखरचौथचा गणपती नेमका काय? जाणून घ्या भाद्रपदातील या खास परंपरेचे महत्त्व

Numberlogy: भाद्रपद पौर्णिमेचा दिवस सर्व मुलांकाच्या लोकांसाठी कसा राहील जाणून घ्या
3

Numberlogy: भाद्रपद पौर्णिमेचा दिवस सर्व मुलांकाच्या लोकांसाठी कसा राहील जाणून घ्या

Bhadrapada Purnima: भाद्रपद पौर्णिमेच्या रात्री करा या गोष्टी, नकारात्मकता होईल दूर
4

Bhadrapada Purnima: भाद्रपद पौर्णिमेच्या रात्री करा या गोष्टी, नकारात्मकता होईल दूर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.